वाशिम जिल्ह्यातील रखडलेली विवीध विकास कामे लागणार मार्गी.
वाशिम जिल्ह्यातील विविध कामे गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेली आहेत त्या सर्व विकास कामा बाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे वाशीम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसुफसेठ पुंजानी यांनी आज १२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार साहेब यांची विधानभवन नागपूर येथे भेट घेऊन विस्तृत चर्चा केली, त्यामध्ये कारंजा येथील १०० खाटांचे स्त्री रुग्णालय व नवजात शिशु रुग्णालयासह ट्रामा केअर सेंटर.
कच्छी मेमन समाज जात पडताळणी बाबतचे प्रश्न, वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसानंतर कपाशी पिकांवर झालेला बोन्ड अळीचा प्रादुर्भाव, लघु पाटबंधारे विभागातील ररखडलेली कामे आदी बाबत मा.अजितदादा पवार यांनी सांगितले की सर्व कामे प्राधान्याने मार्गी लावणार असल्याचे सांगितले, त्याच बरोबर राज्य कर्मचाऱ्यांच्या जुनी पेंशन योजने बाबत सकारात्मक विचार करणार असल्याचे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले, यावेळी श्रीमती सोनालीताई ठाकूर पक्ष निरीक्षक अमरावती, श्री धैर्यशील काकडे बारामती,श्री प्रमोदजी हिंदुराव व जावेद जकरिया अकोला आदी उपस्थित होते.