Withdraw PF through UPI : केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थातच ईपीएफओ {EPFO}ने देशभरातील PF धारकांना मोठी सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे.देशभरात कोट्यावधी शासकीय,गैरशासकीय,निमशासकीय सेवांमध्ये कार्यरत कर्मचारीकरिता EPF {Employee Provident Fund} तरतूद असते.
कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पीएफ साठी मूळ वेतनातून जेवढा निधी EPF साठी कापला जातो,तेवढाच निधी केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचे पीएफ खात्यात जमा करतो.यासाठी केंद्रीय निधी संघटना {ईपीएफओ}कार्यरत आहे.ही संघटना आता देशभरातील कोट्यावधी पीएफ धारकांना यूपीआयच्या माध्यमातून आपल्या एटीएम कार्ड मधून पीएफ चा पैसा काढण्याची सुविधा देणार आहे.{UPI Bank ID}.याबाबत काय प्रक्रिया असेल हे आपण या माध्यमातून आता जाणून घेऊया.
भारतात केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना देशभरात PF जमा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कार्यरत आहे.आता या संघटनेने इपीएफ धारक कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे.
इपीएफ धारक कर्मचाऱ्यांना जसा आपल्या बँक खात्यात एटीएम मधून पैसा काढता आणि UPI ID माध्यमातून पैसा काह्त्यात टाकता येते,अगदी तसाच आपला पीएफ पैसा UPI ID माध्यमातून आपल्या बँक खात्यात ट्रान्स्फर करता येणार आहे.पीएफ दह्रक कर्मचारी आता पेटीएम,फोन पे,किंवा गुगल पे UPI आयडी वापरून आपली पीएफची रक्कम थेट आपल्या बँक खात्यात ट्रान्सफर करू शकणार आहे.यातून PF चा पैसा त्यांच्या खात्यात येऊ शकेल.या सुविधेचा देशभरात कोट्यावधी PF धारक कर्मचारी आणि सदस्यांना फायदा मिळेल.
Withdraw PF through UPI : जाणून घ्या अशी आहे ही योजना
यासंदर्भात नुकतेच समोर आलेल्या माहितीनुसार ईपीएफओ ने EPF धारकांच्या सुविधासाठी एक यूपीआय आधारित इंटिग्रेशन करिता योजना तयार केलेली आहे.{UPI Based Integration System}.आगामी 2 ते 3 महिन्यात ही सुविधा EPF धारकांसाठी सुरू करण्यात येईल.
या माध्यमातून आता एटीएम द्वारे ईपीएफची रक्कम काढण्यासह त्याला यूपीआय आयडी माध्यमातून बँक खात्यात ट्रान्सफर करण्याची सुविधा मिळेल.
या क्षेत्रातील तज्ञांच्या मते सध्या पीएफ रकम काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना खूप वेळ लागतो, जर ही योजना EPFO ने अमलात आणली तर अगदी काही क्षणातच कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात त्यांचा पीएफ चा पैसा जमा होणार आहे.
- विशेष म्हणजे EPF धारकांसाठी सध्या यूपीआय द्वारे गुगल पे,फोन पे, पेटीएम या पेमेंट अप्लिकेशन माध्यमातून काढण्याची सुविधा अद्याप सुरू करण्यात आलेली नाही.{UPI Payment Applications}
- मात्र ही रक्कम काढण्याची किंवा केंद्रीय प्रणालीतून आपल्या बँक खात्यात याची रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी प्रक्रिया खूप सोपी असेल.
- जर पीएफधारक यापूर्वीच गुगल पे फोन पे पेटीएम एप्लीकेशन साठी UPI ID वापरत असेल तर त्यांच्यासाठी ही प्रक्रिया सोपी असेल.
- यासाठी EPFO कडून payment Apps वर सुविधा सुरु झाल्यावर याला डाऊनलोड केल्यावर आणि EPFO चा यूपीआय ID एप्लीकेशन झाल्यानंतर ईपीएफओ कडून वरील pay Apps वर EPF धारकांसाठी PF विड्रॉल हा ऑप्शन मिळेल.
- मात्र सध्या ही सुविधा इएफओ कडून सुरू न झाल्याने यूपीआय Pay Apps मध्ये सध्या ईपीएफ Withdrawal हा ऑप्शन सध्या दिसणार नाही.
केंद्रीय ईपीएफओ प्रणालीद्वारे धारकांना UPI माध्यमातून PF ची रक्कम आपल्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यासाठी ही सेवा सुरू झाल्यावर,यासाठी पेमेंट एप्लीकेशन वर खालील प्रमाणे ऑप्शन्स येणार आहे.
- यानुसार ईपीएफओ द्वारे सदस्यत्व मिळालेल्या कर्मचाऱ्याला आपला UAN नंबर यासाठी नमूद करावा लागेल.
- यानंतर कर्मचाऱ्यांना जमा झालेल्या रकमेत किती रक्कम काढायची आहे ती रक्कम नोंदवावी लागेल.
- यात आरोग्यासाठी वैद्यकीय गरज
- होम कन्स्ट्रक्शन.
- लग्न किंवा इतर कौटुंबिक बाबीसाठी खर्चासाठी.
- नियमानुसार जेवढी रक्कम हवी तितकी नमूद करावी लागेल.
डिजिटल वॉलेटमध्येही रक्कम त्या EPF धारक कर्मचाऱ्यांना दिसेल.
यानंतर संबंधित कर्मचारीला त्याच्या रजिस्टर मोबाईल क्रमांक वर या प्रणाली द्वारे OTP येईल.तो ओटीपी नमूद केल्यानंतर कर्मचाऱ्यांचा पीएफ चा पैसा तात्काळ त्याच्या बँक खात्यात जमा होईल,किंवा त्याच्या डिजिटल खात्यात सुद्धा ही रक्कम जमा करता येईल.यानंतर डिजिटल वॉलेटमध्येही रक्कम त्या EPF धारक कर्मचाऱ्यांना दिसेल.
E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागेल
पीएफ धारक कर्मचाऱ्यांना आपल्या पीएफ खात्यामधून पीएफ रक्कम काढण्यासाठी त्याला ईपीएफओ कडून देण्यात आलेल्या प्रॉव्हिडंट फंड खात्याची EKYC यापूर्वी पूर्ण करावी लागेल.ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्याला त्याचा आधार कार्ड,पॅन कार्ड,आणि बँक खात्याची डिटेल्स द्यावी लागेल.ही केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली किंवा नाही याची EPF धारक कर्मचाऱ्याला ऑनलाईन तपासणी करण्याचीही सुविधा उपलब्ध असेल. यासाठी पीएफ धारक कर्मचाऱ्यांना ईपीएफओ ची अधिकृत शासकीय वेबसाईट epfindia.gov.in वर लॉगिन करून माहिती घेता येईल.