Vidarbha Rains : नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता.

Vidarbha Rains : नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता.

Vidarbha Rains | NAGPUR – थंडीचा ऋतु सुरू झाला असून नागपुरात अद्याप थंडीचा प्रभाव दिसून येत नाही. पुढील काही दिवस नागपुरात तापमानात घट होण्याची शक्यता आहे. हवेत चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

यामुळे तापमान लगेच कमी होणार नाही. रविवारी नागपूरचे कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस होते. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे गुजरात ते मध्य प्रदेशात चक्रीवादळ तयार झाल्याने हवेत आर्द्रता येत आहे.

BYTE – प्रवीण कुमार, हवामान तज्ज्ञ

त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे नागपूरसह विदर्भात ओलावा येत आहे. नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

नागपूर जिल्ह्याबाबत बोलायचे झाले तर मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. मात्र, तापमानात अचानक घट होणार नाही. ४-५ दिवसांनी तापमानात घट होण्याची शक्यता असून त्यानंतर थंडीचा कडाका जाणवेल, असे हवामान तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

thirteen + four =