Vidarbha Rain Alert : दोन दिवसांत विदर्भ व कोंकणात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

Vidarbha Rain Alert : दोन दिवसांत विदर्भ व कोंकणात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात कोंकण,विदर्भ व अन्य भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने सखळ भागात पावसाचे पाणी साचले आहे,नदी नाले तुडुंब भरून वाहत असून अनेक रस्ते या पावसाने जलमय केले आहे. शहरी भागातही सखल भागात पाणी भरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाकडून काही जिल्ह्यात सोमवारी  शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळताना असताना मुंबई आणि मुंबई उपनगर, कल्याण, ठाणे यासह कोकणातील काही जिल्हयात मुसळधार पावसाने नागरिकांची चांगलीच दाणदाण उडवली आहे. विदर्भात नागपूर, गोंदिया, चंद्रपूर,यवतमाळ,वर्धा या जिल्ह्यात दोन दिवसांत मुसळधार पाऊस कोसळला,तर येत्या काही तासांत जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

यासोबतच रायगड, महाड, पोलादपूर आणि माणगावात देखील मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यभरात हवामान खात्याने मुसळधार पाऊसाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाकडून सोमवारी नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, रायगड, महाड, पोलादपूर, माणगाव, कर्जत आणि गोंदिया या भागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

18 − 9 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.