Maharashtra Pik Vima Yojana : फक्त 3 नंबर सेव्ह करा आणि पिक विमा स्टेटस तुमच्या व्हाट्सअप वर.शेतकऱ्यांसाठी पिक विमा महत्त्वाचा विषय असतो शेती पिकाचा प्राकृतिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास पिक विमा शेतकऱ्यांना आर्थिक आधार देतो. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पीक विमा संदर्भात अद्यावत माहिती मिळणे गरजेचे आहे.ही गरज पाहता शेतकऱ्यांना सुविधाजनक अशी योजना अमलात येत आहे.फक्त 3 नंबर सेव्ह केल्यानंतर पीकविमा ची अद्यावत माहिती अगदी काहीच क्षणात शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअँप वर मिळेल.
वेबसाईट वर log in ची गरज नसेल.
पीकविमा (Pik Vima Yojana)संदर्भात आवश्यक माहितीसाठी आता पिक विमा कंपनी कार्यालय आणि कृषी कार्यालयांची चक्कर कापण्याची शेतकऱ्यांना गरज राहिली नाही. किंवा कोणत्याही वेबसाईटवर आपला पिक विमा update माहितीसाठी लॉगिन करण्याची गरज राहिली नाही. कारण आता पीक विमा स्टेट्स शेतकऱ्यांच्या व्हाट्सअप वर चेक करता येणार आहे. PMFBY च्या माध्यमातून नुकतेच व्हाट्सअप चॅट बोट सुरू करण्यात आला आहे.यासाठी एक नंबरही सार्वजनिकरीत्या प्रसारित करण्यात आला आहे.हे फक्त व्हाट्सअपवर कसे चेक करायचे असेल.
माहिती मिळविण्यासाठी हे करा.
सर्वात आधी(PMFBY WhatsApp chat boat) (7065514447) हा नंबर आपल्या संपर्क यादीमध्ये सेव्ह करावा लागेल.
(टीप )-( सोयीस्कर होईल अश्या नावाने हा नंबर सेव्ह करायचा आहे.)
* यानंतर मोबाईलमधील व्हाट्सअप उघडून यात सेव्ह केलेला नंबर काढावां लागेल.नंबर काढल्यानंतर त्यावर Hii असा मेसेज पाठवायचा आहे.यानंतर लगेच मोबाईल वर PMFBY चा रिप्लाय येईल
* यानंतर समोर आलेल्या रिप्लायमध्ये पॉलिसी स्टेटस, इन्शुरन्स पॉलिसी आणि सी ऑल ऑप्शन्स असा पर्याय दिसेल.
* सी ऑल ऑप्शन्सवर क्लिक केल्यानंतर इतर पर्याय दिसतील. (यामध्ये पॉलिसी स्टेटस, इन्शुरन्स पॉलिसी, क्रॉप लॉस इंटीमेशन स्टेटस, क्लेम स्टेटस इत्यादी.असेल)
* यातील पॉलिसी स्टेटसवर क्लिक केल्यावर पुन्हा रिप्लाय येईल.
* यात रब्बी 2024, खरीप 2024 किंवा इतर पर्याय असे ऑप्शन असेल.
* यानंतर पुढील पर्यायांमध्ये 2021 पासून ते 2024 पर्यंतचे रब्बी किंवा खरीप हंगामातील सर्व स्टेटस पाहता येतील.
* कोणत्याही एकावर क्लिक केल्यास संबंधित पीक विमा अर्जाची अप टु डेट माहिती उपलब्ध होईल.
अशा पद्धतीने आपण खरीप रब्बी हंगामातील विविध पीक विम्याची स्थिती व्हाट्सअपवर पाहू शकता