Vodafone Worlds First Satellite Video Calling : आधुनिक युगात टेलिकॉम सेवा महत्त्वाच्या झाल्या आहेत.जगात इंटरनेट व्हाईस कॉलिंग व्हिडिओ कॉलिंग हे सर्व सेवा आधुनिक तंत्रज्ञान सोबत जोडलेली आहे. सर्व प्रकारचे दूरसंचार सेवा सॅटॅलाइट च्या माध्यमातून देण्यात येते. मात्र आतापर्यंत सॅटॅलाइट व्हिडिओ कॉलिंग सेवा सुरू झाली नव्हती.
First Satellite Video Call Launched By Vodafone भारतात आता पहिल्यांदा वोडाफोन टेलिकॉम कंपनीने टेलिकॉम क्षेत्रात मोठा धमाका केला असून देशात पहिला सॅटॅलाइट व्हिडिओ कॉल देशाबाहेरून लॉन्च केला आहे.
याद्वारे वोडाफोन टेलिकॉम कंपनीने सॅटॅलाइट व्हिडिओ कॉलिंग च्या दुनियेत एक नवा विक्रम रचला असून,या कंपनीने जगात सर्वात पहिला व्हिडिओ कॉल केला आहे.Vodafone टेलिकॉमकडून हा पहिला सॅटॅलाइट व्हिडिओ कॉल देशा बाहेरील एका अतिदुर्गम भागातून यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे.
Vodafone Worlds First Satellite Video Calling : सॅटॅलाइट व्हिडिओ कॉलिंसाठी देशाबाहेर अति दुर्गम ठिकाणाची निवड.
वोडाफोन कंपनीने नुकतेच जगातील पहिले सॅटॅलाइट व्हिडिओ कॉलिंग करण्यासाठी वेल्श माउंटन या अति दुर्गम ठिकाणाची निवड केली.याठिकाणी कोणतीही आधुनिक दूरसंचार सेवा नव्हती, यादरम्यान सामान्य टेलिकॉम डिवाइस द्वारे या सॅटॅलाइट व्हिडिओ कॉलची चाचणी सध्या केली जात आहे.
आतापर्यंत भारतात जिओ टेलिकॉम आणि एअरटेल टेलिफोन या दोन खाजगी कंपन्यांनी 5G सेवा सुरू केली आहे.लवकरच वोडाफोन आयडिया कडून ही सेवा सुरू होईल,मात्र यापूर्वी वोडाफोन ने भारताबाहेर सॅटॅलाइट व्हिडिओ कॉलिंगच्या क्षेत्रात नवा पराक्रम रचला असून,जगात पहिला सॅटॅलाइट व्हिडिओ कॉल लॉन्च केला आहे.
वोडाफोन कंपनी प्रशासनाकडून ,सॅटॅलाइट व्हिडिओ कॉलिंग संदर्भात तांत्रिक माहिती देण्यात आलेली आहे.यासाठी कंपनीने स्टँडर्ड स्मार्टफोनचा वापर केला.हा स्मार्टफोनद्वारे भारताबाहेर एका अति दुर्गम ठिकाणाहून सॅटॅलाइट व्हिडिओ कॉलिंग झाला.उल्लेखनीय म्हणजे या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील 2026 या वर्षात हे उपग्रह तंत्रज्ञान प्रक्षेपित केले जाणार आहे.
सॅटॅलाइट व्हिडिओ कॉलिंग यशस्वीपणे लॉन्च करीत नवा इतिहास.
उल्लेखनीय म्हणजे आतापर्यंत देशात ज्या भागात मोबाईल टॉवर अस्तित्वात नाहीत अशा भागात दूरसंचार नेटवर्क सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आणि तेथे सॅटॅलाइट द्वारे थेट दूरसंचार सेवा मिळावी,यासाठी देशभरात मोबाईल ऑपरेटर्स आणि स्मार्टफोन उत्पादित करणाऱ्या कंपन्या आणि टेलिकॉम कंपन्यांमध्ये एका प्रकारे स्पर्धा सुरू आहे.यात देशात अग्रगण्य असलेल्या Vodafone टेलिकॉम कंपनीने सॅटॅलाइट व्हिडिओ कॉलिंग यशस्वीपणे लॉन्च करीत नवा इतिहास रचला असल्याचा दावा करण्यात येत आहे.
