Amravati Lok Sabha Election 2024: अमरावतीत नवनीत राणांचा गाडा कमळावर चालणार!
Amravati Lok Sabha Election 2024: अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी जारी केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा कमळ चिन्हावर लढणार आहेत. अमरावती प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये त्या करणार आहेत. त्यामुळे अमरावतीमध्ये उमेदवाराबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. मात्र महायुतीतला तिढा कायम आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ, अभिजित अडसूळ आणि प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी राणा यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध दर्शवला होता. बच्चू कडूंनी नवनीत राणा यांना आशीर्वाद द्यावा अशी हात जोडून विनंती रवी राणा यांनी केली आहे. त्यामुळे बच्चू कडू आता नवनीत राणा यांचा प्रचार करतील का याकडे लक्ष लागले आहे.
लक्ष्मीच्या हाती नेहमीच कमळ असते.
अमरावतीतून नवनीत राणांना भाजपची उमेदवारी जाहीर होताच अशाप्रकारे त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्या म्हणाल्या, “अमरावती करांची सून म्हणून मी गेल्या बारा ते तेरा वर्षापासून काम करते आहे अमरावती करायची इच्छा होती की आपल्या देशाचे नेते नरेंद्रजी मोदी, अमित शहाजी, देवेंद्र फडणवीस जी, नड्डा साहेब, बावनकुळे साहेब यांच्या शब्दांच्या पुढे मी जाणार नाही. हे सर्व माझे नेते आहेत आणि मी या सर्वांचे आभार मानते.”
बच्चू कडू नवनीत राणा यांचा प्रचार करतील का?
“नवनीत राणांचा प्रचार केला तर माझाच पक्ष फुटेल,” अशी भीती बच्चू कडूंनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे मुख्यंमंत्री एकनाथ शिंदेसोबत झालेल्या बैठकीनंतरही बच्चू कडू आपल्या निर्णयावर ठाम आहे. गरज पडल्यास नवीन उमेदवार उभा करण्याचा इशारा कडू यांनी दिला आहे. “आमच्याकडे हुकूमशाही चालत नाही. आम्ही लोकशाही वर विश्वास ठेवणारे आहोत. सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही चालतो. अरेरावीची भाषा आम्ही वापरात नाही.” अशी टोचत प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली होती.
तर आता बच्चू कडू यांची बंडखोरीची शक्यता?
अमरावती मतदारसंघातून भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. बच्चू कडू यांनी वारंवार इशारा देऊनदेखील भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बच्चू कडू मात्र अद्यापही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांनी बंडाचा इशारा उमेदवारी जाहीर होण्याआधीच दिला होता. नवनीत राणा यांना बच्चू कडू चा विरोध कायमच होता. राणा यांना उमेदवारी दिली तर आम्ही बंड करू आणि आमचा उमेदवार उभा करू, असा इशारा प्रहार कडून दिला होता. बंडाखोरीमुळे महायुती मधील टेन्शन आता वाढले आहे.
भाजपकडून नवनीत राणा यांना तिकीट का?
अमरावती मधून नेमका उमेदवार कोण याची उत्सुकता संपली आहे आणि अखेर भाजपने उमेदवारी जाहीर करत नवनीत राणा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. आणि भाजपाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर अखेर कमळ या चिन्हावरून नवनीत राणा या उमेदवार असतील. आपली निवडणूक लढताना दिसतील. आणि यंदाची निवडणूक त्या कमळावर लढवणार आहे.
नवनीत राणा यांना तिकीट निश्चित होणार हे जवळपास 7 ते 8 दिवसांपूर्वी स्पष्ट झाले होते. त्यावेळी मतदारसंघामध्ये चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस स्वतः गेले होते. अमरावती मतदारसंघातून नवनीत राणा आणि रवी राणा यांची जिंकण्याची जी युक्ती आहे क्रायटेरिया आहे याचा विचार करून भाजपने हा निर्णय घेतला असावा.
नवनीत राणांनी जो महाविकास आघाडीच्या विरोधात संघर्ष केला होता, उद्धव ठाकरे च्या विरोधात जो आवाज उठवला होता, सर्वांना माहिती असलेलं हनुमान चालीसा प्रकरण, असेल किंवा इतर अजून ज्वलंत मुद्दे असतील त्यामुळे भाजपला नवनीत राणा यांना सोडून देणे शक्य नव्हते. भाजपला त्यांची जबाबदारी घ्यावी लागणार होती आणि त्या सर्व गोष्टींचा निष्कर्ष म्हणून नवनीत राणा यांच्या नावावर भाजपचा उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब झालेला आहे.
भाजप v/s काँग्रेस म्हणजेच राणा v/s बलवंत वानखेडे!
अमरावतीची लढत ही रंगतदार होईल कारण भाजप कडून नवनीत राणा तर काँग्रेसकडून बलवंत वानखेडे अमरावतीच्या आखाड्यात एकमेकांसमोर उभे राहणार आहे. भाजपच्या सातव्या यादीत नवनीत राणा यांच्या नावाचा समावेश आहे. तर बलवंत वानखेडे यांना महाविकास आघाडीने सुरुवातीपासूनच उमेदवारीचे संकेत दिले होते.
नवनीत राणांवर टिप्पणी करताना ते म्हणाले की, “नवनीत राणा या माझ्यासाठी आव्हान नाहीत. त्या निवडून आल्या होत्या त्या फक्त काँग्रेसच्या भरोशावर आणि दोन महिन्यानंतर त्या कशा पलटल्या हे संपूर्ण जनतेला माहिती आहे. म्हणून त्या माझ्या स्पर्धक नाहीत कारण अमरावती हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. 24 लोकसभा जागा या भाजपच्या खात्यात गेल्या आहेत. या अजूनही वाढून 29 ते 30 पर्यंत जाऊ शकतात.
कदाचित 31 ते 32 उमेदवार भाजपचे आणि उर्वरित जागा शिंदे आणि अजितदादा गट लढवतील अशी आशांका आहे, परंतु अमरावतीच्या जागेचा तिढा होता आणि अडसूळ आणि बच्चू कडू यांची नाराजी बाजूला सारत भाजपने आता आपला उमेदवार स्पष्ट केला आहे, आणि राणादांपत्य हे फडणवीसांच्या भेटीला आज जाणार असल्याची चर्चा देखील सुरू आहे. अमरावती मतदारसंघात पेटलेलं हे शीत युद्ध कशाप्रकारे थंड होईल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यामुळेच आता अमरावती मतदारसंघातील ही लढाई अजूनच चूरशीची होणार आहे.