Vihir Anudan Yojana : देशात शेतकऱ्यांसाठी सिंचनाची व्यवस्था व्हावी गरिबांनी आर्थिक दृष्टीने कमकुवत असलेल्या शेतकऱ्यांना शेतातच सिंचनासाठी पाणी मिळावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना आहे.यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून पाच लाख रुपये मर्यादेपर्यंत शेतात विहीर खोदण्यासाठी अनुदान योजना झाली आहे.
केंद्र सरकारकडून राबविण्यात येणारी विहीर अनुदान योजना अशा सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी दिली जात आहे.यासंदर्भात एक मोठा बदल करून नवीन निर्णय घेण्यात आला आहे या संदर्भात शासनाचा नवीन GR जाहीर करण्यात आला आहे ते काय आहे ते आपण जाणून घेऊया.
शेतात विहिरीसाठी पाच लाख रुपये अनुदान मिळण्यासाठी असे करा अर्ज.
केंद्र सरकारने 8 जानेवारी रोजी या योजनेसंदर्भात जे नवीन निर्णय घेतले आहे त्यानुसार आता या विहीर अनुदान योजनेला इंदिरा आवास योजना मध्ये विलीन करण्यात आला आहे.ज्यांच्याकडे भोगवटदार वर्ग 2 ची शेतजमीन आहे अशा शेतकऱ्यांना सुद्धा आता या विहीर योजनेच्या अनुदानासाठी पात्र करण्यात आले आहे त्यामुळे याच पार्श्वभूमीवर 2022 च्या सिंचन विहिरीसाठी बनविण्यात आलेल्या जे ओएसपी. आहेत त्याच्यात बदल झाला आहे.
या निर्णयानुसार आता ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या विहिरी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची निवड करण्याची जी पद्धत आहेत त्यात बदल झाला आहे. आता इंदिरा आवास योजनेचे अंतर्गत लाभार्थी आहेत त्यांना जे अटी आहेत,त्याव्यतिरिक्त लाभार्थ्यांचे आता नवीन प्राधान्यक्रम देऊन लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यात येणार आहे.अर्थातच प्रधानमंत्री आवास योजनेखाली असलेले घरकुल लाभार्थीसुद्धा आता या सिंचन विहीर अनुदान योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.सिंचन विहिरीसाठी राज्य शासनाच्या मंजुरीनंतर 5 लाख रुपयांचा अनुदान मिळेल.
भोगवटदार वर्ग 2 जमीन धारकांनाही आता योजनेचा सिंचन विहीर अनुदानाचा लाभ.
केंद्र सरकारच्या या सिंचन विहीर योजने संदर्भात जे नवीन जीआर बनविण्यात आली आहे त्यानुसार लाभ धारकाची पात्रता असलेले सर्व लाभार्थी याच्यासाठी पात्र राहणार आहेत या लाभार्थ्यांमध्ये पात्रतेचे निकष पूर्ण करणारे लाभार्थी ज्यांच्याकडे जमीन ही भोगवटदार वर्ग 2 शेत जमीन असली तरी ते या सिंचन विहीर सरकारी अनुदान योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
यामुळे शेड्युल कास्ट,शेड्युल ट्राईब,ओपन,ओबीसी प्रवर्गातील जे काही अल्पभूधारक शेतकरी आहेत, आणि या शेतकऱ्यांकडे वर्ग 2 ची शेतजमीन असेल तरी त्यांना सिंचन विहिरीसाठी पाच लाख रुपये अनुदान देण्यात येईल यासाठी अर्ज प्रक्रिया करावी लागणार आहे.
विहीर अनुदानासाठी अटी शर्ती.
- या सिंचन विहीर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याजवळ स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे.
- शेतात सिंचन सुविधा नसणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य
एसटी आणि लहान शेतकऱ्यांना योजनेत प्राधान्य. - या योजनेतून शेतकऱ्यांना सिंचन विहीर खोदण्यासाठी आवश्यक बांधकाम करिता आर्थिक मदत दिली जाते
ही मदत निधी राज्य सरकार द्वारे निर्धारित केल्या जाते. ROHYO Sinchan Vihir Yojna.
अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी योजनेतून गरजू आणि लहान शेतकऱ्यांना पाच लाख रुपये पर्यंतचा अनुदान घेण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे,अर्ज करताना,
- संबंधित शेतकऱ्याचे आधार कार्ड
- शेत जमिनीचे कागदपत्र जसे 7/12 (सातबारा) नमुना 8 अ,आणि इतर शासकीय शेती संबंधातील दस्तावेज
- शेतकऱ्याच्या बँक खात्याचे विवरण.
- एससी एसटी ओबीसी मधील शेतकरी असेल तर जाती प्रमाणपत्र.
- शेतकऱ्याचे पासपोर्ट साईज फोटो.
येथे करा अर्ज.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या गावातील ग्रामपंचायत तहसील कार्यालय किंवा तहसील मुख्यालयातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी योजना विभागात अर्ज करावे लागेल. सोबतच शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकतात. यासाठी योजनेची अधिकृत वेबसाईट www.egs.mahaonline.gov.in वर माहिती घेवू शकतात.