Ghatanji: 7/12 काढण्यासाठी अतिरिक्त पैसे! सेतू केंद्र परवाना रद्द करण्याची मागणी.
Ghatanji :- तालुक्यातील शेतकरी वर्ग महागाई, अतिवृष्टीमुळे अवकाळी पाऊस, कापूस उत्पादकांना भाव नसल्याने बळीराजा हवालदिल झाले आहेत. त्यात तहसील कार्यालयातील सेतु केंद्र चालकाचे 7/12 काढण्यासाठी अतिरिक्त पैसे घेऊन आर्थिक लूट करीत आहेत. श्री राठोड तहसीलदार घाटंजी यांना दि.22 डिसेंबर रोजी तक्रार दाखल केली आहे. राठोड यांच्या कडून प्रती 7/12 रुपये पन्नास लागले नाही तर नाहीच मिळत असे दम देण्यात आले.
परंतु थोडा वेळात तडजोड करून एक 7/12, एक 8 अ तसेच एक फेरफार असे 100 रूपये मध्ये तडजोड करण्यात आले. त्या प्रत्येकी तीन प्रत यांचे 300 रूपये घेण्यात आले. सेतू केंद्रावर शासनाने नियमानुसार शुल्क घेणे बंधनकारक असून शासनाच्या नियमांना दुर्लक्ष करण्यात येतो. स्थानिक तहसील कार्यालयातील सेतू केंद्रवर चौकशी करून परवाना रद्द करण्यात यावे अशी मागणी राठोड यानी केली.