किडनी कॅन्सर शुगर अशा असाध्य रोगावर वैद्य हंसराज चौधरी यांचे निशुल्क उपचार व मार्गदर्शन 20 मे रोजी.

किडनी कॅन्सर शुगर अशा असाध्य रोगावर वैद्य हंसराज चौधरी यांचे निशुल्क उपचार व मार्गदर्शन 20 मे रोजी.

मनीष खर्चे

ब्रेस्ट कॅन्सर महिला रुग्णांनी अवश्य उपस्थित राहण्याचे प्रदीप गुरुखुद्दे, मनमोहन तापडीया, शरद वानखडे नी केले आवाहन.

अकोला. कॅन्सर सारखा महा भयंकर रोगावर नियंत्रण मिळवीण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच पॅथी यांना अपेक्षित वेग घेता आला नाही. मात्र आयुर्वेदमध्ये सर्वच रोगावर नियंत्रण मिळवीण्यात यश मिळावले आहे. जिल्हयातील विविध आजारांनी त्रस्त झालेल्या रुग्णांकरिता एक आनंदाची बातमी आहे. कॅन्सर, किडणी, शुगर,संधीवात या सारख्या अनेक प्रकारच्या दुर्धर आजारांवर आयुर्वेद उपचाराने कॅन्सर चे 25000 रुग्ण व इतर आजार असलेले एकूण जवळपास ५५,००० रुग्णांना रोगमुक्त करणारे नवग्रह सेवा संस्थानचे संस्थापक अध्यक्ष वैद्य हंसराज चौधरी यांच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक प्रमिलताई ओक सभागृहात दिनांक 20 मे रोजी सायंकाळी 6 वाजता करण्यात आले असून यावेळी दुर्धर आजारांवर निशुल्क तपासणीही करण्यात येणार असल्याने शहरातील रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक प्रदीप गुरुखुद्दे , अध्यक्ष अकोला जिल्हा मुद्रक संघ व प्रमिलाताई ओक ग्रंथालय, अकोला यांनी आज पत्रकार परिषदेत केले आहे, अकोला जिल्हा मुद्रक संघाचे अध्यक्ष प्रदिप गुरुखुद्दे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांनी आवर्जून उपस्थित राहून रोगमुक्त व्हावे यासाठी वैद्य हंसराज चौधरी यांचे मार्गदर्शन किती महत्वाचे आहे.

हे सांगण्यासाठी जयंत वानखडे, मेहकर, आवारे गुरुजी उमरी, डॉ जि आर वानखडे, जळगावं जामोद, भगवान जोशी, चिखली, संतोष वाशीम, सुलताने लोणार, जायवाड चिखली यांनी आपले अनुभव कथन केले.श्री हंसराज चौधरी यांनी स्थापन केलेल्या सेवा संस्था श्री नवग्रह आश्रम संस्थापक वैद्य हंसराज चौधरी यांनी जनस्पतीशास्र, प्राणीशास्र आणि पशुसंवर्धन तसेच शास्राचाहा अम्यास केला.१९१४ च्या गुरुपौरणिमा ला श्री नवग्रह सेवा सस्थान या नावाने श्री नवग्रह आश्रमची निर्मिती झाली. नवग्रह वनस्पती आणि दामबेल, गुरमार आणि इतर १०० औषधी वनस्पतीसह आज आश्रमात फळ देणारी ४८७ प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत.

नामशेष होण्याच्या मार्गीवर असलेल्या दुमिळ वनस्पतीच्या वीसपेक्षा जास्त प्रजातींचेही आश्रमात संगोपन केले जात आहे. याच आधारे आयुर्वेदिक औषधी विकसित करून कॅन्सर सारखा दुर्मिळ आजार सह इतर अनेक आजार बरे करण्यासाठी वैद्य हंसराज चौधरी यांना यश मिळवले असून अश्याच असाध्य रोगाचे पीडित रुग्ण आता ठणठणीत झाले असल्याने भविष्यात अकोला जिल्हा व परिसरातील रुग्णांना याचा फायदा मिळावा यासाठी अकोला जिल्हा मुद्रक संघ अध्यक्ष प्रदीप गुरुखूद्दे, अ.नि.स. चे शरद वानखडे यांनी वैद्य हंसराज चौधरी यांना अकोल्यात येण्यासाठी निमंत्रित केले असून येत्या २० मे रोजी संध्याकाळी ते अकोल्यात येऊन प्रमिलताई ओक हॉल परिसरात दुर्धर आजाराच्या रुग्णांच्या तपासणी पूर्वी मार्गदर्शन करणार आहेत. या संधी चा लाभ घेण्याचे आवाहन अकोला जिल्हा मुद्रक संघाचे अध्यक्ष प्रदीप गुरुखुद्दे, दत्ता पाटील ठाकरे, संतोष धरमकार, शरद वानखडे, आबारावं आमले, ऍड. मनीष खांबाळकर, प्रमिलाताई ओक हॉल चे मनमोहन तापडीया, जयंत वानखडे मेहकर, आवारे गुरुजी उमरी सचिन अहीर, आदींनी पत्रकार परिषदेत केले आहे.

ब्रेस्ट कॅन्सर महिला रुग्णांनी आवश्यक उपस्थित राहावे.

महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर चे रुग्ण मोठया प्रमाणावर वाढलेले आहेत. या रुग्णांमुळे संपूर्ण कुटुंबं विवंचनेत सापडते. त्यानंतर वैद्यकीय उपचार सुरु झाल्यावर आर्थिक अडचणी मोठ्या प्रमाणावर वाढतात. त्यामुळे महिलांनी ना उमेद न होता केवळ वैद्य हंसराज चौधरी यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी २० मे रोजी संध्याकाळी प्रमिलाताई ओक हॉल येथे उपस्थित राहून स्वतः ला कॅन्सर मुक्त करून घेण्याची संघी सोडू नये. असे आवाहन संतोष धरमकर यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen − fourteen =