Yavatmal Plot Prices: धामणगाव रोड लय भाव खातो, आर्णी मार्गावरही दर आहे तेजीत.

Yavatmal Plot Prices: धामणगाव रोड लय भाव खातो, आर्णी मार्गावरही दर आहे तेजीत.

Yavatmal Plot Prices: प्लॉटचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर : सुरुवात ५०० रुपयांपासून.

यवतमाळ : शहराच्या सर्वच बाजूने ले- आऊटची गर्दी वाढली आहे. प्रत्येकजण आपल्यापरीने प्लॉटची खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे. आजच्या स्थितीत प्रती चौरस फूट ५०० रुपयांपासून ते तीन हजार रुपये दर आहे. परिसरानुसार कमी-अधिक दर ठरले आहे. काही भागांमध्ये प्लॉटचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. शहराच्या मध्यवस्तीत भूखंड घ्यायचा झाल्यास सहा ते सात हजार रुपये प्रती चौरस फूट मोजावे लागते.

शहरालगतच्या नवीन वसाहतींमध्येही दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. फ्लॅटच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. २५ लाखांपासून सव्वा ते दीड कोटी रुपये किमतीचे फ्लॅट यवतमाळात आहेत. परिसर पाहून यासाठी किंमत लागते. शिवाय, फ्लॅटमध्ये असलेल्या सुविधांवरूनही किंमत ठरविली जाते. दसरा, दिवाळीच्या काळात नागरिकांचा कल या खरेदीकडे अधिक असल्याचे सांगितले जाते.

कोणत्या भागात फ्लॅटचे काय दर? 

1) धामणगाव रोडवर ३ हजारांचा भाव

धामणगाव मार्गावर प्लॉटचे दर ८०० रुपये चौरस फुटापासून ते तीन हजार रुपयेपर्यंत आहे. अनेक ले- आऊट या भागात आहेत

2) पांढरकवडा रोड १२०० पर्यंत.

पांढरकवडा मार्गावर प्लॉटचे दर थोडे कमी आहेत. ३०० रुपये चौरस फुटापासून १२०० रुपयांपर्यंत भाव येथे आहे. 

3) आर्णी मार्गाचे दरही रग्गड.

आर्णी मार्गावर मुख्य रस्त्याला लागून प्लॉटचे दर तीन हजार रुपये चौरस फूट आहे. आतमध्ये ७०० ते हजार रुपये दर आहे.

4) दारव्हा मार्गावर दणकून भाव.

दारव्हा मार्गावर सहा ते सात हजार रुपये चौरस फूट दर प्लॉटसाठी मोजावे लागतात. परिसर पाहून दर ठरले आहेत.

शहराच्या सर्वच भागात होते प्लॉटची खरेदी.

यवतमाळ शहराच्या सर्वच भागात प्लॉट खरेदीसाठी नागरिकांची तयारी असते.” ऐपतीनुसार दर पाहून प्लॉटची खरेदी केली जाते. नवीन ले-आऊटकडे अनेकांचा कल दिसतो.

घर खरेदीसाठीही केली जाते तजवीज.

दिवाळी, दसरा काळात घराची खरेदी करता यावी म्हणून तजवीज केली जाते. काही जण याच सणांचा मुहूर्त साधून खरेदी करीत असल्याचे सांगितले जाते.

सध्या दर स्थिर.

दोन वर्षापूर्वी प्लॉटच्या दरांमध्ये वाढ झाली होती. मात्र, गेली एक वर्षापासून दर स्थीर आहे. प्लॉट खरेदीचा व्यवहार बारमाही सुरु असतो.

– अतुल मांगुळकर, क्रेडाई अध्यक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × 3 =