Yavatmal APMC : यवतमाळ जिह्यातील एपीएमसी मध्ये का होतोय शेतकऱ्यांवर अन्याय ? खरीप हंगामानंतर शेतकऱ्यांची सोयाबीन मोठ्या प्रमाणात निघाली असून ते विकण्यासाठी शेतकरी शासकीय बाजार यार्ड म्हणजेच यवतमाळ सह जिल्ह्यातील विविध तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणत असताना शेतकऱ्यांना आपला माल ठेवण्यासाठी येथे जागाच नाही आहे.शेतकऱ्यांसाठी जी जागा एपीएमसी मध्ये ठेवण्यात आली आहे,त्या जागेवर मोठ्या प्रमाणात खाजगी आणि लायसन्सी व्यापाऱ्यांनी आपला सोयाबीनचा माल ठेवला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना येथे प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे.यवतमाळ येथील मोठे मोठे शेड हे शेतकऱ्यांसाठी असून त्या ठिकाणी शेतकरीचे कृषी उत्पादन आणून,तो माल खरेदी करण्यापूर्वी शेडमध्ये ठेवण्यात येते. पण सध्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि इतर कृषी माल माल शेड बाहेर तर व्यापाऱ्यांचे माल मोठ्या प्रमाणात शेडमध्ये ठेवण्यात आले आहे.
यवतमाळच नाहीतर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील एपीएमसी शेडमध्ये खाजगी व्यापाऱ्यांचे कृषी माल पडलेले असून शेतकऱ्यांना हिवाळ्यात आपला माल खुल्या आकाशाखाली ठेवण्याची पाळी आली आहे.सध्या हिवाळ्यात आभाळाचे दिवस आहे,केव्हाही मोठ्या प्रमाणात पाऊस पडू शकतो,त्यामुळे खूप मेहनत आणि काबाड कष्टाने पिकवलेला सोयाबीनचा माल खुल्या आकाशात पडलेला असल्याने जर पाऊस आला तर या ठिकाणी कष्टकरी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भाव तर वाढलेच नाही.
राज्यात एकीकडे गेल्या दोन वर्षापासून सोयाबीन आणि कापसाला भाव नाही,तर दुसरीकडे राज्यात नवीन सरकार अमलात आल्यानंतरही भाव वाढण्याचे काही संकेत सध्या नाही. त्यात या खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन झाले आहे.निवडणूक झाल्यानंतर कापूस सोयाबीनचे भाव वाढेल सही शेतकऱ्यांना आशा होती पण सोयाबीनचे भाव सध्या वाढले नाही. त्यामुळे आता आपल्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी शेतकरी कमी किमतीत का होईना मोठा नुकसान सहन करून सोयाबीन विकायला विवश झाले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ विविध तालुक्यातील एपीएमसी मार्केट यार्ड मध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक वाढली आहे.मात्र खाजगी व्यापाऱ्यांद्वारे सोयाबीनचा माल खरेदी करताना आपल्या परीने सोयाबीनची प्रतवारी ठरविण्यात येत आहे.यामुळे जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी सोयाबीनला 3200 ते 4300 प्रतिक्विंटल दर देण्यात येत आहे. तर दुसरीकडे बाजार समितींच्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी बनविण्यात आलेल्या शेडमध्ये व्यापाऱ्यांचे माल ठसाठस भरलेले आहे.आपल्या हक्काची जागा असताना सुद्धा जिल्ह्यात हजारो शेतकरी आपला माल आभाळआच्छादित खुल्या आकाशात ठेवण्यासाठी मजबूर झाले आहे.
दोन दिवसांपासून आभाळात ढग.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आभाळात ढग दाटून आलेले असून जिल्ह्यात सध्या आभाळाचे वातावरण आहे यामुळे पाऊस केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे बाजार समितीच्या मध्ये जे शेतकरी सोयाबीनचा माल आणत आहेत.ते खुले आकाशात असल्याने पावसामुळे भिजून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान होण्याची सुद्धा शक्यता आहे.आपला माल विकण्यापूर्वी आकाशाखाली पडलेला असल्याने नुकसान होईल या चिंतेने शेतकरी ग्रासले आहे यवतमाळ बाबुळगाव आणि इतर बाजार समितीच्या शेडमध्ये व्यापाऱ्यांचा सोयाबीन भरलेला असल्याने शेतकऱ्यांना उघड्यावर आपला माल ठेवावे लागत असल्याचे चित्र आहे. बाजार समितीच्या यामध्ये बनविलेले शेडमध्ये शेतकऱ्यांना आपला सोयाबीन ठेवण्यासाठी जागा नाही ही परिस्थिती आहे,तर दुसरीकडे खरेदी झालेला सोयाबीन आणि इतर खाजगी व्यापाऱ्यांनी खेडा खरेदीतून खरेदी केलेला सोयाबीन सुरक्षित ठेवण्यासाठी बाजार समितीच्या विविध शेडमध्ये एका प्रकारे कब्जा करून ठेवला असल्याचे चित्र आहे.त्यमुळे बाहेर पावसाळी वातावरण असल्याने आता आपला सोयाबीन कुठे ठेवावा या चिंतेत शेतकरी दिसत आहेत.
बाबुळगाव बाजार समितीला शेतकऱ्यांच्या साकडे.
बाबुळगाव बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक वाढली आहे, पण या ठिकाणी जागा नसल्याने शेतकऱ्यांना आभाळी वातावरणात खुल्या आकाशात सोयाबीन ठेवावे लागत असल्याने,सोयाबीन पावसात भिजून नुकसान होण्याची मोठी चिंता आहे,हे चित्र पाहता अनेक शेतकऱ्यांनी आज बाजार समिती पदाधिकाऱ्यांना आपला बहुमोल सोयाबीन माल ठेवण्यासाठी येथील शेडमध्ये जागा मोकळी करून द्यावी अशी विनंती केली अशी माहिती तालुक्यातील आसेगाव देवीचे सरपंच सचिन चव्हाण यांनी माध्यमांसोबत बोलताना दिली.