Zomato CEO Marriage: झोमॅटोच्या परिवारात मेक्सिकन सुनेची एंट्री!
Zomato CEO Marriage: भारतात अजून एकदा ” फॉरेनची पाटलीन” या सिनेमाची कथा प्रत्यक्षात उतरल्या सारखी दिसते आहे. अर्थातच, मेक्सिको ची लेक ही झोमॅटो CEO च्या घरची लक्ष्मी बनली आहे. झोमॅटो CEO दीपंदर गोयल आणि मेक्सिकन मॉडेल आणि उद्योजक ग्रेशिया मुनोझ या दोघांनी सिक्रेटली लग्न केल्याच्या बातम्या सोशल मीडिया वर तुफान वायरल होत आहे. लग्न काही महिन्यापूर्वीच झाले आहे अशी चर्चा आहे.
ग्रेशिया मुनोझ जानेवारी मध्ये भारतात आली होती. तिने दिल्लीतील फोटोस आपल्या इंस्टाग्राम हॅन्डल वर शेअर देखील केले आहे ज्यात लाल किल्ला आणि इतर प्रसिध्द स्मारकांना ती भेट देताना दिसते आहे. इंस्टाग्राम च्या फ़ोटोज च्या कॅप्शन वर तिने “माझ्या नवीन घरात नवीन जीवनाची झलक ” असे लिहत पोस्ट केले आहे तर बायो मध्ये तिने “मेक्सिको मध्ये जन्मलेली, सध्या भारतात आहे.” असे लिहलेले दिसते आहे. यावरूनच फॉरेनची पाटलीन आता भारताची सून झाली आहे असे स्पष्ट होते.
झोमॅटो CEO चे ग्रेशियाशी हे दुसरे लग्न आहे, तर दीपंदर गोयल यांचे पहिले लग्न कोणाशी झाले?
दीपंदर गोयल यांचे कांचन जोशी यांच्याशी लग्न झाले होते आणि ते दोघे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) दिल्ली येथे एकत्र शिकत असताना भेटले होते. ते दोघेही IIT-दिल्ली येथे गणित आणि कॉम्पयुटिंग या एकाच डिपार्टमेंट ला होते. दीपिंदरनेच त्याची पहिली पत्नी कांचन साठी पहिला पुढाकार घेतला होता त्यानंतर त्यांनी डेट करायला सुरुवात केली आणि नंतर लग्न केले. मात्र, काही कारणास्तव नंतर हे जोडपे वेगळे झाले. सध्या कांचन जोशी या दिल्ली विद्यापीठात गणिताच्या प्रोफेसर आहेत.
झोमॅटो साईओ ची दुसरी पत्नी म्हणजेच ग्रेशिया मुनोझ, कोण आहे ही ग्रेशिया?
ग्रीशिया मुनोझ ही मेक्सिकोमध्ये जन्मलेली, आधी मॉडेलिंग करत असलेली, जी ने मनोरंजन विश्वात, टेलिव्हिजन होस्टच्य भूमिकेसह स्वतःचे नाव कमावले आहे. ती केवळ तिच्या मॉडेलिंगसाठीच ओळखली जात नाही तर ती एक उद्योजक (entreprenure) म्हणूनही चमकली आहे. तिची नेमीच असलेली स्टायलिश उपस्थिती आणि तीक्ष्ण व्यावसायिक कौशल्ये यामुळे , मेक्सिकोमध्ये तिच्या उच्च श्रेणीतील प्रॉडक्ट्स उत्पादने विकण्यात मोठा प्रभाव पाडला आहे आणि टीव्हीवरील तिच्या कामासाठीही ती खूप प्रसिद्ध झाली आहे.
ग्रेशिया मुनोझचे वय.
ग्रेशिया मुनोज ८ सप्टेंबर रोजी तिचा वाढदिवस साजरा करते. तिचे जन्म वर्ष निर्दिष्ट केलेले नसले तरी, ती कन्या राशीची आहे. तिचा जन्म मेक्सिकोमध्ये झाला आणि तेच तिचे मुळ गाव आहे.
ग्रेशिया मुनोझचे करिअर.
– एक मॉडेल म्हणून एक वैविध्यपूर्ण करिअर ग्रेशियाने तयार केले आहे. फॅशन उद्योगातील तिच्या काळात, तिने अनेक फॅशन इव्हेंट्समध्ये भाग घेऊन ओळख निर्माण केली आणि 2022 मध्ये प्रतिष्ठित मेट्रोपॉलिटन फॅशन वीकमध्येही तिने विजय मिळवला. मॉडेलिंगमधील तिचे यश तिच्या कलाकुशलतेचे आणि समर्पणाचे प्रदर्शन करते.
