कला व वाणिज्य महाविद्यालय Bori Arab येथे ऑफलाईन प्लेसमेन्ट.
*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी*
दारव्हा…स्थानिक कला व वाणिज्य महाविद्यालय, बोरीअरब येथे करिअर मार्गदर्शन सेल व एन.आय.आय. टी (ICICI Bank) यांच्या संयुक्त विद्यमाने ऑफलाईन प्लेसमेन्ट ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आले होते या कार्यकमाकरिता प्रमुख अतिथी म्हणून NIIT चे H.R. Manager श्री. शिवम सिंघ हे होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप खुपसे हे होते.
या कार्यक्रमामध्ये श्री. शिवम सिंघ यांनी विद्यार्थ्यांना ICICI Bank संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांची संवाद कौशल्ये, लेखन कौशल्ये, यांची चाचणी घेण्यात आली. सोबतच विद्यार्थ्यांना असलेले संगणकाचे अद्ययावत ज्ञान तपासण्यात आले. या सर्व प्रकियेच्या माध्यमातून मुलांना मुलाखतीसाठी तयार करण्यात आले. मुलाखतीकरिता Resume महत्त्वाचा भाग असतो. Resume मध्ये कोणत्या बाबी प्रामुख्याने आपण नमुद केल्या पाहिजेत. या सर्व बाबींचे विवेचन मार्गदर्शनपर कार्यक्रमात त्यांनी केले. प्राचार्य डॉ. दिलीप खुपसे यांनी विद्यार्थ्यांना या प्लेसमेन्ट ड्राईव्हकडे एक करिअरची संधी म्हणून पहावे असे आपल्या अध्यक्षीय समारोपात सांगितले.
या ऑफलाईन प्लेसमेन्ट मोहिमेकरिता सुरूवातील सत्र २०१९ ते २०२३ या कालावधीमधील पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुगल फॉर्मव्दारे रजिस्ट्रेशन करण्यात आले. यामध्ये एकूण जवळपास ८० ते ८५ विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. प्रत्यक्ष मुलाखतीकरिता एकूण ७२ विद्यार्थ्यांनी या ऑफलाईन प्लेसमेन्टचा फायदा घेतला.
कार्यकमाचे प्रास्ताविक डॉ. अजय बोंडे यांनी तर उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रा.डॉ. दिपक कुटे यांनी केले. आभार प्रा. डॉ. असरार खान यांनी मानले. या कार्यक्रमाकरिता डॉ. रामचंद्र बुटले, डॉ. सुनील ढेरे, डॉ. गणेश पवार, प्रा. प्रकाश तेलगोटे, प्रा. नयन पुरी, प्रा. आकाश सुर्यवंशी, श्री. सतीश राउत, श्री. संजय रूडे, श्री. शंकर पारधी, श्री. प्रमोद वानखडे, श्री. राहुल वानखडे, श्री. उमेश तिजारे, इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.