Wardha-Nagpur-Pune : वर्धा नागपूर पुणे प्रवास करतात का? मग आता नेहमीपेक्षा कमी तिकीट दर झालेत.
Wardha-Nagpur-Pune : वर्धा नागपूर पुणे प्रवास करतात का? मग आता नेहमीपेक्षा कमी तिकीट दर झालेत.
आता एसटी पेक्षा खूप कमी दरात सर्वांना खाजगी ट्रॅव्हल्स ने वर्धा,नागपूर,पुणे आणि इतर शहरात प्रवास करता येईल.विदर्भातील लोक मोठ्या प्रमाणात राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसने प्रवास करतात. महामंडळाने ज्येष्ठ नागरिक,महिलांना आणि आमदार खासदारांना एसटी बस मध्ये तिकीट दरात सुविधा दिल्या आहेत. त्यामुळे असे प्रवासी एसटी बसने प्रवास करायला प्राधान्य देतात. एसटी महामंडळाच्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने आता खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी आता एसटी महामंडळासमोर तिकीट दरामध्ये स्पर्धा निर्माण केली आहे.अनेक ट्रॅव्हल्स कंपन्यांनी आपल्या बसच्या प्रवास टिकीट एसटी पेक्षा कमी केले आहे.
खाजगी ट्रॅव्हल्स बुकिंग मध्ये वाढ.
आता नागपूर पुणे औरंगाबाद प्रवासासाठी खाजगी ट्रॅव्हल्स बसेसच्या बुकिंग मध्ये वाढ होताना दिसत आहे. सणासुदीच्या काळात ट्रॅव्हल्स तिकीट एसटी बस पेक्षा कमी झाल्याने प्रवाशांची संख्या याकडे आणखी वाढू शकते.त्यामुळे येणाऱ्या सणासुदीच्या काळात महामंडळाला आर्थिक फटका बसनार आहे.कारण दिवाळीत एसटी महामंडळाचे तिकीट दर काय असेल यावर महामंडळाने अद्यापही निर्णय घेतला नाही.पण खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटी पेक्षा कमी दरात प्रवास करण्यासाठी आधीच आपले तिकीट दर कमी केले आहे.
स्पर्धेत खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी घेतले पुढाकार.
विशेष म्हणजे दिवाळी आणि इतर त्योहारांच्या दरम्यान महामंडळ आणि ट्रॅव्हल्स बसेस मध्ये स्पर्धा होते.ती स्पर्धा तिकीट दरांची असते.मात्र आता एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खाजगी बसमधून कमी दरात प्रवास करण्यासाठी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे.ही पहिलीच वेळ आहे जेव्हा खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी बसेसचे तिकीट मध्ये दरवाढ न करता त्याला आणखी कमी केले आहे.याचे मुख्य कारण म्हणजे एसटी महामंडळाने एसटी बस मध्ये प्रवासात सर्वांना सवलत दिली आहे.महिलांना तर एसटी बस मधून अर्ध्या तिकीट दर मध्ये प्रवास करता येतो.हे पाहता आधी खाजगी ट्रॅव्हल्स एजन्सी सुद्धा महिलांसाठी अर्धी तिकीट सुरू केली होती मात्र ती अल्पकाळासाठी होती.
महामंडळाचा प्रवास दराबाबत निर्णय नाही.
एसटी महामंडळाने दिवाळीचा सण तोंडावर असताना सुद्धा तिकीट दरासंबंधात काहीच निर्णय घेतला नाही. एसटी बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवाळी दरम्यान खूप मोठी असते,आणि या प्रवाशांच्या संख्येचा फायदा घेण्यासाठी खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्या नेहमी पुढाकार घेतात.खाजगी कंपन्या दिवाळी सणापूर्वी अचानक प्रवास भाडेवाढ करीत होत्या.यापूर्वी एसटी बस कर्मचाऱ्यांची ऐन सणासुदी दरम्यान होणारे उपोषण आणि आंदोलन पाहता प्रवाशांनाही खाजगी बसेस शिवाय पर्याय नसतो. हा फायदा तेव्हा कंपन्या घेत होते. जेव्हापासून महामंडळाने प्रवाशांना सुविधा आणि तिकीट दरात कमी केली आहे याचा असर खाजगी बसेसच्या आर्थिक बाबींवर पडला आहे.त्यामुळे आता दिवाळीपूर्वी हा आर्थिक ताण येऊ नये यासाठी खाजगी बसेसच्या प्रवास तिकीट दर कमी करण्यात आला आहे.
यवतमाळातून दररोज खाजगी बसेसच्या शंभर फेऱ्या.
यवतमाळ शहर हा जिल्ह्याचा मुख्यालय आहे येथून दररोज नागपूर चंद्रपूर नांदेड लातूर औरंगाबाद वर्धा पुणे तसेच इतर शहरांसाठी प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.हे पाहता खाजगी ट्रॅव्हल्स दिवसभरात शंभर फेऱ्या होतात,किंबहुना यापेक्षाही जास्त फेऱ्या खाजगी बसेस दुसऱ्या शहरात करतात.या सर्वात यवतमाळ वरून वर्धा नागपूर वर्धा चंद्रपूर दर,,15,20 मिनिटांनी खाजगी बसेस सुटतात. शहरातून यवतमाळ जिल्ह्यात तालुक्याचा व राज्यातील प्रमुख शहरात प्रवास करण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेस आणि खाजगी बसेसची सुविधा आहे.येथून दररोज महाराष्ट्र व इतर प्रांतातील शहरांमध्ये रेल किंवा अन्य साधनांनी प्रवाश्यांना जाण्यासाठी खाजगी कंपन्यांची बसेस मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर धावतात.
हे आहेत खाजगी ट्रॅव्हल्स बसेसच्या दर.
यवतमाळ ते वर्धा नागपूर प्रवासासाठी एअर कंडिशनिंग ट्रॅव्हल्स प्रवासाला 150 रुपये आणि साध्या ट्रॅव्हल्स बसमधून प्रवास करण्यासाठी 100 रुपये प्रवासभाडे लागते तर एसटीच्या शिवशाही बसमध्ये हेच प्रवास करण्यासाठी 170 रुपये आकारले जाते.सुपरफास्ट बससाठी 150 रुपये मोजावे लागते.वर्धा पुणे प्रवासासाठी खाजगी बस मध्ये 800 ते 900,वर्धा ते औरंगाबाद प्रवासासाठी 750 रुपये,वर्धा ते लातूर प्रवासासाठी 650 रुपये प्रवास भाडे आकारले जाते.हे प्रवास भाडे खाजगी ट्रॅव्हल्स बसच्या तुलनेत जास्त झाले आहे.आता ट्रॅव्हल्स बसेसचे चभाडे कमी असल्याने सणासुदीच्या काळात खाजगी ट्रॅव्हल्स कडे प्रवाशांची संख्या वाढू शकते,अशी शक्यता दिसत आहे.