– मॉडेलिंगमध्ये लक्षणीय यश मिळवल्यानंतर तिने तिचे लक्ष फॅशन जगतातील ग्लॅमरपासून उद्योजकीय क्षेत्राकडे वळवले. तेव्हापासून ग्रेशिया तिच्या स्वत:च्या स्टार्टअपच्या विकासावर काम करत आहे.
– ग्रेशियाने 2021 मध्ये मेक्सिकोमधील फॅशन कॉकटेल इव्हेंटमध्ये भाग घेतला आणि प्रसिद्ध वोग मासिकासाठी मॉडेलिंग केले, जे तिच्या मॉडेलिंग कारकीर्दीतील एक महत्त्वपूर्ण यश आहे.
ग्रेशियाची जीवनशैली आणि आवडीनिवडी.
– प्राणी प्रेमी असणारी ग्रेशिया मुनोझच्या सोशल मीडियावर तिच्या पाळीव प्राण्याचे वैशिष्ट्य आहे. तिच्या छंदांमध्ये पोहणे आणि नृत्य यांचा समावेश आहे, जे तिच्या फिटनेसबद्दलचे प्रेम दर्शवते.
– ट्रॅव्हलींग ही ग्रेशीयाची आणखी एक आवड असल्याचे दिसते, जे तिने जगभरातील विविध ठिकाणांहून शेअर केलेल्या फोटोंवरून दिसून येते. यामध्ये युनायटेड स्टेट्स, फ्रान्स आणि भारत मधील अनुभवांचा समावेश तिच्या फोटोस मधून दिसतो.
CEO गोयल आणि ग्रेशिया च्या लग्नाचे चर्चे पूर्ण भारतभर गुंजत आहे. भारताचे दीपंदर गोयल हे नाव सर्वांसाठीच ओळखीचे आहे. जाणून घेऊया,
दीपंदर गोयल यांची सक्सेस स्टोरी
दीपंदर गोयल यांचा जन्म 26 जानेवारी 1983 रोजी पंजाबमधील मुक्तसर नावाच्या एका छोट्या गावात झाला. आठवीपर्यंत एक सरासरी विद्यार्थी होते, त्यानंतर त्यांनी अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. मोठे होत असताना केवळ शैक्षणिकच नाही तर तोतडेपणाचाही सामना दीपंदरने केला होता. मात्र काळाबरोबर त्यांची बोली सुधारत गेली.
कॉलेज शिक्षणासाठी ते प्रतिष्ठित आयआयटी दिल्लीमध्ये दाखल झाले आणि 2008 मध्ये त्यांनी झोमॅटो म्हणजे तेव्हाचे Foodiebay.com म्हणून ओळखले जाणारे अँप सुरू केले. स्टार्ट-अपने सुरुवातीला रेस्टॉरंट्सचे फूड मेनू शोधणे सोपे करण्यासाठी अपलोड केले, परंतु कालांतराने ते भारतातील 1000 हून अधिक शहरांमध्ये चालणारे सर्वात मोठे खाद्य वितरण ॲप बनले. आणि झोमॅटो हे शहरा – शहरातून देशभर नावारूपात आले.
झोमॅटोच्या संस्थापकाला अलीकडेच “प्युअर व्हेज मोड” सेवेच्या लॉन्चिंगवर निगेटिव्ह प्रतिक्रियेचा सामना करावा लागला. गोयल यांनी नंतर सेवा मागे घेतली. त्यांनी लाँच करण्यामागील कारण म्हणून शाकाहारी ग्राहकांच्या अभिप्रायाचा उल्लेख केला होता. त्यात ते म्हणाले की, “आम्ही शाकाहारी लोकांसाठी हा मोड कायम ऑन ठेवणार आहोत, तर आम्ही या मिशन चे ऑन-ग्राउंड हिरवा रंग वापरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
आमचे सर्व रायडर्स आमचा नियमित फ्लीट आणि शाकाहारी लोकांसाठी देखील लाल रंग परिधान करेल.” 2008 मध्ये Zomato ची स्थापना करण्यात आली. चीनच्या Ant Group च्या पाठिंब्याने झोमॅटो आज देशातील सर्वात प्रमुख स्टार्टअप्स पैकी एक आहे.