Vande Bharat : देशात भारतीय रेल क्षेत्रात नवी क्रांती घडणार आहे देशात आधुनिक आणि स्वनिर्मित तंत्रज्ञानातून आता शेकडो ट्रेन गाड्या देशातच बनवून लवकरच त्या रेल ताफ्यात सामील होणार आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात भारतीय रेल्वे क्षेत्रासाठी 2.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.त्यामुळे आता लवकरच इंडियन रेल्वे मध्ये मोठी सुधारणा आणि शेकडो नवीन ट्रेन बनविल्या जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी आता देशात रेल्वे प्रवास खूप सोपा होण्याची शक्यता आहे.
उल्लेखनीय म्हणजे देशात येणाऱ्या दिवसात 100 Amrut Bharat एक्सप्रेस 50 Namo Bharat ट्रेन आणि 200 Vande Bharat सेमी एक्सप्रेस ट्रेन बनविण्याची घोषणा करण्यात आली आहे.New Trains And General Coach Production.
1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशासाठी वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प जाहीर केला यात 12 Lack पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या टॅक्समध्ये सवलत देण्यासह अनेक महत्त्वाचे निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आले आहे.
याच दरम्यान आता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेसाठी झालेल्या निधीची तरतूद आणि नवीन रेल्वे प्रोजेक्ट आणि रेल्वे बजेट संदर्भात महत्त्वाची माहिती दिलेली आहे.Union Finance And Railway Ministry Budget For Railway Development Projects.
रेल्वे मंत्र्यांच्या या घोषणेनंतर देशात किती नवीन जनरल कोच आणि एक्सप्रेस रेल्वे गाड्या बनविणे सुरू होणार आहे,आणि रेल्वे प्रवाशांना याचा काय फायदा होणार आहे.रेल्वेचे कोणते नवीन प्रोजेक्ट सुरू होणार आहे,याबाबत आपण जाणून घेऊया….
उल्लेखनीय म्हणजे आर्थिक वर्ष 2025-26 साठी भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरण आणि रेल्वे प्रोजेक्टसाठी 2 हजार 52 लाख कोटींची तरतूद केल्या गेली आहे.Railway Advanced Rail Projects.
यातून आता रेल्वेसाठी 17 हजार 500 रेल्वेचे नवीन जनरल कोच New General Train Coach,200 Vande Bharat ट्रेन आणि 100 Amrut Bharat रेल गाडी निर्मिती सारख्या प्रकल्पांना या अर्थसंकल्पात मान्यता देण्यात आली आहे.
अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेली आहे.या आर्थिक वर्षाच्या सर्वसाधारण बजेट सादर झाल्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी रेल्वे भवन येथे बोलताना या अर्थसंकल्पात निधीची जी तरतूद झाली आहे.
Railway Devlopment And Facilities Fund In Union Budget 2025-26.त्यातून पुढे रेल्वे क्षेत्रासाठी कोणते प्रकल्प आणि रेल्वेसाठी वाटप केलेल्या निधी आणि खर्चाची सविस्तर माहिती दिलेली आहे.
देशात 4.6 लाख कोटी रुपयांच्या नवीन रेल्वे प्रकल्पांचा समावेश
देशाच्या या वार्षिक अर्थसंकल्पात यंदा 4.6 लाख कोटी रुपयांच्या नवीन रेल्वे प्रकल्पांचा समावेश झालेला आहे. हे प्रकल्प Railway Projects.किमान 4 ते 5 वर्षात पूर्ण करण्यात येईल.
- यामध्ये देशात नवीन रेल्वे ट्रॅक निर्माण करणे.
- सुरू असलेल्या रेल्वे मार्गांचे विस्तारीकरण.
- रेल्वे विभागासाठी नवीन इमारतींचे बांधकाम.
- नवीन रेल्वे स्टेशन निर्माण.
- रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास.
- रेल्वे ट्रॅक वरून फ्लायओवर्स.
- रेल्वे अंडरपास रस्ते.
यासारख्या कामांशी हे संबंधित रेल्वे प्रकल्प असेल.
देशात 200 Vande Bharat ट्रेन तयार होणार.
- देशात रेल्वे प्रवासाची गरज आणि वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता,येणाऱ्या तीन वर्षात भारतात 50 Namo Bharat ट्रेन 100 Amrut Bharat ट्रेन आणि 200 वंदे भरत सेमी एक्सप्रेस ट्रेन बांधण्यात येणार आहे.
- नवीन Amrut Bharat रेल गाड्यांमुळे भारतातील अनेक शहरांचा अंतर या सुपरफास्ट ट्रेन सेवेमुळे कमी होणार असून अनेक शहरे यातून जोडले जाणार आहे.
- दरम्यान रेल्वे गाड्यांमधील जनरल पोस्ट संदर्भात केंद्रीय रेल मंत्री वैष्णव यांनी म्हटले आहे की येत्या काळात देशात 17 हजार 500 नवीन जनरल रेल कोच तयार करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे.
- विशेष म्हणजे जनरल कोच चे उत्पादन यापूर्वी सुरू करण्यात आलेले आहे.31 मार्च 2025 पर्यंत देशात 1400 जनरल कोच तयार होतील तर पुढील आर्थिक वर्ष संपताना 2000 सामान्य तयार करण्याचे भारतीय रेल्वेचे लक्ष आहे.
- रेल्वे ट्रॅक वरून देशात 1000 नवीन फ्लायओवर्स निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली आहे.
मालवाहतुकीत भारतीय रेल्वेची मोठी कामगिरी.
देशात औद्योगिक आणि गुड्स ट्रान्सपोर्ट मध्ये भारतीय रेल्वे आता मोठी क्षमता गाठली आहे. 31 मार्च 2025 पर्यंत रेल्वे माल गाड्या मधून मालवाहतूक क्षमता संबंधित महत्त्वाचा टप्पा भारतीय रेल्वे गाठणार आहे.यादरम्यान 31 मार्च पर्यंत देशात 1.6 अब्ज टन देशाच्या विविध भागात वाहून नेण्याचा टारगेट ठेवण्यात आला आहे.
सध्या भारतीय रेल्वे जगात रेल्वे मालवाहतूक मध्ये चीन नंतर लवकरच दुसऱ्या क्रमांकावर पोहोचणार आहे.भारतीय रेल्वे मालगाड्यातून वाहतूक करण्याचे मोठे लक्ष्य साध्य करेल असा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला,सोबतच केंद्र सरकारकडून वर्ष 2025 च्या शेवटपर्यंत 100 टक्के रेल्वे ट्रॅक प्रकाशिकरण करण्याचे उद्दिष्ट रेल्वे साध्य करेल अशी माहिती त्यांनी दिली.
रेल्वे सुरक्षेसाठी 1.14 लाख कोटी रुपयांची तरतूद.
भारतीय रेल्वे जगात आधुनिक आणि सक्षम रेल्वे क्षेत्र मानले जाते.रेल्वेच्या सुरक्षेसाठी केंद्रीय रेल मंत्रालय आणि केंद्र सरकार सतर्क असते. यामुळेच यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने रेल्वेच्या सुरक्षा मुद्द्यांवर 1.8 लाख कोटी रुपयांचा बजेट वाढवून आता त्याला 1.14 लाख कोटी केले आहे.
येत्या आर्थिक वर्षात हा आकडा 1.7 लाख कोटी पर्यंत पोहोचेल. यात देशात सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी (पीपीपी) द्वारे येणारी गुंतवणूक जोडली तर रेल्वे सुरक्षेचा बजेट एकूण 2.64 लाख कोटी रुपये होईल.