Marathi Board: यवतमाळ शहरातील दुकानांवरील फलक मराठी भाषेमध्ये असावे मनसे कडून प्रशासनाला ८ दिवसाचा वेळ.

Marathi Board: यवतमाळ शहरातील दुकानांवरील फलक मराठी भाषेमध्ये असावे मनसे कडून प्रशासनाला ८ दिवसाचा वेळ.

Marathi Board: यवतमाळ: मा. सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवरील नावाचे फलक है मराठी भाषेमध्ये असावे याबाबत आदेश दिलेला होता व त्याची मुदत ही दि. २५/११/२०२३ रोजी संपलेली आहे. या तारखेपूर्वी स्थानिक व्यापारी, दुकानदार व इतर आस्थापना यांनी त्यांचे दुकानांवरील फलक मराठी भाषेमध्ये लिहिणे अपेक्षित होते परंतु असे निदर्शनास येते की अनेक दुकानांवरील फलक मराठीमध्ये लावलेले नाहीत.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

त्यामुळे ते फलक सर्वोच्च न्यायालयाचे आदेशा प्रमाणे मराठी भाषेमध्ये लावावे याबाबत आपल्या अधिनस्त असलेल्या यंत्रणेला त्वरीत आदेशीत करण्यात यावे ज्या आस्थापनांवर मराठी भाषेत फलक नाही त्यांना ८ दिवसाचा वेळ आम्ही देत आहोत अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल आणि होणाऱ्या संगर्षाला प्रशासन जवाबदार राहील अश्या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांना देण्यात आले.

या प्रसंगी मनसे जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार , मनसे शहर अध्यक्ष अ‍ॅड.अमित बदनोरे ,अभिजित नानवटकर महाराष्ट्र नवनिर्माण विधार्थी सेना यवतमाळ जिल्हा , मनसे यवतमाळ शहर उपाध्यक्ष आकाश भोयर ,प्रथमेश पाटील , सोनू गुप्ता , तुषाल चोंडके, विभाग अध्यक्ष ओम् राठोड , यश शिंगारे , विलास कुमारे यांच्या सह समस्त यवतमाळ शहरातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तीत होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five − 5 =