Vidarbha Weather Updates January : डिसेंबर महिन्यात शेवटी तापमान स्थिर असताना जानेवारीच्या सुरुवातीपासून पारा घसरण्यास सुरुवात झाली आहे. मागील 24 तासात विदर्भातील अनेक जिल्ह्यात तापमानात मोठी घट आणि पारा घसरल्याने पुन्हा कडाक्याची थंड पडत आहे. मागील काही तासात विदर्भात सर्वात कमी तापमानाची नोंद भंडारा जिल्ह्यात करण्यात आली. तर दुसरीकडे विदर्भात वर्धा यवतमाळ नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पहाटे आणि रात्रीच्या वेळी कडाक्याची थंड पडत आहे.
विशेष म्हणजे या हिवाळ्यात नोव्हेंबर महिन्यात तापमान स्थिर होता. यानंतर डिसेंबर महिन्याच्या मध्यात पारा घसरून थंड पडण्याची सुरुवात झाली होती. मात्र यानंतर काही प्रमाणात तापमानात वाढ झाल्याने थंडीचा जोर कमी झाला.आता जानेवारीपासून महाराष्ट्रातील एकूण वातावरण पुन्हा बदलताना दिसत आहे. मागील आठवड्यात मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात पारा घसरून वातावरण गार झाले होते. तर दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात तापमान स्थिर होता.
यादरम्यान जम्मू काश्मीर,शिमला मध्ये बर्फबारी सुरु झाल्याने उत्तर भारतात आणि दिल्लीमध्ये कडाक्याची थंड पडण्यास सुरुवात झाली, ती आताही कायम आहे.आता उत्तर भारतातील थंडीची लाट मध्य प्रदेश ते विदर्भातील अनेक जिल्ह्यांत दाखल होताना दिसत आहे तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील सध्या थंडीचा जोर वाढला आहे.
जानेवारीच्या सुरुवातीपासून महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये थंडीचा जवळ वाढला आहे.विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये गेल्या 72 तासात थंडीने आपल्या जोर दाखविण्यास सुरुवात केली असून 8 जानेवारीच्या पहाटे भंडारा जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली.दरम्यान येत्या काही तासात विदर्भातील सर्व जिल्ह्यात थंडीचा जोर अधिक वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
नागपूर यवतमाळ वर्धा अमरावती या जिल्ह्यांमध्ये पारा घसरणार.
हवामान खात्याच्या अनुमानानुसार 8 जानेवारीच्या रात्री आणि 9 जानेवारीच्या पहाटे विदर्भातील नागपूर यवतमाळ वर्धा अमरावती या जिल्ह्यांमध्ये पारा खाली येऊ शकतो.सोबतच काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आणि धुके राहणार आहे.मात्र या दरम्यान कुठेही अवकाळी पावसाची शक्यता नाही8 जानेवारी रोजी नागपूर मध्ये किमान तापमान 12 डिग्री अंश सेल्सियस नोंद करण्यात आली.तर आज दिवसभर नागपूर मध्ये ढगाळी वातावरण होते. विशेष म्हणजे मागील आठवड्यात नागपुरात यावर्षीचा सर्वात निचांक तापमानाची नोंद करण्यात आली होती.
येत्या दोन दिवसात थंडीचा जोर वाढणार.
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार,येत्या दोन दिवसात अर्थातच 78 तासात विदर्भातील अनेक जिल्ह्यात थंडीचा दूर आणखी वाढू शकते.वर्धा,बुलढाणा, अमरावती, यवतमाळ आणि अकोला या जिल्ह्यात येत्या काही तासात किमान तापमान 13 डिग्री सेल्सिअस इतके राहणार असल्याची शक्यता आहे.सोबतच या जिल्ह्यांमध्ये अंशतः ढगाळी वातावरण राहणार आहे.
गोंदिया गडचिरोली जिल्ह्यात येत्या 24 तासात पारा घसरणार.
गोंदिया गडचिरोली जिल्ह्यात येत्या 24 तासात पारा घसरून किमान तापमान 11 अंश डिग्री सेल्सिअस राहणार असल्याची शक्यता आहे.8 जानेवारीला गोंदिया जिल्ह्यात धुक्यासह ढगाळ वातावरण होते.तर,या जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या भंडारा जिल्ह्यात बुधवारी आतापर्यंतचा सर्वात कमी 10 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.येत्या काही तासात चंद्रपूर जिल्ह्यात किमान तापमान 15°c,वाशिम जिल्ह्यात किमान तापमान 14 सेल्सिअस इतके राहणार आहे.
सोबतच यवतमाळ जिल्ह्यात सध्या थंडीचा जोर वाढला असून बुधवारी पहाटे तापमान 11 डिग्री सेल्सिअस पर्यंत आला होता. मागील दिवसांपेक्षा विदर्भात बहुतांश जिल्ह्यात किमान तापमानात थोडीशी वाढ आणि काही जिल्ह्यांमध्ये सध्या घट होताना दिसून येत आहे.मात्र वातावरणातील गारठा कायमच आहे.
एकूणच विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये वातावरणात दिवसात सुद्धा थंडक आहे, तर रात्री आणि पहाटे पारा पारा घसरल्याने कडाक्याची थंडी पडत आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी नागरिक उबदार कपडे घालूनच आपले काम करताना दिसत आहे तर रात्री अनेक ठिकाणी नागरिक शेकोटी पेटवून थंडीपासून आपला बचाव करताना दिसत आहे.