Yamaha Auto Expo 2025 : ही आहे Yamaha वाहनांची नवी आधुनिक रेंज ! Yamaha Sport’s Bike ?

Yamaha Auto Expo 2025 : देशाची राजधानी दिल्लीमध्ये नुकतेच भारतात सर्वात मोठा वाहन आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रदर्शन अर्थातच AUTO Expo 2025 आयोजित झाला.

यात विविध प्रकारचे आधुनिक फीचर्स असलेले चार चाकी वाहन आणि बाईक्स मोपेड स्कूटर्स विविध कंपन्यांनी आपल्या तांत्रिक वैशिष्ट्यांसह प्रदर्शित केले.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

मात्र या ऑटो Yamaha Auto Expo 2025 मध्ये यामाहा या जगप्रसिद्ध ऑटोमोबाईल्स कंपनीने सादर केलेल्या विविध प्रकारच्या दुचाकी बाईक्स ची भारतातील वाहन शौकिनांना ओळख करून दिलेली आहे.

यामाहा कंपनीने या वाहन प्रदर्शनात यामाहा स्कूटर पासून ते सुपर स्पोर्ट्स आणि एडवेंचर बाइक्स पर्यंत आपली भव्य रेंज या आंतरराष्ट्रीय ऑटोस्पमध्ये सादर करून या आधुनिक वाहनांना भारतात विक्रीसाठी लॉन्च केले आहे यात यामाहाची स्पोर्ट्स बाईक या प्रदर्शनीमध्ये सर्वांच्या नजरा खिळवून ठेवत होती.

त्यामुळे आपण पाहूया ऑटो Yamaha Auto Expo 2025 मध्ये सादर झालेल्या या YAMAHA वाहनांचे वैशिष्ट्ये आणि टेक्नॉलॉजी…..

आंतरराष्ट्रीय ऑटो Yamaha Auto Expo 2025 मध्ये विविध ऑटोमोबाईल कंपन्यांचा प्रसिद्ध यामाहा ऑटोमोबाईल्स कंपनीने आपल्या आधुनिक तम आणि आकर्षक फीचर्स असलेले अनेक दोन चाकी वाहनांची रेंज कशी आहे याची भारतीयांना ओळख करून दिलेली आहे.

आपल्या विशेष वाहन स्टैंड वर आधुनिक आणि आकर्षक फीचर्स असलेली स्पोर्ट्स बाईक स्कूटर सुपर स्पोर्ट ची रेंज सादर केली होती या माझ्या या वाहनांची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांचे तंत्रज्ञान विशिष्ट डिझाईन आणि खास शाळेत प्रदर्शन यामुळे या वाहनांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Yamaha Auto Expo 2025 : कंपनीच्या या आधुनिक बाइक्स, स्कूटर्सचे प्रदर्शन.

या एक्स्पो मध्ये यामाहा कंपनीने एकापेक्षा एक सरस असे दुचाकी वाहनांचे प्रदर्शन आणि काही नवीन वाहनांचे लॉन्चिंग ही केले.यात यामाहा टॅनेरे 700 (Yamaha Tenere 700),यामाहा लँडर (Lander 250) यामाहा एमटी 09 (MT 09),यामाहा आर सेवन (Yamaha R 7),यामाहा आर थ्री (Yamaha R 3),यामाहा एनएमएक्स 155 (NMX 155),यामाहा एफझेड-एस एफआय. डीएलएक्स (FZ-S Fi DLX) या रोमांच घडवून आणणाऱ्या वाहनांचा समावेश आहे.

ही आहेत यामाहा वाहनांची वैशिष्ट्ये.

YAMAHA Tenere 700

Yamaha Auto Expo 2025

यामाहा टेनरी 700 ही यामाहा टू मोबाईलची एडवेंचर बाईक आहे.नवीन आणि आधुनिक असलेली ही दुसऱ्या की बाईक या Yamaha Auto Expo 2025 मध्ये प्रदर्शित करण्यात आली या बाईकला 41 मीमी.के वाय बी इन्व्हर्टेड FORC देण्यात आला आहे जो 210 मिलिमीटर Wheel Travel प्रदान करते. यात 240 मिमी.ग्राउंड क्लियरंस आणि  पूर्ण Adjustable Monoshoc दिलेले आहे.ही बाईक ट्रायंफ टायगर 660 स्पोर्ट,होंडा एक्सएल 750 ट्रांसलेप आणि सुझुकी V Storm 800 DE सारख्या गाड्यांसोबत भारतात लॉन्च होणार आहे.जी भारतात बाईक जगतात एक नवी स्पर्धा निर्माण करेल.

YAMAHA Lendar 250

Yamaha Auto Expo 2025

यामाहा लेंडर 250 या वाहनाला कंपनीने ड्युअल स्पोर्ट्स बाईक स्वरूपात बनविलेले आहे. ही एक Dirt Bike आहे. यात लांब ट्रॅव्हल्स सस्पेन्शन आणि अपवेस्ट एक्झास्ट असेल.यामाहा लेंडर 250 मध्ये 250 cc इंजिन देण्यात आला आहे,जो बहुतांश FZ 25 वाहन मध्ये वापरला जात असतो. या इंजिंमुळे lendar 250 ला 20 5ps तसेच 20.1Nm पॉवर देते,याचे खास वैशिष्ट्य म्हणजे या बाईक मध्ये 6 Speed गिअर बॉक्स दिलेले आहे.

