वाढदिवसाच्या अवचित साधून शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य देऊन वाढदिवस साजरा.

वाढदिवसाच्या अवचित साधून शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य देऊन वाढदिवस साजरा.

वाढदिवसाच्या अवचित साधून शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य देऊन वाढदिवस साजरा.

ढाणकी: प्रतिनिधी,दिगांबर शिरडकर. एरवी कुणाचाही वाढदिवस म्हटलं तर केक कापून डीजे लावून गाजावाजा करत वाढदिवस साजरा केला जातो. परंतु असे न करता सामाजिक कार्यात सतत अग्रेसर राहणारे व्यापारी काँग्रेस तालुकाध्यक्ष रुपेश भंडारी यांनी कशाच्याही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने मूकबधिर शाळा मधुकरराव नाईक निवासी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी चिमुकल्यांचा आनंद गगनात मावेनासा दिसून येत होता. शाळा हे ज्ञानाचे मंदिर आपण मानतो याच शाळेत आता अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन उच्च शिक्षण घेऊन कोणत्यातरी क्षेत्रात पदवीधर राहणार. शिक्षण हे वाघिणीचे दूध असून ते प्राशन केल्यानंतर गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. याच अनुषंगाने रुपेश भंडारे यांनी इतरत्र गोष्टीला वाव देत आडफाटा घालत शाळेतील विद्यार्थ्यांना वही, पेन वाटप करून वाढदिवस साजरा केला.रुपेश भंडारी यांनी यावेळी असे संबोधित केले की,

निसर्गाचा एक घटक म्हणून हे विश्व प्रत्येकासाठी सर्वसमावेशक बनविले ही आपली जबाबदारी मानून एकत्र जीवन साजरे करण्याचे वचन घेऊया त्यांनी यावेळी सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर राहून चांगली शिक्षण घ्यावे याकरिता भरभरून शुभेच्छा दिल्या , शिक्षण साहित्य वाटप करते वेळी, कृषी उत्पन्न समिती सभापती उमरखेड बाळासाहेब चंद्रे पाटील,बशीर भाई,शाळेतील शिक्षक वृंद हे यावेळी उपस्थित होते.त्यांचा या अनोख्या उपक्रमाने शहरात कुतूहल वाटत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × 2 =