देशात कुठेही आता वापरू शकाल आपल्या घरातीलच ‘Wi-Fi Connection.

देशात कुठेही आता वापरू शकाल आपल्या घरातीलच ‘Wi-Fi Connection.

देशात कुठेही आता वापरू शकाल आपल्या घरातीलच ‘Wi-Fi Connection.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

आधुनिक डिजिटल युगात इंटरनेट आणि वायफाय द्वारे स्मार्टफोन लॅपटॉप आणि कम्प्युटरमध्ये कार्यालयीन,खाजगी काम करण्यासाठी डाटा ची खूप गरज असते.यासाठी इंटरनेट नेटवर्क आणि वायफाय नेटवर्क खूप गरजेचे झालेले आहे.देशात ही 5 जी सेवा सुरू झालेली आहे. पण वाय-फाय वापरण्यासाठी सगळ्यांना आपल्या कामाच्या जागेवर राहावे लागते.पण आता आपण देशात कुठेही जावून राहत असतील,प्रवासात असतील,आपल्या घरातील वायफाय कनेक्शन आपण वापरू शकाल. यासाठी कोणतेही इतर वायफाय कनेक्शनची गरज राहणार नाही. हा पर्याय बीएसएनएल या शासकीय टेलिकॉम कंपनीने आपल्या ग्राहकांना देण्यास सुरुवात केली आहे.

BSNL तुटलेले ग्राहक पुन्हा वळत आहेत.

भारतात स्मार्टफोन येताच बीएसएनएल आणि इतर टेलिकॉम कंपन्यांचे रिचार्ज आणि वायफाय इंटरनेट डाटा साठी सेवा सुरू होते.आता ही या कंपन्यांकडून इंटरनेट आणि वायफाय सेवा दिली जाते,पण खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या या सेवा महागल्या आहेत. त्यामुळे अगदी स्वस्त रिचार्ज पर्याय बीएसएनएल ने ग्राहकांना देण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे लोक याकडे पुन्हा वळत आहे. बीएसएनएल रिचार्ज प्लानची सर्वात स्वस्त किंमतीत केली आहे.

खाजगी टेलिफोन कंपन्यांकडून 5 जी सेवा सुरू केल्यानंतर मागील काही वर्षात भारतीय टेलिकॉम कंपनी बीएसएनएलच्या एक कोटी 80 लाख ग्राहकांनी इतर टेलिकॉम कंपन्यांकडून रिचार्ज आणि टेलिफोन सेवा घेतली होती. सध्याही बीएसएनएल कडून 5 जी सेवा देण्यात येत नाही पण या शासकीय टेलिकॉम कंपनीने आपला डिजिटल इंटरनेट आणि वायफायचा, स्वस्त रिचार्ज प्लान देण्याचा आवाका वाढविणे सुरु केले आहे.यात भर म्हणून आता बीएसएनएल कडून देशभरात एक लाख वायफाय सेटअप पॉईंट उभारण्यात येत आहे,यासाठी हजारो कोटींचा बजेटसुध्दा बनविण्यात आला आहे.

सहा हजार कोटी रुपये खर्च एक लाख वायफाय कनेक्शन BSNL उभारणार.

सध्या बीएसएनएल कडून ग्राहकांना फोरजी सेवा देण्यात येत आहे,5जी पेक्षा बीएसएनएल थोडा मागे आहे. पण ही शासकीय टेलिकॉम कंपनी इंटरनेट वाय-फाय टेक्नॉलॉजी मध्ये आपला आवाका वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. BSNL कंपनीने देशभरात 6000 कोटी रुपये खर्चून एक लाख (Wi-Fi connection) नवीन टॉवर उभारण्याचे काम देशभरात सुरू आहे. बीएसएनएलचे हे 4-जी टॉवर आता 5-जी कनेक्शनला तात्काळ सपोर्ट करतील.

देशभरात कुठेही वापरू शकाल घरातील Wi-Fi Connection.

आपल्या घरात किंवा कार्यस्थळी वायफाय कनेक्शन असेल तर तेथे बसूनच त्याचा लाभ घ्यावा लागते, किंवा मर्यादित क्षेत्रातच इंटरनेट आणि वायफाय चा लाभ मिळतो. पण आता बीएसएनएल आपल्या ग्राहकांना वायफाय सुविधा देण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी वर काम करणे सुरू केली आहे. बीएसएनएलच्या या महत्त्वाच्या प्रकल्पातून बीएसएनएलचे वायफाय कनेक्शन घेणारे कस्टमर आपल्या घरातील वायफाय कनेक्शन भारतात कुठेही वापरू शकणार आहे. बीएसएनएलने फायबर टू द होम ‘ ( FTTH) कनेक्शन सेवा सुरू करण्याची सुरुवात केली आहे.

या योजनेअंतर्गत FTTH टॉवरच्या मदतीने भारतात कुठेही (Wi-Fi connection) वाय-फाय कनेक्टिव्हिटी बीएसएनएलच्या ग्राहकांना मिळणार आहे. प्राथमिक टप्प्यात भारतात हा वायफाय कनेक्शन प्रकल्प मुंबई, दिल्ली आणि केरळमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. आपल्या घरातील वायफाय कनेक्शनची सेवा आता स्मार्टफोन लॅपटॉप युजर्स देशात कुठेही FTTH सेवेतून घेवू शकणार आहेत. आपला स्वतःचा वायफाय कनेक्शन चा डाटा मिळत असल्याने ग्रहाची इतर कोणाही टेलिफोन कंपनी किंवा वायफायसाठी टेक्नॉलॉजी प्रॉब्लम मध्ये अडकणार नाहीत, किंवा त्यांना कुठेही गेल्यास वाय-फाय कनेक्टिव्हिटीसाठी पुन्हा (Wi-Fi connection) वाय-फाय पासवर्ड किंवा यूजर आयडी ची गरज भासणार नाही.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four + 11 =