Vidarbha Rain : विदर्भात पावसाचा जोर वाढणार,बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा तयार.
Vidarbha Rain : विदर्भात पावसाचा जोर वाढणार,तर कोंकणात सरी कोसळणार,बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा तयार.
बंगाल उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात पावसाचा जोर वाढणार असून कोंकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोरदार सरी सुरू शकतात असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. बंगाल उपसागरातील प्रभावामुळे विदर्भात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.मंगळवार 10 सप्टेंबरला पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत हवामान खात्याकडून अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवून दक्षतेचा इशारा देत ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहे. तर दुसरीकडे कोकण तसेच घाटमाथ्यावरील भागात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा म्हणून येलो अलर्ट हवामान विभागाने दिले आहे.
वेदर मध्ये डीप डिप्रेशन तयार झाल्याने पडणार पाऊस.
हवामान खात्याच्या वातावरणातील निष्कर्षानुसार वायव्य बंगालच्या उपसागरात वादळी प्रणाली अर्थातच वेदर मध्ये डीप डिप्रेशन तयार झाले होते.त्यामुळे सोमवार 9 सप्टेंबरला ही प्रणाली ओडिशाच्या पुरी जिल्हापासून 50 किलोमीटर आग्नेये दिशेतील परादीप पासून 90 किलोमीटर नैतृत्येकडे,तर आंध्र प्रदेशच्या कलिंगपट्टणम पासून 160 किलोमीटर ईशान्येकडे, तसेच पश्चिम बंगालच्या दिघापासून 260 किलोमीटर दक्षिणेकडे होती. वायव्येकडे सरकत ही वादळी प्रणाली सोमवार सायंकाळी जमिनीवर आली.मात्र याची तीव्रता ओसरत जाणार असल्याची माहिती प्रादेशिक हवामान खात्याने दिली.
मॉन्सूनमधील कमी दाब पट्टा आता काही प्रमाणात दक्षिणेकडे सरकला असून,राजस्थानमधील बिकानेर ते सिकार, खजूराहो, बिलासपूर, पूरी असे वादळी प्रणालीचे केंद्र पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारले आहे. त्यामुळे उत्तर कर्नाटक ते केरळ पर्यंत किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळला आहे.दरम्यान
महाराष्ट्रात कमाल तापमानात चढ-उतार सतत कायम आहे. आज 10 सप्टेंबर रोजी सकाळपर्यंत 24 तासांमध्ये नागपूर येथे उच्चांकी 33.8 अंश तापमानाची नोंद झाली.तर राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान 28 ते 34 डिग्री सेल्सिअस दरम्यान आहे त्यामुळे विदर्भासह, कोकण, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी कोसळू शकतात.
विदर्भात आरेंज,कोंकण मध्ये येलो अलर्ट.
मंगळवार 10 ते पुढे काही तासांसाठी हवामान खात्याने विदर्भात ऑरेंज अलर्ट तर कोंकणात येलो अलर्ट घोषित केले आहे.विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्राच्या नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार सरींचा इशारा देण्यात आला आहे.या दरम्यान उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती.
दोन दिवस पावसाच् जोर राहणार.
मंगळवारी हवामान खात्याने राज्यातील पावसाचा अंदाज दर्शवित त्याचा नकाशा घोषित केला.त्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला.यात ऑरेंज अलर्ट मध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया येथे जोरदार पाऊस तर येलो अलर्ट मध्ये रायगड: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, गडचिरोली येथे ही पावसाचा जोर राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली.
येथे यलो अलर्ट.
विजांसह पावसाचा इशारा देत नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ येथे ही जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने मंगळवारी दिला आहे.