Vehicle Accident: मंगळवारी उपविभागात गस्तीवर असलेल्या कळंब ठाणेदार दीपमाला भेंडे यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला.

Vehicle Accident: मंगळवारी उपविभागात गस्तीवर असलेल्या कळंब ठाणेदार दीपमाला भेंडे यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला.

Vehicle Accident: यवतमाळ परिसरात पेट्रोलिंग करीत असताना रात्री १२ वाजताच्या दरम्यान चार कर्मचाऱ्यांसह ठाणेदार करळगाव घाटातून जात होत्या. यादरम्यान त्यांच्या वाहनाला अचानक रानडुक्कर आडवे आले. त्याला वाचविण्याच्या नादात वाहन अनियंत्रित होऊन खोल दरीत कोसळले.

उपविभागीय अधिकारी संजय पुज्जलवार यांनी दसऱ्यानिमित्त यवतमाळ उपविभागात गस्त लावली होती. कर्तव्यावर असताना ठाणेदार दीपमाला भेंडे या चालक व पोलिस ठाण्यातील इतर तीन कर्मचारी यांना घेऊन बाभूळगाव- यवतमाळ मार्गावर गस्त करीत होत्या. यवतमाळकडे येत असताना अचानक वाहनाला रानडुक्कर आडवे आले. तसेच विरुद्ध दिशेनेही वाहन येत होते.

यातच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन करळगाव घाटातील खोल दरीत कोसळले. रात्रीच्या सुमारास हा अपघात घडल्याने चौघांच्याहीहृदयाचा थरकाप उडाला. कसेबसे सावरत त्यांनी मदत बोलावली. तातडीने ठाणेदारांसह कर्मचाऱ्यांना तेथून बाहेर काढण्यात आले. तत्काळ खासगीरुग्णालयात दाखल केले. सुदैवाने यात कुणालाही गंभीर अशी दुखापत झाली नाही. बुधवारी अपघातग्रस्त वाहनही तेथून बाहेर काढण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nineteen + five =