Voice of Media कोरपना तालुका कार्यकारणी जाहीर,अध्यक्षपदी प्रमोद वाघाडे तर उपाध्यक्षपदी प्रमोद खिरटकर.

**प्रमोद खिरटकर :चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी**

Voice of Media कोरपना तालुका कार्यकारणी जाहीर,अध्यक्षपदी प्रमोद वाघाडे तर उपाध्यक्षपदी प्रमोद खिरटकर.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या संघटनेची कोरपना तालुका कार्यकारिणी जाहीर झाली असून या संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरी चे नांदाफाटा बातमीदार प्रमोद वाघाडे,उपाध्यक्षपदी दैनिक महासागर चे तालुका प्रतिनिधी प्रमोद खिरटकर तर सरचिटणीसपदी दैनिक लोकमत चे नांदा फाटा बातमीदार रत्नाकर चटप यांची निवड करण्यात आली आहे.

‘लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठीचा’ असे ब्रीद घेऊन राष्ट्रीय पातळीवर स्थापन झालेल्या व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेचे जाळे अवघ्या वर्षभरात महाराष्ट्रासह २१ राज्यांमध्ये पसरले आहे. संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय सरचिणीस चंद्रमोहन पुप्पाला, राज्य अध्यक्ष राजा माने व विदर्भ विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक,जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांच्या सूचनेवरुन कोरपना तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली आहे.

या कार्यकारिणीत अध्यक्षपदी प्रमोद वाघाडे, उपाध्यक्षपदी प्रमोद खिरटकर, सरचिटणीसपदी रत्नाकर चटप,कार्यधक्षपदी धनराज सिंह शेखावत, उपाध्यक्षपदी सिद्धार्थ गोसावी,कोषाध्यक्षपदी प्रा.रवींद्र नगराळे,सल्लागारपदी रफिक शेख,संघटकपदी जयंत जेणेकरन,सहसचिवपदी रवी बंडीवार,तालुकासंघटकपदी हबीब शेख,मार्गदर्शक शिवाजी शेलोकर,तालुका सदस्य नितीन शेंडे,शंकर तडस,संदीप खिरटकर,विजय बोरडे,रविष शर्मा,यांची नियुक्ती केली आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन होत आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

nineteen − 3 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.