Amravati वरून 2 नविन “Vande Bharat Express Train” Mumbai आणि Pune साठी धावणार !

भारतात अनेक ठिकाणी सुरू करण्यात आलेली Vande Bharat Express आता विदर्भातील अमरावती वरूनही धावणार आहे. नुकतेच रेल्वे विभागाकडून प्रवाशांची गरज लक्षात घेता,मुंबई- अमरावती,आणि पुणे-अमरावती ह्या 2 Vande Bharat Express ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यात उल्लेखनीय बाब म्हणजे आता मुंबई आणि पुणे मिळून आता येथून 2-2 Vande Bharat Express धावणार आहे. यातील 1-1 ट्रेन अमरावती साठी धावणार असून या प्रवासात येणारे इतर महत्वाचे स्थानकावर काही मिनिटांचा थांबा राहणार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

केंद्रीय रेल मंत्रालयाकडून मागील पंचवार्षिक मध्ये भारतात Vande Bharat Express ट्रेन अनेक राज्यातून सुरू करण्यात आली होती.सध्ये अनेक केंद्रशासित राज्यातूनही ह्या एक्सप्रेस ट्रेन सुरू आहेत.

मुंबई आणि पुणे येथून पुन्हा दोन Vande Bharat Express ट्रेन सुरू करण्याचा निर्णय झाल्यानंतर ही सेमी एक्सप्रेस ट्रेन मुंबई पुणे आणि अमरावती येथून धावेल. भारतात सेमी एक्सप्रेस वंदे भारत 2019 पासून सुरू करण्यात आली होती भारतातील पहिली बुलेट सारखी ट्रेन आहे. विशेष म्हणजे या ट्रेनचे संपूर्ण डिझाईन आणि तांत्रिक बाबी भारतातच पूर्ण झाली.

आपल्या देशात भारतीय बनावटीची ही एक्सप्रेस ट्रेन सुरू झाल्यापासून नेहमी चर्चेचा विषय राहिली आहे. 2019 मध्ये दिल्ली ते वाराणसी रुळावरून याला सुरू करण्यात आले होते यानंतर विविध टप्प्यात देशातील अनेक राज्यात वंदे भारत सेमी एक्सप्रेस ट्रेन सुरू आहेत.

Vande Bharat Express आताच्या घडीला महाराष्ट्रात पुणे आणि मुंबई येथून सुरू असताना आता पुन्हा दोन वंदे भारत ट्रेन या शहरातून अमरावतीला पोहोचून या प्रवासात येणाऱ्या विविध शहरातील स्थानकावर काही मिनिटांचा थांबा राहणार आहे.

मुंबई-अमरावती-पुणे-अमरावती Vande Bharat Express.

रेल्वे विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार Vande Bharat Express आता मुंबई ते अमरावती आणि पुणे ते अमरावती दरम्यान धावणार असून याचे संभाव्य वेळापत्रक सुद्धा तयार करण्यात आलेले आहे लवकरच या रुळावरून 2 नवीन वंदे ट्रेन भारत धावतील. यामुळे आता विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक शहरामधून वंदे भारत धावणार असल्याने या भागातील जनतेला हाय स्पीडने मुंबई आणि पुण्याला जाणे येणे सुविधा राहणार आहे.

प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठविले.

मुंबई पुण्यापासून दोन नवीन वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वे कडून तयार करून त्याला रेल्वे बोर्डाकडे नुकतेच मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे. लवकरच रेल्वे बूट या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवू शकतो.त्यामुळे पुणे ते अमरावती आणि मुंबई ते अमरावती हे दोन वंदे भारत सेमी एक्सप्रेस ट्रेन सुरू झाल्यानंतर यातून अमरावती आणि इतर शहरातून मुंबई पुणे प्रवास शक्य होणार आहे.

इतर अनेक एक्सप्रेस ट्रेन सारखेच ह्या 2 वंदे भारत ट्रेन भुसावळ आणि जळगाव जंक्शन वरून सुद्धा धावतील. मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही ट्रेनला उत्तर महाराष्ट्रातील विविध जंक्शनवर रेल्वे बोर्ड थांबा मंजूर करू शकतो असा अंदाज आहे.दरम्यान या दोन्ही सेमी एक्सप्रेस ट्रेनचा संभाव्य वेळापत्रक आणि हे ट्रेन कोण कोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबणार आहेत, याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे ते आपण पाहूया.

मुंबई अमरावती Vande Bharat Express ट्रेनचे संभाव्य वेळापत्रक ?

समोर आलेल्या वृत्तानुसार मुंबई पुणे वरून सुरू होणाऱ्या 2 Vande Bharat Express ट्रेन चे संभाव्य वेळापत्रक बनविण्यात आले असून अमरावती रेल्वे पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी मुंबई अमरावती Vande Bharat Express सुटेल तर अगदी काही सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी मुंबईला पोहोचेल.

अमरावती वरून सुटतात समोर अकोला जंक्शन शेगाव भुसावळ जंक्शन जळगाव जंक्शन मनमाड आणि नाशिक जंक्शन या रेल्वे स्थानकावर वंदे भारतचा अगदी काही मिनिटांचा थांबा असेल. यानंतर वंदे भारत ट्रेन मुंबईवरून दुपारी 3 वाजून 5 मिनिटांनी अमरावती कडे परतीच्या प्रवासाला सुटेल. यानंतर रात्री 11 वाजून 25 मिनिटांनी अमरावती रेल्वे स्थानकावर दाखल होईल..

पुणे अमरावती Vande Bharat Express Train चे संभाव्य वेळापत्रक?

दुसरी वंदे भारत ट्रेन पुणे अमरावती या रुळावरून धावणार आहे.पुणे वरून सुरू होणारी ही ट्रेन अमरावती स्थानकावरून पहाटे 4 वाजून 20 मिनिटांनी पुणे ला प्रस्थान करणार.या दरम्यान ही सेमी एक्सप्रेस ट्रेन समोर अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, दौंड या रेल्वे स्थानकावर थांबा घेईल. तर दुपारी 12.वा. 25 मिनिटांनी Pune ला पोहोचेल.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

4 × 4 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.