८६ ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प, संगणक परिचालकांचा संप!
*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी*
दारव्हा तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतीमधील संगणक परिचालक मागील दोन महिन्यांपासून संपावर गेल्याने ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प पडला आहे. त्यामुळे विकासात्मक कामांना खीळ बसली असून गावातील नागरिकांत असंतोष निर्माण झाला आहे. तंत्रज्ञानाच्या युगात ऑनलाइनची सर्व कामे करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये संगणक परिचालकांची नियुक्ती केली. संगणक परिचालक आपल्या समस्येबाबत मागील दोन महिन्यांपासून संपावर गेले आहेत.
त्यामुळे दारव्हा तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प पडला आहे. गावातील नागरिकांना अनेक प्रकारचे दाखले ऑनलाइन घ्यावे लागतात. परंतु संगणक परिचालक संपावर गेल्याने नागरिकांना दाखले मिळणे बंद झाले आहेत. त्यामुळे नागरिकांची अनेक कामे रखडलेली आहेत. रहिवासी दाखला,जन्म व मृत्यूचा दाखला, गुरांचे गोठे बांधकामाकरिता दाखला, नमुना आठ इत्यादी विविध प्रकारचे दाखले ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना द्यावे लागतात. नागरिकांना दाखले मिळत नसल्याने गावात प्रशासनाविरुद्ध असंतोष निर्माण झालेला आहे.
विकासकामे झाली ठप्प.
नागरिकांना दाखले देण्यासोबतच विकासात्मक कामेसुद्धा ऑनलाइन पद्धतीने करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यामुळे गावातील विकासकामांना खीळ बसली आहे. गावातील कामे मागील दोन महिन्यांपासून ‘जैसे थे’ पडून आहेत. याबाबत प्रत्येक ग्रामपंचायतीने तालुकास्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले आहे. परंतु त्याचा कोणताही फायदा झाला नाही.
त्यामुळे ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांतही नाराजी पसरली आहे. मागील दोन महिन्यांपासून ग्रामपंचायतमधील संगणक परिचालक संपावर गेले आहेत. त्यामुळे विकासकामे ठप्प पडली असून गावातील नागरिकांना दाखले मिळत नाहीत. त्यामुळे गावात असंतोष पसरला आहे.त्यामुळे प्रशासनाने तोडगा काढावा.
– विजय दमडुजी जाधव
तालुकाध्यक्ष, अखिल भारतीय सरपंच संघटना दारव्हा