Wardha Crime : इन्स्टाग्रामवरुन अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री,तर राहा सावधान! ,वर्धा मध्ये विदेशी व्यक्तीसोबत मैत्री केली अन् महिलेला लागला 27 लाखांचा चुना.

वर्धा मध्ये विदेशी व्यक्तीसोबत मैत्री केली अन् महिलेला लागला 27 लाखांचा चुना.

विदेशी व्यक्तीसोबत केलेली मैत्री पडली खूप महाग.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

इन्स्टाग्रामवरुन अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री,तर राहा सावधान!

Wardha Crime : आजकाल सोशल मीडिया प्लेटफॉर्म वापराचा खूप ट्रेंड आहे.आणि या प्लॅटफॉर्मवर फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप वर आलेल्या मैत्रीचे मेसेज,आणि जर तो व्यक्ती अनोळखी असेल आणि त्याच्यासोबत जर मैत्री झालीच तरीही सतर्क आणि सावधान राहण्याची गरज आहे.

आज-काल विदेशातून आपल्या सोशल प्लॅटफॉर्मवर दोस्तीचे मेसेज येतात.यापैकी काहींची मैत्री होते तर काही लोक फेक मैत्रीची मेसेज पाठवून नंतर मैत्री करून ठगबाजी करतात.नेमकी अशीच एक घटना वर्धा जिल्ह्यात घडली असून,यात आर्वी मधील एका महिलेला विदेशी व्यक्ती सोबत केलेली इंस्टाग्राम वरील मैत्री खूप महागात पडली आहे.या महिलेला त्या अनोळखी विदेशी मित्राने तब्बल 27 लाख रुपयांचा चुना लावला आहे.

त्या विदेशी मित्र बनलेल्या व्यक्तीने या महिलेला विदेशी गिफ्ट पाठवून नंतर ते कस्टम विभागाने पकडले असल्याची माहिती देत त्या महिलेची (Fraud Case) फसवणूक केली आहे.यात आर्वीतील या महिलेवर दिल्ली मध्ये कस्टम विभागाकडून पोलीस केस लावण्यात येणार असल्याची माहिती देत आणि ती केस टाळण्यासाठी तिच्याकडून वेळोवेळी पैश्यांची मागणी करण्यात आली.यात एकूण 27 लाख 38 हजार रुपये या महिलेकडून उकळण्यात आलेले आहेत.याप्रकरणी आता  फसवणुक झालेल्या महिलेच्या तक्रारीवरून आता वर्धा येथे सायबर पोलिसात (Wardha Police) गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आलेला आहे.

अशी झाली इंस्टा वर मैत्री आणि फसवणूक. ऑनलाईन रकम पाठविण्यास भाग पाडले.

मिळालेल्या माहितीनुसार वर्धा जिल्ह्यातील आर्वी गावात राहणाऱ्या या महिन्याची ‘इंस्टाग्राम’वर एका विदेशी व्यक्तीसोबत ओळख झाली नंतर मेसेजिंग आणि गप्पागोष्टी दरम्यान या दोन्हीमध्ये मैत्री झाली होती. तो मित्र विदेशात राहत असल्याचे सांगत असल्याने तिने मैत्रीही केली होती.

मात्र विदेशी व्यक्ती नक्की विदेशात राहतो की कुठे याची भनक सुद्धा त्या महिलेला लागू देण्यात आली नाही.काही दिवसानंतर मैत्री प्रगाढ होताच त्या विदेशी मित्राने या महिलेला त्याच्याकडून गिफ्ट पाठविण्याची माहिती देण्यात आली. यानंतर हा विदेशातील गिफ्ट असल्याने तो कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडण्याची माहिती त्या विदेशी व्यक्तीने आपल्या या मित्र महिलेला दिली.आणि तिला लाखो रुपयांचा गंडा घातला.

दिल्ली कस्टम विभागाने गिफ्ट आणि रक्कम पकडण्याचा दावा केला.

या मित्राने आर्वी मधील या महिलेला विदेशी गिफ्ट व काही रक्कम पाठविली असून नंतर ते दिल्ली मध्ये कस्टम विभागाने पकडल्याची माहिती तिला देण्यात आली.यादरम्यान तिला केस टाळण्यासाठी वेळोवेळी कस्टम अधिकाऱ्यांना ऑनलाइन युपीआयच्या माध्यमातून पैसे टाकायला सांगितले.

यासाठी UPI account नंबर दिल्या गेले.विशेष म्हणजे तिला पाठविलेले विदेशी चलनाचे नाणे पार्सलमध्ये सापडले आहे आणि पोलिस केस टाळण्यासाठी ऑनलाइन पैसे टाकण्याची भीती दाखविण्यात आली.त्या महिलेवर दिल्ली मध्ये कस्टम विभागाकडून पोलीस केस झाल्याची माहिती देत ती केस टाळण्यासाठी ऑनलाईन रक्कम मागविली जायची.

या महिलेला या फेक कारवाईचा धाक दाखवून घाबरवून टाकून तिला पैसे पाठविण्यास भाग पाडायचे.यामुळे वेळोवेळी त्या विदेशी मित्राने दिलेल्या अकाउंट नंबर वर ही ऑनलाइन रक्कम पाठवायची.पैशांची मागणी होत असल्याने वेळोवेळी भीतीपोटी महिलेने चक्क 27 लाख 38 हजार रुपयांची रक्कम अज्ञात व्यक्तीच्या खात्यावर वेळोवेळी वळती केली.मात्र आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले.

यानंतर ही इंस्टाग्राम ची फेक मैत्री आणि फसवणुकीची घटना समोर आली.खूप मोठी रक्कम  ट्रान्सफर केल्यानंतर ती महिला वर्धा मधील सायबर पोलिसात पोहोचली.आता याप्रकरणी सायबर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

10 + sixteen =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.