बाभुळगाव येथे नाफेडची तूर नोंदणी 28 डिसेंबर पासुन सुरू होणार.
*बाभुळगाव, ता, प्र, मोहम्मद अदीब*
शेतकऱ्यांनी तूर नोंदणी करण्याचे आवाहन शासनाच्या आदेशा प्रमाणे. हंगाम 2023 -24 ‘नाफेड ‘या संस्थेच्या मार्फत तूर खरेदी साठी नोंदणी दि. 28 डिसेंबर पासून कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले नांव ऑनलाईन नोंदणी करण्यात यावे असे आवाहन बाभूळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांनी केले आहे.
नोंदणी करीता चालू वर्षाचा ऑनलाईन तूर पिक पेरा असलेला ७/१२ (2022/23′ ची सत्यप्रत) आधार कार्ड झेरॉक्स, बँक पास बुक झेरॉक्स, चालू मोबाईल नंबर सोबत आणणे बंधनकारक आहे. नोंदणी ची वेळ ११.०० ते ५. ०० असून प्रत्येक नांव नोंदणी साठी आपला वेगवेगळा मो. नंबर देणे. आवश्यक आहे व वरिल कागदपत्रात व क्षेत्रफळ मध्ये काही माहिती चुकिची असल्यास त्या शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंद केली जाणार नाही व त्यास शेतकरी स्वतः जबाबदार असेल. ह्याची नोंद शेतकऱ्याने घ्यावी तसेच हस्तलिखित ७/१२ स्विकारल्या जाणार नाही याची शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी. अशी माहिती सचिव कृ उ बा समिती बाभुळगाव यांनी दिली आहे.