यांना रिसीव झाला सर्वात पहिला सॅटॅलाइट व्हिडिओ कॉल?.
वोडाफोन कंपनी कडून हा आधुनिक सॅटॅलाइट कॉल करताना देशाबाहेरील ठिकाणाची निवड करताना हा प्रयोग केला.यासाठी कॉल वेल्श माऊंटेन या दुर्गम भागाला निवडण्यात आले होते.या ठिकाणी कोणताही टेलिकॉम नेटवर्क सिग्नल नव्हता.वोडाफोनचा हा पहिला सॅटॅलाइट व्हिडिओ कॉल युरोपियन मोबाईल ऑपरेटरच्या चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर मार्गारिटा यांनी रिसिव्ह केले. हा कॉल वोडाफोन कंपनीचे इंजिनियर रोवन यांनी केले होते.वोडाफोन कंपनीने यासाठी फक्त सॅटॅलाइट सेवेचा वापर केला आहे सध्या याची सामान्य टेलिकॉम डिवाइस द्वारे भविष्यासाठी चाचणी केली जात आहे.
120 MBPS ची हायस्पीड सेवा.
VODAFHONE AST Space mobile च्या फाईव्ह ब्लू बर्ड सॅटॅलाइट सिस्टमचा यासाठी वोडाफोन ने वापर केला असून हा सॅटॅलाइट व्हिडिओ कॉल करताना 120 एमबीबीएस ची हाय स्पीड होती. हा सिस्टम पृथ्वीच्या अगदी खालच्या कक्षेत तब्बल 120 मेगा बिट्स प्रति सेकंद या दराने टेलिफोन ट्रान्समिशन स्पीड प्रदान करते. यासाठी एक ब्रिटिश कंपनी इन्वेस्ट करीत आहे.मोबाईल टॉवर अस्तित्वात नसलेल्या क्षेत्रात टेलिकॉम नेटवर्क उपलब्ध करण्यासाठी आणि तेथे सॅटॅलाइट सेवा सुरू करण्यासाठी आता मोबाईल ऑपरेटर आणि स्मार्टफोन कंपनीमध्येही स्पर्धा दिसत आहे.
आयफोन साठी लवकरच सॅटेलाईट सेवा सुरू करण्यात येणार.
दरम्यान जगात विविध ठिकाणी आता सॅटेलाईट नेटवर्कची उभारणी करण्यासाठी जागांची चाचणी होत आहे. दुर्गम ठिकाणी सॅटॅलाइट नेटवर्क वाढण्यासाठी Apple, Google तसेच Samsung या कंपनीकडून सॅटॅलाइट सेवा सुरू करण्यात येत आहे.अमेरिकेचे टेक्नॉलॉजी टायकून एलन मस्क आणि अमेरिकन T-Mobile या कंपनीकडून आयफोन साठी लवकरच सॅटेलाईट सेवा सुरू करण्यात येणार आहे.
यामुळे थेट सॅटॅलाइट वरून व्हॉइस कॉलिंग,इंटरनेट डाटा आणि मेसेजिंग चा आनंद आयफोनवर iPhone.घेता येईल.उल्लेखनीय म्हणजे आयफोन युजर्सकडे यापूर्वीच आपातकालीन सॅटेलाईट सर्विस उपलब्ध आहे.Emergency Setellite Service उपलब्ध आहे.या कंपन्या आता तीव्र गतीची इंटरनेट सेवा आणि वाईस व्हिडिओ कॉलिंग सेवेसाठी विविध प्रकारच्या चाचण्या घेत आहेत.