वाऱ्हाशेत शिवारात केली वाघाने बकरीची शिकार.
बकरीची नरडी फोडून रक्ताचा घोट घेतल्यानंतर गाईवर हल्ला गाय जखमीं.
राळेगांव तालुका प्रतिनिधी: राळेगांव शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाऱ्हा येथे आज दि. २२ नोव्हेंबर रोजी सांय ५ च्या सुमारास शंकर घोडाम,हे वाऱ्हा़ शेतशिवारातून बकऱ्या व गाई चारून गावाकडे येत असतांना वाऱ्हा गावाच्या काही अंतरावर वाघाने अचानक कळपावर झडप घालून एका बकरीची नरडी फोडून रक्ताचा घोट घेतला,घोट घेतल्यावर बकरीला तिथेचं सोडून गाईवर हल्ला करून जखमीं केल्यानंतर वाघ तिथून पळून गेला.
वाघाने बकरीची शिकार केल्याची बातमी वाऱ्हागांवात वाऱ्यासारखी पसरताचं वाऱ्हा गांव शिवारात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सद्या आता शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम सुरू आहे. गहू,हरभरा, या पिकांची लागवड केली आहे. या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना केव्हा ही शेतात जावे लागते. आदिचं पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात १०-२० रूपये टाकून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.
त्यात आता वाघाने भर घातली आहे. शेतकरी ना घारका ना घाट का? अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. गावकऱ्यांनी फोनद्वारे वन विभागाला वाघाने बकरीची शिकार केल्याची माहिती देऊन वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.