उमरखेड प्रति: येथील सुप्रसिद्ध व्यावसायिक जैन कृषि क्रेन्द्रचे मालक आणि चित्रपट निर्माता पिरॅमिड फिल्म हाऊस मुंबई, ZRUCC मेंबर सेंट्रल मुंबई, यांची प्रादेशिक रेल्वे उपयोगकर्ते सल्लागार समिती च्या सदस्यपदी उपमहाप्रबंधक तथा सचिव यांच्या हस्ते निवड करण्यात आली. उमरखेड येथील भूमिपुत्र Vinod Jain यांनी अल्प वेळेत यशाची भरारी घेत उत्कृष्ट व्यावसायिक, चित्रपट निर्माता सेंट्रल रेल्वे मुंबई येथील सदस्य पद व त्या पाठोपाठ त्यांच्या कार्याची पावती म्हणून सेंट्रल रेल्वे विभागाने नुकतेच प्रादेशिक रेल्वे उपयोगकर्ता सल्लागार समितीत सदस्य पदी निवड केली आहे.
या पदामुळे जैन यांना सेंट्रल रेल्वेच्या कुठल्याही रेल्वे स्टेशनवर किंवा कुठल्याही रेल्वे डब्यात , बुगीत संशयित व्यक्तीचे तिकीट किंवा पास तपासण्यासाठी स्टेशन मास्टर , तिकीट कलेक्टरला बोलावून आपल्या उपस्थितीत तपासणी करू शकतात तसेच कुठल्याही रेल्वे स्टेशन वरील बुक स्टॉल , हॉटेल्स ,खानावळ कीवा खाद्यपदार्थाच्या दुकानावर जाऊन तपासणी करण्याचा ही अधिकार मध्य रेल्वेने विभागाने दिला आहे. त्यामुळे जैन यांची शहरातूनच नव्हे तर जिल्ह्यातून, राज्यातून विविध स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.