Wahedat e Islami Hind Yavatmal : वहदत ए इस्लामी हिंद द्वारे “मानव गरिमा अभियान” अंतर्गत शिक्षक परिसंवाद कार्यक्रम संपन्न
Wahedat e Islami Hind Yavatmal : वहदत ए इस्लामी हिंद द्वारे “मानव गरिमा अभियान” अंतर्गत शिक्षक परिसंवाद कार्यक्रम संपन्न
वहदत ए इस्लामी हिंद द्वारे भारतात 5 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान अखिल भारतीय मानव गौरव अभियान सुरू आहे. यादरम्यान वहदत-ए-इस्लामी हिंद, यवतमाळ द्वारे रबिऊल अव्वल महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर (स. अ. स) जयंतीच्या निमित्ताने रविवार 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता रॉयल पॅलेस हॉल, पाढंरकवडा रोड,येथे इस्लामचे शेवटचे प्रेषित हजरत पैगंबर मोहम्मद (स.अ. स.) यांच्या जिवनावर आधारित उदबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
निमंत्रित करण्यात आलेले उर्दू माध्यमाचे शिक्षक मोठ्या संख्येने या कार्यक्रमात हजर होते. याप्रसंगी अखिल भारतीय मानव गौरव अभियानची गरज आणी परिचय मा. अनीस खान यांनी शिक्षकांसमोर मांडला. तसेच मा. निसार अहमद खान (पुसद) यांनी “पैग़म्बर मुहम्मद (स.अ.स) शिक्षकाच्या भुमिकेत” या विषयावर आपले विचार मांडले.
तसेच प्रमुख वक्ते प्रोफेसर असरार अहमद साहेब, यांनी “इस्लाम, वर्तमान शिक्षण पध्दती आणि शिक्षकांची कर्तव्ये”, या विषयावर शिक्षकांचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे मंच संचालन लईक खान सर यांनी केले. या कार्यक्रमाला यशस्वी बनविण्यासाठी वहदत ए इस्लामीच्या अनेक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले