Wahdat e Islami तर्फे नविन शिक्षा धोरणानिमीत्य चर्चासत्र संपन्न.

Wahdat e Islami तर्फे नविन शिक्षा धोरणानिमीत्य चर्चासत्र संपन्न.

“सबसीडी बेस पासुन लोनबेस शिक्षाप्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ड्राप आउट होणार – प्रा. डॉ. तनीवर अहेमद

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

यवतमाळ/Wahdat e Islami यवतमाळच्या वतीने रविवार दि.7 जानेवारी 2024 रोजी स्थानीक रॉयल पॅलेस येथे सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत एन.ई.पी.20/20 नविन शिक्षण प्रणाली बद्दल जागृकता करण्यासाठी शिक्षण सेमीनार चे आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी प्रा. मलक वहाब होते, तर प्रमुख वक्ते प्रा.घनश्याम अलोने. डॉ. तनवीर अहेमद यांनी मार्गदर्शन केले.

यात नविन शिक्षा धोरणावर प्रकाश टाकतांना प्रा. घनश्याम अलोने यांनी म्हटले कि, या धोरणामुळे धर्मनिरपेक्ष राष्ट्र भारताला ब्राम्हण राष्ट्र बनविण्याचे प्रयत्न सुरू आहे.नविन धोरणात अनुसुचीत जाती व मागासवर्गीय जाती शिक्षे पासुन वंचीत राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण मधात सोडुन जाण्याची शक्यता जास्त आहे. डॉ. तनवीर अहेमद औरंगाबाद यांनी म्हटले कि, प्राचीन वेदकाळातील मनुस्मृतीला बळ देवून वर्ण व्यवस्था, धर्माची संस्कृती आणि सभ्यता भारतीय समाजावर थोपविण्याचे कार्य मनुवादी संघटना व शासनाचे मार्फत करण्यात येत आहे.

आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. अब्दुल मलक वहाब यांनी म्हटले कि, नविन शिक्षण धोरणात मुसलमानांच्या 700-800 वर्षापुर्वीचे इतिहासाला बगल देण्यात आला आहे. देशाच्या इतिहासाला पुर्णपणे बदलुन मनुस्मृती सर्व देशवासीयांवर लादण्याचे प्रयत्न सुरू आहे. हा विनाशक विचारधारांचा प्रचार, प्रसार आणि विस्तार तसेच विद्यार्थ्यांना या विचाराचे पाठयकम या शिक्षणप्रणाली व्दारे शिकविण्याचे प्रयत्न केले जात आहे.

तरी यापासुन भारतीय समाजाला जागृत आणि वाचविण्याचे काम करावे लागेल असे आवाहन केले. सदर कार्यक्रमाची सुरूवात पवित्र कुरआनचे पठण मौलाना अब्दुल कादिर यांनी केले. कार्यकमाची प्रस्तावना प्रा. काशीफ जमाल अकोला यांनी तर संचालन काझी मिन्हाजोद्दीन यांनी केले. सदर कार्यक्रमात सुमारे 450 विविध शाळेतील, संस्थेतील शिक्षकांनी आपली उपस्थिती दर्शविली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वहदत-ए-ईस्लामीच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेवुन यशस्वी केले.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eleven − 4 =