विविध पिकांनबाबत कृमकोच्या वतिने शेतकऱ्यांना मार्गदर्शन.
*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब*
कृषक भारती को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (कृपको) यवतमाळ यांच्या वतीने दिनांक १४ डिसेंबर रोजी बाभुळगाव तालुका खरेदी विक्री सहकारी संघ मर्यादित च्या कार्यालयासमोर विविध पिकांनबाबत मार्गदर्शन चर् पिकांचे उत्तम व्यवस्थापन कसे करावे या बाबत चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्रीकांत कापसे हे होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष तालुका खरेदी विक्री सहकारी संघ ॲड.सतीश ठाकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष डॉ. रामेशजी महानुर, समुह चर्चासत्र मुख्य मार्गदर्शक डॉ. सुरेशजी नेमाडे कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ, डॉ. चव्हाण कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. नीरज रांगडाले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविका मधून कार्यक्रमाची रूपरेषा विषद केली त्यानंतर डॉ. नेमाडे सर यांनी तूर पिकाबाबत संपूर्ण व्यवस्थापनावर सविस्तर माहीत देऊन चर्चा केली आणि नंतर चना आणि गहु पिकांबाबत सविस्तर माहीत देऊन चर्चा केली.
डॉ चव्हाण यांनी फवारणीचे द्रोण बाबत शेतकरी बांधवाना प्रशिक्षण दिले. व जिवाणू संवर्धके बाबत सविस्तर माहिती दिली. डॉ. नितीन भालेराव. प्रोजेक्ट मनेजेर स्विच ऑन फौनडेशन यांनी जैविक मिशनची माहिती दिली.तर शेवटी अध्यक्षीय भाषण श्रीकांतजी कापसे यांनी शेतकऱ्याना मार्गदर्शन करणारे व ज्ञानात भर घालणारे कार्यक्रम राबवावे जेणे करून शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येईल अशी विनंती कृपको कंपनीचे प्रतिनिधी यांना केली.
आभार प्रदर्शन श्रीकांत हाडके यांनी केले या कार्यक्रमाला उपस्थित संचालक मंडळ, शेतकरी बांधव सूर्यकांतजी कावलकर, प्रकश नागतोडे, राजु फसाटे दडमल महेंद्र घुरडे संजय भैंसे प्रवीण पांडे माधव नेरकर निलेश जैन अजय मदनकर नवीन तातेड प्रकाश राठी सुधीर जगताप आरिफ अली अंकुश सोयाम प्रदीप नंदूरकर अक्षय राउत भोजराज अगुंडे खरीदी विक्री संघाचे सर्व कर्मचारी व शेतकरी मोठया संख्या ने उपस्थित होते.