वणी लायन्स इंग्लिश मिडी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मोटिवेशन व करिअर मार्गदर्शन सेमिनार चे आयोजन.

वणी लायन्स इंग्लिश मिडी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मोटिवेशन व करिअर मार्गदर्शन सेमिनार चे आयोजन.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे*

येथील लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मोटिवेशन व करिअर मार्गदर्शन सेमिनार’ चे आयोजन, लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट व लायन्स क्लब वणीच्या वतीने विद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लायन्स ट्रस्ट चे अध्यक्ष व वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.संजीव रेड्डी बोदकुरवार, तर नागपूर येथील प्रमुख वक्त्या व मार्गदर्शिका प्रा.मनीषा महात्मे, लायन्स क्लब वणी चे अध्यक्ष लायन राजाभाऊ पाथ्रडकर.

लायन्स ट्रस्ट चे उपाध्यक्ष लायन बलदेव खुंगर, ट्रस्ट चे माजी अध्यक्ष लायन शमीम अहमद, लायन्स शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत गोडे, वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या दिपासिह परिहार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अभ्यास वर्गात मागदर्शन करतांना मनीषा महात्मे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये चांगल्या सवयी व प्रेरक विचारांचे बीजारोपण केल्यास यश हमखास मिळते.

तसेच अमुक एका ने मेडिकल किंवा इंजिनिअर क्षेत्र निवडले म्हणून आपणही तेच करणे योग्य नाही तर आपल्या अंगभूत क्षमता व आवड लक्षात घेऊन आपले करिअर निवडावे, असे प्रतिपादन केले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मा. आमदार श्री. संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाची सांगड जीवनाशी घालून, त्याचा अर्थ प्रत्यक्ष जीवनात शोधावा.

तसेच प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात इयत्ता दहावी व बारावी हे महत्त्वाचे टप्पे असतात म्हणून विद्यार्थ्यांनी चरित्र संपन्न बनून प्रचंड मेहनत करावी अन्यथा या वळणावर क्षुल्लकशी चूक उभे आयुष्य उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत ठरते.याची विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली व विद्यार्थ्यांना परिक्षे साठी शुभेच्छा दिल्या. प्रस्तावना प्राचार्य प्रशांत गोडे यांनी केली.सूत्रसंचालन पायल सिंग यांनी तर रविंद्रनाथ लिचोडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला वर्ग शिक्षक चित्रा देशपांडे, गणेश कोल्हे ,शिवम शिडाना,विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × one =