Yusuf Punjani : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रसार,विस्तार व पक्ष संघटन मजबूत व्हावे व मा.अजितदादा पवार साहेब यांची विकासात्मक विचारधारा समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचावी यासाठी संपूर्ण वाशिम जिल्ह्यात पक्ष संघटन कार्य व्यापक प्रमाणात राबविण्यात येते आहे,त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसुफ पुंजानी यांचे अध्यक्षतेखाली दिनांक १९ नोव्हेंबर रोजी माहेश्वरी भवन रिसोड येथे तालुकास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.
आयोजित आढावा बैठकीत श्री दत्तराज डहाके माजी नगराध्यक्ष कारंजा,श्रीमती सोनालिताई ठाकूर पक्ष निरीक्षक अमरावती,श्रीमती सीमाताई सुरुशे जिल्हाध्यक्ष राकापा महिला,श्री प्रशांत गोळे,श्री अशोक जाधव तालुकाध्यक्ष रिसोड,श्री सुशांत जाधव तालुकाध्यक्ष मालेगाव,श्री सुनील पाटील तालुकाध्यक्ष वाशिम,श्री भगवानराव श्रीसागर,श्री किरण श्रीसागर माजी नगराध्यक्ष, सौ श्रीसागर माजी नगराध्यक्ष व सर्व आजी माजी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस रिसोड शहराध्यक्ष पदी श्री अरुण श्रीसागर व राकापा अल्पसंख्याक सेल शहर अध्यक्ष पदी मो सोहेल उर्फ राजुभाई ठेकेदार यांची नियुक्ती करून नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आजी माजी पदाधिकारी,कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.