Yavatmal-Washim Lok Sabha निवडणुकीत बसपामुळे तिहेरी लढत होण्याचे संकेत!

माजी खासदार हरिभाऊ राठोड मुळे वाढला निवडणुकीत उत्साह.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

यवतमाळ/ Yavatmal-Washim Lok Sabha मतदार संघातून बहुजन समाज पार्टीच्या वतीने माजी खासदार व अखिल भारतीय बंजारा राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष Haribhau Rathod निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत, बसपा कडून उमेदवारी बहाल करण्यात आल्यानंतर त्यांनी नामांकन दाखल केले व त्यांनी संपूर्ण मतदार संघात प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे.हरिभाऊ राठोड यांच्या उमेदवारीने या लोकसभा सीट वर रोमांचक व तिरंगी लढत होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

एकीकडे महायुती व महाविकास आघाडी मध्ये लढत होत असल्याचा दावा केला जात असतांना यवतमाळ लोकसभा निवडणुकीत तिहेरी लढतीत बसपा बाजी मारेल असा दावा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी प्रचारात करीत आहे. यवतमाळ यवतमाळ लोकसभा मतदारसंघात एकदा भाजपकडून विजय होणारे माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या पाठीमागे जिल्ह्यात बंजारा समाजासोबतच मराठा, दलित आदिवासी अल्पसंख्यक व ओबीसी समाज भक्कमपणे उभा असल्याचा विश्वास बसपा नेते व उमेदवार राठोड यांनी व्यक्त केला आहे.

या निवडणुकीत विविध मुद्दे घेऊन लढत असलेले बसपा उमेदवार हरिभाऊ राठोड प्रचारा दरम्यान मतदारांसोबत विविध मुद्द्यांवर चर्चा करीत आपल्याला मत का द्यावे हे मतदारांना पटवून देत आहेत.भारत हे लोकशाही आणि गणराज्य राष्ट्र म्हणून जगामध्ये नाव लौकिक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहीलेल्या भारतीय संविधानामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या आधारे आपल्याला भास्तीय समाजाला समानतेचा अधिकार बहाल करण्यात आलेला आहे.

त्यामधून भारतीय लोकशाहीत मतदानांचा अधिकार आपल्याला बहाल करण्यात आहे. प्रत्येक भारतीयाना एकच मतदानाचा अधिकार देऊन श्रीमंत व गरीब यामधील समानता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला समर्पीत केलेली आहे, त्याचा सदसदविवेकबुद्धी वापर व्हावा, व भारताच्या सर्वोच्य संसदेमध्ये कायद्याचे व नियमांचे ज्ञान असणारा उमेदवाराला निवडून देणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.

भारतातील शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांच्या समस्येकडे विद्यमान भारत सरकार अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप बसपा उमेदवार राठोड यांनी केला असून कापूस आणि सोयाबीनला अत्यल्प भाव असून अजूनही अनेक शेतकऱ्यांचा कापूस विकल्या गेलेला नाही.गेल्या दहा वर्षापासून भारतामध्ये असलेले शासन हे जनसामान्यांना न्याय देऊ शकले नाही, हे भारतीय शासन प्रणालीला आणि स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाला मारक ठरणार आहे.माजी खासदार व माजी आमदार, मा. हरिभाऊ राठोड यांना मतदार मते देऊन भारतातील लोकशाही व गणराज्य संवर्धीत करनार असा आशावाद ते प्रचारादरम्यान करीत आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Comment

two × 4 =