Weather Forecast : राज्यात अनेक जिल्ह्यात 21 आणि 22 मार्चला अवकाळी पाऊस आणि गारपीटची शक्यता?

Weather Forecast : सध्या उन्हाळ्याचा वातावरण सुरू असून मार्च महिन्यापासून महाराष्ट्रात कडक ऊन पडण्याला सुरुवात झालेली आहे.सोबतच महाराष्ट्रात  तापमान वाढला असताना दर दिवशी पारा चढत आहे.मात्र या बदलत्या ऋतूंमध्ये आता राज्यात वातावरणात पुन्हा मोठा असा बदल होणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहे.वातावरणात अचानक मोठा बदल होऊन महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

राज्यात अनेक जिल्ह्यात वाढली वारे,अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता.

राज्यात अनेक जिल्ह्यात वाढली वारे,अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांच्या नुकसानीची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान राज्याच्या हवामान खात्याचे अपडेट नुसार सध्या अरबी समुद्रात अत्यंत कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

यामुळे महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे.दरम्यान विदर्भात लवकरच वातावरणात बदल होऊन अवकाळी पाऊस कोसळू शकते,तर या दरम्यान राज्यात काही जिल्ह्यांमध्ये वातावरणात बदल न होता अधिक उष्णतेची लाट निर्माण होण्याची सुद्धा या खात्याने शक्यता वर्तवली आहे.

राज्यात तापमानात वाढ,पण काही जिल्ह्यात वातावरण बदलणार.

गेल्या काही दिवसापासून राज्यात तापमानात वाढ झालेली आहे.{Summer Heat}.अनेक जिल्ह्यांमध्ये पारा चढत आहे.सध्या राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान हा 40°च्या जवळपास आहे.तर काही जिल्ह्यात पारा यापेक्षा जास्त वर गेलेला आहे.त्यामुळे अनेक जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट दिसत आहे.

तापमानात वाढ होत असल्याने आता दुपारच्या वेळी रस्ते सामसूम दिसत आहे,उन्हामुळे दुपारी लोक घराबाहेर पडणे टाळत आहे. दरम्यान आगामी काळात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असली तरीही पुढील दोन ते चार दिवसांमध्ये महाराष्ट्रात काही जिल्ह्यामध्ये वातावरणात अचानक मोठा बदल दिसणार आहे.

यादरम्यान काही जिल्ह्यांमध्ये  जोरदार वादळी वारे आणि अवकाळी पाऊस सह गारपीट होण्याचीही शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.{Weather Forecast}.एकूणच देशात अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्याच्या वातावरणात हा बदल होण्याची शक्यता दिसत आहे.

Weather Forecast : विदर्भात पारा तब्बल 40 डिग्री सेल्सिअसच्या आसपास .

उल्लेखनीय म्हणजे महाराष्ट्रात होळीपूर्वीच तापमानात वाढ व्हायला सुरुवात झाली.विदर्भात अनेक जिल्ह्यात सध्या तापमान वाढला असून पारा हा तब्बल 40 डिग्री सेल्सिअसच्या आसपास स्थिर आहे.

दरम्यान यंदाचा उन्हाळा मार्चपासूनच आपला रंग दाखवू लागल्याने  येणाऱ्या एप्रिल आणि मे महिन्यात तापमान जास्त राहणार असल्याचे संकेत आहे.या आठवड्यात शेवटच्या 3 दिवसात विदर्भात वातावरणात बदल आणि अवकाळी आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

विदर्भातील अनेक जिल्ह्यात 21 ते 22 मार्च दरम्यान वातावरणात अचानक बदल होऊन वादळी पाऊस कोसळणार असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

  • विदर्भातील अमरावती आणि अकोला हे दोन जिल्हे वगळता इतर सर्व जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडू शकते.
  • या दरम्यान जवळपास प्रती तास 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

या जिल्ह्यात 21 22 मार्चला अवकाळी पावसाची शक्यता

राज्याच्या हवामान खात्याने जो अंदाज वर्तविला आहे त्यानुसार आता राज्यात काही जिल्ह्यांमध्ये 21 मार्च आणि 20 मार्च दरम्यान तापमानात घट होऊन उष्णता कमी होणार आहे.या दरम्यान गारपीट सह वादळी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे,दरम्यान १९ मार्चनंतर विदर्भानी मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट सह वादळी पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

राज्याचे हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भात 21 आणि 22 मार्च दरम्यान चंद्रपूर,गोंदिया,गडचिरोली भंडारा,नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

तर वाशीम आणि यवतमाळ मध्ये 21 मार्च दरम्यान अवकाळी  पावसाची शक्यता आहे.

या जिल्ह्यामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस उसळण्याची आणि गारपीटची सुद्धा शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

हवामान खात्याच्या एकंदरच्या अंदाजामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांची आपल्या पिकासंदर्भात चिंता वाढलेली आहे.

ब्रह्मपुरी येथे मंगळवारी राज्यात सर्वाधिक 41.5 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद.

दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार अकोला आणि अमरावती जिल्ह्यात तापमानात घट होणार नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.विदर्भात सध्या तापमान वाढलेला आहे.नागपूर शहरात मंगळवारी 39 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली.

तर राज्यात ब्रह्मपुरी येथे मंगळवारी राज्यात सर्वाधिक 41.5 डिग्री सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद झाली.20 मार्चला यवतमाळ वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात उष्णता वाढणार आहे,या जिल्ह्यात तापमानाचा पारा  वाढण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केलेला आहे{Yellow Alert}.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

2 × one =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.