Yavatmal Professor Suicide News : यवतमाळ बापूजी अणे महाविद्यालयाचे प्राध्यापाक संतोष गोरे यांची रेल्वेखाली आत्महत्या.

Yavatmal Professor Suicide News : यवतमाळ शहरातील लोकनायक बापूजी महिला महाविद्यालयात कार्यरत असलेले 54 वर्षीय प्राध्यापक संतोष भास्करराव गोरे निवासी जयहिंद चौक यवतमाळ यांनी धामणगाव रेल्वे येथे मालगाडी खाली उडी घेऊन आत्महत्या केली.

सोमवार 24 मारच्या पहाटे धामणगाव रेल्वे येथे त्यांनी आत्महत्या करून जीवन संपविले.प्राध्यापक संतोष भास्करराव गोरे 54 रा.यवतमाळ हे बापूजी अणे कॉलेजमध्ये अंग्रेजी विषयाचे प्राध्यापक होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

लिहून ठेवली सुसाइड नोट.

प्राध्यापक संतोष गोरे यांनी आपल्या आत्महत्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती.यात त्यांनी आपल्या आत्महत्या मागे मानसिकता त्रास देणारे अनेक लोक कारणीभूत असून,आपली ही आत्महत्या नसून तर एका प्रकारे हत्या केली जात आहे,असे त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे.

त्यांच्या आत्महत्या मुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली असून पोलिसांनी आता प्रा.संतोष गोरे यांच्या आत्महत्या प्रकरणी 34 जणांविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहे.

Yavatmal Professor Suicide News : व्यवस्थापनाकडे तक्रार आणि Clean Chit.

शहरात लोकनायक बापूजी अणे महाविद्यालयात प्राध्यापक संतोष भास्करराव गोरे अनेक वर्षापासून या कॉलेजमध्ये कार्यरत होते.ते येथे  अंग्रेजी विषयाचे प्राध्यापक होते.आपल्या आत्महत्यापूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत कॉलेजमधील एका महिला प्राध्यापकीने आपल्या विरोधात व्यवस्थापनाकडे तक्रार केली होती,यानंतर कॉलेज व्यवस्थापनाकडून या तक्रारीवरून चौकशी करण्यात आली होती.

त्यानंतर व्यवस्थापनाने प्राध्यापक संतोष गोरे यांना क्लीन चिट देण्यात आली ,अशी माहिती समोर आली आहे.24 मार्चला प्रा.संतोष गोरे यांनी धामणगाव रेल्वे येथे जाऊन मालगाडीखाली उडी घेऊन आपली जीवनलीला संपविली.

त्यांनी लिहिलेली सुसाईड नोट घटनास्थळावर पोलिसांना मिळाली असून यामध्ये आत्महत्येला कारणीभूत असलेल्या 30 ते 35 जणांची नावे नमूद असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

कॉलेजमध्ये आपल्या विरुद्ध झालेली तक्रार आणि चौकशीनंतर प्राध्यापक संतोष गोरे यांनी नंतर काही दिवसापूर्वी आपल्या पत्नीला पुणे येथे पाठवून दिले होते.सूत्रांच्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून ते मानसिक दडपण आणि निराशेत वावरत होते.

यानंतर त्यांनी ते 24 मार्च रोजी धामणगाव रेल्वे येथे गेले होते.येथे त्यांनी पहाटे तीन वाजताच्या सुमारास मालगाडी खाली उडी टाकून आत्महत्या केली.या घटनेची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात येते त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

पोलिसांनी तपास सुरु करताना प्रा.गोरे यांच्या खिश्यात असलेले आय कार्ड आणि बेल्ट वरून ते यवतमाळ येथील रहिवासी असून ते महाविद्यालयातील प्राध्यापक असल्याची माहिती समोर आली.

त्यानंतर धामणगाव रेल्वे मध्ये कार्यरत कर्मचारी कसाले यांनी बापूजी अणे महाविद्यालयात संपर्क साधून प्रा.संतोष गोरे यांच्या आत्महत्यासंदर्भात माहिती दिली.या घटनेनंतर धामणगाव रेल्वे आणि बडनेरा रेल्वे पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे.

दरम्यान घटनास्थळावरून प्रा.संतोष गोरे यांच्याकडून सापडलेल्या आत्महत्यापूर्व लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली.त्यानंतर चौकशी दरम्यान पोलिसांनी यवतमाळ गाठून या प्रकरणाची सविस्तर चौकशी दरम्यान 34 लोकांवर प्राध्यापक संतोष भास्करराव गोरे यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

ही आत्महत्या एकाप्रकारे सुनियोजित हत्याच असल्याचे चिट्ठीत नमूद केले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,प्रा.संतोष भास्करराव गोरे यांनी आत्महत्यापूर्व जी चिट्टी टाईप करून ठेवली आहे, त्याला त्यांनी “मृत्यूपूर्व समापन” असे म्हणत काही बाबी नमूद केली आहे.

यात त्यांनी आपल्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या व्यक्तींची नावे नमूद केली असून त्यांच्याकडून मानसिक त्रास देण्यात येत असल्याचे आणि ते सहन करण्याची सहनशक्ती उरली नसल्याने आपण हा टोकाचा पाऊल उचलत आहो.

माझी ही आत्महत्या नसून या लोकांद्वारे केली गेलेली एकप्रकारे सुनियोजित हत्या आहे,असे त्यांनी आपल्या नोटमध्ये स्पष्ट केले आहे.उल्लेखनीय म्हणजे हीचिठ्ठी त्यांनी आपल्या आत्महत्यापूर्वी यवतमाळ शहर पोलीस ठाणेदार आणि ग्रामीण पोलीस ठाणे यवतमाळ यांना सुद्धा प्रेषित केल्याची बाब त्यात नमूद आहे.

34 लोकांविरुद्ध प्रा.संतोष गोरे यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

दरम्यान धामणगाव रेल्वे येथे प्रा.संतोष गोरे यांच्या आत्महत्यानंतर बडनेरा येथील रेल्वे पोलिसांच्या पथकाने 25 मार्चच्या सकाळीच यवतमाळ गाठून प्रा.गोरे यांच्या निवासस्थानी पोहोचून त्यांच्या कुटुंबीयांची बयाने नोंदविली.यासह पोलीस काही प्रत्यक्षदर्शींची बयानेही नोंदविणार असल्याची माहिती आहे.

याप्रकरणी प्रा.संतोष गोरे यांचे मामेभाऊ शशिकांत भट रा.जयहिन्द चौक यवतमाळ यांच्या तक्रारीवरून बडनेरा रेल्वे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.{Badnera Railway Police}.यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संगीता 34,108 {3}{5} कलमाने 34 लोकांविरुद्ध प्रा.संतोष गोरे यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान याची भनक लागतात यापैकी अनेक आरोपी पसार झाले असल्याची माहिती समोर आली,सोबतच हे आरोपी आपल्या वकिलांमार्फत जामिनासाठी धडपड करत असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

या आरोपींमध्ये महिला बापूजी यांनी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे काही पदाधिकारी,काही प्राध्यापक आणि काही कर्मचाऱ्यांच्या सुद्धा समावेश असल्याची माहिती समोर आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

eighteen − three =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.