YAMAHA MT-09

Yamaha Auto Expo 2025
YAMAHA MT-09

YAMAHA ऑटोमोबाईल ने यामाहा एमटी 09 (MT 09) ही नवी अशी Hypersports बाईक लाँच केलेली आहे.यात 890 cc इंजिन दिले आहे,जे 3 सिलेंडरचा  लिक्वीड Cool ठेवणारा इंजिन आहे.हे 119PS पॉवर तसेच 93 Torc निर्माण करते.सोबतच 298mm dual Disc Break,245mm चे Riar Disc Breaks दिले आहे.याला यामाहा ने लवकरच भारतात लाँच करण्याची तयारी केलेली आहे.जगात यामाहाच्या या बाईक चे प्रतिस्पर्धी Traemph Street Triple 765, Kawasaki Z900 आणि Ducati Monster,BMW F 900 राहण्याची शक्यता आहे.

YAMAHA R7

Yamaha Auto Expo 2025
YAMAHA R7

यामाहा कंपनीने Yamaha R7, याला यावर्षी भारतात लॉन्च केले आहे.ही एक सुपरस्पोर्ट बाईक आहे, जी यामाहा R6 शृंखला मधील आहे. यात 689cc, लिक्विड-कूल्ड, पॅरलेल-द्विन इंजिन दिलेला आहे.जो 73.4PS पॉवर आणि 67Nm टॉर्क उत्पन्न करतो.या बाईकमध्ये 6-स्पीड गियर बॉक्स, स्लिप-एंड-असिस्ट क्लच आणि ऑप्शनल क्विक शिफ्टर आहे यामाहा R7 मध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह 5-इंच TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे.

YAMAHA R3

Yamaha Auto Expo 2025

या अंतरराष्ट्रीय ऑटो एक्स्पो 2025 मध्ये यामाहा ने R3 प्रदर्शित केली.याला 321cc लिक्विड-कूल्ड, द्विन-सिलिंडर इंजिन दिले आहे,यातून 42PS चा पॉवर आणि 29.5Nm टॉर्क निर्माण होतो.यामाहा R3 ला 6-स्पीड गियर बॉक्स दिला आहे. भारतात लाँच झाल्यानंतर ही Bike तब्बल 4 लाख 60 हजार रुपये (एक्स-शोरूम) मध्ये मिळेल.

YAMAHA NMX 155

Yamaha Auto Expo 2025
YAMAHA NMX 155

यामाहा Nmax 155 ही एक मॅक्सी स्कूटर आहे.या स्कूटरला 155cc इंजिन दिलेले आहे, जो 15.1PS पॉवर आणि 13.5Nm टॉर्क निर्माण करते. Nmax 155 मध्ये डिजिटल असा इन्स्ट्रूमेंट क्लस्टर, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, कीलेस इग्निशन आणि ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम दिलेला आहे. भारतात लाँच झाल्यानंतर ही आधुनिक स्कूटर मार्केट मधील अप्रिलिया Aprilia XSR 160 आणि हिरो झूम 160 या वाहनांना टक्कर देऊ शकते.

यामाहा FZ-S Fi DLX हायब्रिड

Yamaha Auto Expo 2025

यामाहा ने FZ-S Fi DLX ही हायब्रिड बाईक ऑटो एक्स्पोमध्ये प्रदर्शित केली.यामध्ये 149cc, एअर-कूल्ड, सिंगल- सिलिंडर इंजिन आहे,ही हायब्रिड सहाय्य प्रणाली असेल.या हायब्रिड तंत्रज्ञानामुळे बाईकला अधिक इंधन कार्यक्षमता आणि पॉवर बूस्ट मिळतो.यामाहा FZ-S Fi DLX हायब्रिडमध्ये स्टायलिंग, टाकी इंटिग्रेटेड इंडिकेटर्स आणि संपूर्ण एलईडी लाइटिंग सेटअप आहे.

भारतीय बाईक बाजारात एक नवा बाईक पर्व सुरू होण्याची शक्यता.

या ऑटो एक्स्पो 2025 मध्ये यामाहा कंपनीने आपली विविध आधुनिक अश्या दुचाकी वाहनांची रेंज सादर केली आहे,यात स्कूटर ते सुपरस्पोर्ट्स आणि अॅडव्हेंचर बाइक्सचे विविध वाहने प्रदर्शित आणि लाँच झाली आहेत.

यामाहाच्या या वाहनांची आकर्षक डिझाइन,डिजिटल सिस्टम,आधुनिक तंत्रज्ञान आणि फिचर्स वैशिष्ट्यांसह कंपनीने भारतीय बाजारात एक नवा बाईक पर्व सुरू करण्याची तयारी केली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

twenty − twelve =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.