Vinod Kambli : विनोद कांबळी वर उपचारासाठी टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांची ती अट कोणती?

Vinod Kambli : विनोद कांबळी वर उपचारासाठी टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांची ती अट कोणती ?

टीम इंडियामध्ये एकेकाळी मित्र,आपल्या खेळ प्रदर्शनातून सोबतच चमकून क्रिकेट विश्वात नाव कमाविणारे दोन माजी क्रिकेटपटू खूप वर्षानंतर सोबत दिसले पण एक आता ही क्रिकेट ग्लॅमर विश्वात चमकत आहे, तर दुसरा दारूच्या व्यसनामुळे या विश्वातून एकाप्रकारे हरपून गेला आहे.ते दोन्ही क्रिकेट पटू म्हणजे सचिन तेंडुलकर आणि माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी.दोन्ही क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर शिष्य राहिले आणि आता दोघांची भेट ही रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती कार्यक्रमात झाली,तेथे काय दिसले,आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी विनोद कांबळे यांच्या उपचारासाठी नेमकी काय अट ठेवली आहे ते आपण वाचू या.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

या आठवड्यात मुंबई मध्ये क्रिकेट प्रशिक्षक स्व.रमाकांत आचरेकर यांच्या स्मृतिदिनी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यादरम्यान क्रिकेट विश्वातील अनेक आजी माजी क्रिकेट सितारे आणि राजकारण क्षेत्रातील लोक हजर होते.या दरम्यान माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला आपला बालपणीचा आणि क्रिकेट विश्वातील मित्र विनोद कांबळी भेटला. दोघांच्या भेटीचा हा क्षण सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत उभा असलेला सचिन तेंडुलकर हा अचानक स्टेजवर एका बाजूला खुर्चीवर बसलेल्या विनोद कांबळी जवळ त्याला भेटण्यासाठी पोहोचतो.

या व्हिडिओमध्ये कांबळी याची तब्येतीची गंभीर स्थिती स्पष्टपणे दिसते.एकेकाळी आपल्या क्रिकेट प्रदर्शनातून सर्वांना मोहिनी घालणारा विनोद कांबळी शारीरिकदृष्ट्या खूपच कमकुवत दिसत होता. सचिन तेंडुलकर जेव्हा त्याच्याजवळ पोहोचला तेव्हा विनोद कांबळीने बसल्या बसल्याच सचिन सोबत हस्तांदोलन करताना बालपणीच्या मित्राला स्मित हास्य केले अन् त्याला बाजूला बसण्याचा आग्रह केला.यावेळी त्याला बोलण्यास त्रास होत असल्याचे जाणवले.प्रशिक्षक आचरेकर यांच्या या स्मृती समारंभात सचिनला भेटताना कांबळी खूप संकोचात दिसला.कांबळीने सचिनचा हात धरला होता आणि तो सोडत नव्हता. यानंतर तेथे न बसता पुन्हा सचिन आपल्या जागी परतला.या कार्यक्रमानंतर वायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये माजी क्रिकेटपटू कांबळी याची अवस्था पाहून टीम इंडिया चे माजी खेळाडू आणि चाहते चिंता व्यक्त करताना दिसत आहे.

माजी कर्णधार कपिल देव यांचे ऑफर.

विशेष म्हणजे क्रिकेट विश्व आणि त्याच्या ग्लॅमरमध्ये हरखून गेलेल्या विनोद कांबळीला नंतर दारूचे व्यसन जडले, त्यामुळे त्याच्यावर हलाखीची परिस्थिती ओढवली. यामुळे त्याचे समकालीन अनेक सहकारी क्रिकेटपटू त्याच्यापासून हळूहळू दूर झाले आहेत. मात्र विनोद कांबळीची सध्याची अवस्था पाहता अनेकांनी त्याला उपचारांनी मदतीचा हाच समोर केला आहे.यात टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांच्यासह अनेक खेळाडूंनी मदतीचा प्रस्ताव दिलेला आहे.कपिल देव यांनी विनोद कांबळीला मदतीसाठी पुढे येवून त्याच्या उपचाराचा खर्च उचलणार असल्याचे सांगितले आहे.पण त्यांनी यासाठी दारूचे व्यसन पूर्णतः सोडविण्यासाठी अट ठेवली आहे.ती म्हणजे उपचारापूर्वी कांबळीने आधी पुनर्वसनासाठी जावे लागेल.

काय म्हणाले माजी क्रिकेटर बलविंदर सिंधू.

1983 मध्ये विश्वचषकात भारतीय संघातील क्रिकेटपटू बलविंदर सिंधू यांनी विनोद कांबळी याच्या उपचारासंदर्भात बोलताना म्हटले आहे की, मी कपिल देव यांच्याशी या विषयावर चर्चा केली आहे त्यांची कांबळीच्या उपचारासाठी आर्थिक मदत करण्याची इच्छा आहे,पण उपचारापूर्वी विनोद कांबळीला आधी पुनर्वसनासाठी जावे लागेल.या दरम्यान त्याचा उपचार कितीही लांबला तरी चालेल आणि उपचारांवर येणारा खर्च आम्ही सर्वजण मिळून उचलण्यास तयार आहोत.विशेष म्हणजे यापूर्वी टीम इंडियातील अनेक खेळाडू, माजी खेळाडूनी विश्वविख्यात क्रिकेट प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांना कर्करोगाच्या उपचारासाठी मदत केली होती.

स्थानिक पंच मार्कस क्यूटो यांची नकारात्मक भूमिका.

एकेकाळी माजी क्रिकेटपटू विनोद कांबळे यांचे खूप जवळचे सहकारी राहिलेले आणि टीम इंडिया मध्ये स्थानिक पंच म्हणून जबाबदारी निभावणारे मार्कस क्यूटो यांनी कांबळीचे पुनर्वसन आणि उपचारावर नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. नुकतेच क्युटो यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत या संदर्भात म्हटले आहे. विनोद कांबळेला आग्रह केल्यानंतरही त्याने आता उपचार घेण्यास नकार दिला आहे, त्याला विविध आजार असल्याचाही खुलासा क्युटो यांनी केला,सोबतच दारूचे व्यसन सुटावे म्हणून यापूर्वी कांबळी 14 वेळा पुनर्वसनासाठी गेला आहे. त्यामुळे त्याला पुन्हा पुनर्वसनात पाठवण्यात काही अर्थ राहत नाही. या आधी आपण स्वतः त्याला 3 वेळा पुनर्वसनासाठी नेलो, पण तरीही त्याचे व्यसन सुटले नाही.असेही ते म्हणाले.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

19 − five =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.