Uttam Jankar on Ajit Pawar : अजित दादा स्वतः 20,000 मतांनी पराभूत, तर महायुतीला फक्त 107 जागा.सर्व EVM चं गणित.आमदार उत्तम जानकर यांचा सनसनाटी दावा!!!महाराष्ट्रात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला फक्त 107 जागा च मिळाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांचाही 20 मतांनी पराभव झाला होता.
तर त्यांच्या पक्षाला फक्त 12 जागा मिळाल्या, असा सनसनाटी दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर अख्या महाराष्ट्रात ईव्हीएम मशीन मध्ये घोळ करण्यात आल्याचा संजय व्यक्त करण्यात येत असून निवडणूक आयोगाची प्रतिष्ठा यामुळे पणाला लागली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर सातत्याने ईव्हीएम मशीन मध्ये छेडछाड झाल्याचा आरोप होत असताना दरम्यान एनसीपी शरद पवार गटाचे माळशिरस विधानसभा मतदारसंघातून जिंकून आलेले आमदार उत्तम जानकर यांनी ईव्हीएम मशीन मध्ये निवडणुकीत झालेल्या छेडछाडी बाबत अनेकदा हा मुद्दा उपस्थित केला आहे.
आता एकदा पुन्हा आमदार उत्तम जानकर यांनी महत्त्वाचे भाष्य केले असून,यात विधानसभा निवडणुकीत पक्षाचे नेते अजित दादा स्वतः बारामती विधानसभा मतदारसंघातून तब्बल वीस हजार मतांनी पराभूत झाले असल्याचे म्हटले आहे.विशेष म्हणजे महाराष्ट्रात 2024 विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा दारुण पराभव होईल,असे मतदानानंतर आलेल्या सर्व एक्झिट पोलच्या अंदाजात कुठेही सांगण्यात आले नव्हते.
खर तर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये टक्कर होणार असल्याचे अनेक सर्वे नंतरही बोलले जात होते.पण मतगणने दरम्यान निवडणूक निकाल खूपच वेगळे आले.तर महाविकास आघाडीच्या तीन पक्षांना पन्नाशीचा आकडासुद्धा गाठता आलेला नाही.तर महायुतीने 230 हून अधिक जागा जिंकुन राज्यात सरकार स्थापन केलेले आहे.
अजित पवार यांच्या विजयावर केले प्रश्नचिन्ह उपस्थित.
आमदार उत्तम जानकर यांनी आता EVM मतगणनेवर मोठा दावा केला असून,राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती मधून झालेल्या विजयावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आपण ईव्हीएमचा अभ्यास केला यंदा विधानसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात बहुमतच मिळालेले नसून महायुतीमधील तीनही पक्षांना एकूण किती जागा मिळाल्या याचे गणितच आमदार जानकर यांनी मांडलेले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत आता पुन्हा राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जानकर यांनी मोठा दावा केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एकदा EVM मशीन मध्ये छेडछाड बाबत विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत.
अजित पवार हे आकड्यांनुसार निवडणूक हरल्याचे दिसत आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार,विधानसभा निवडणुकीत 150 विधानसभा मतदारसंघात EVM मशिनच्या माध्यमातून अनियमितता झाल्याचा दावा आमदार उत्तम जानकर यांनी केलेला आहे.स्वतः अजित पवार हे बारामती मतदार संघातून 20 हजार मतांनी पराभूत झाले,तर महायुतीला फक्त 107 जागाच मिळाल्या आहेत. मतदानासाठी थेट ईव्हीएम कंट्रोल बॉक्समध्ये छेडछाड करण्यात आली आहे. आमदार उत्तम जानकर यांनी तांत्रिकदृष्ट्या यासंदर्भात काही आकडेवारीहीसुद्धा मांडलेली आहे.
उत्तम जानकर शेवटी काय म्हणाले?
या सरकारने घेतलेल्या 2024 विधानसभा निवडणुकीत एकूण 150 जागांवर गडबड घोटाळा झाल्याचे आमदार जानकर यांनी म्हटले आहे. आपण बारामती मतदारसंघांची माहिती घेतली असता तेथून अजितदादांचा तब्बल 20 हजार मतांनी पराभव झाल्याचे कळते. अजित दादांना 1 लाख 80 हजार मते मिळाली,ही एक तृतीयांश आहे.
एक तृतीयांश म्हणजेच त्यांच्या जागी प्रस्ताव ठेवण्यात आला.या संदर्भात त्यांचे प्रतिस्पर्धी युगेंद्र पवार यांची मते पाहिली तर 80 हजार अधिक 60 हजार म्हणजे 1 लाख 60 हजार मते आहेत.यात अजित दादांच्या 1 लाख 80 हजार मतांमधून 60 हजार वजा केले तर एकूण मतांची संख्या फक्त 1 लाख 20 हजार होते आहे.
आ.जानकर यांचा दावा – अजित पवार गटाचे फक्त 12 आमदारच विजयी झाले.
यासंदर्भात बोलताना आ.जानकर यांनी म्हटले आहे की, आपण राज्यातील प्रत्येक मतदारसंघाचा मतदान आणि मतगणनेचे सखोल अभ्यास केले आहे.यातून जे निष्कर्ष निघाले त्यानुसार यंदाच्या निवडणुकीत अजितदादांचे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त 12 आमदार निवडून आले असल्याचा दावा केला आहे.
सोबतच महायुतीत असलेले शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे केवळ 18 आणि भाजपचे 77 आमदार निवडून आले आहेत. महायुतीची एकूण संख्या 107 आहे तर अपक्षांची संख्या 110 आहे. असे उत्तम जानकर म्हणाले आहे.
मारकडवाडी गावात बॅलेट पेपरने मतदान घेण्याचा घेतला होता निर्णय.
विशेष म्हणजे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर एनसीपीएसपी पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी विधानसभा निवडणुकीत माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात आपल्याला भक्कम मते मिळाल्यानंतर ही ईव्हीएम मशीन मधून मतांचा वेगळाच आकडा समोर आल्यानंतर त्यांनी मारकडवाडी गावात स्वतःच्या खर्चाने बॅलेट पेपर निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला होता मात्र निवडणुक विभागाने परवानगी दिली नसल्याने पोलिस हस्तक्षेपमुळे हे मतदान टळले होते.त्यानंतरही जानकर यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली.
निवडणूक आयोग बॅलेट पेपरवर निवडणूक घेणार असेल,तर आपण राजीनामा देण्यास तयार असल्याचे ते म्हणाले होते.यानंतर या गावात पोहोचून महाविकास आघाडीचे नेते शरद पवार,नाना पटोले यांच्या सह विविध नेत्यांनी पोहोचून गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाची प्रशंसा करीत EVM मशीन मध्ये छेडछाड आणि मतांच्या अंतराचा मुद्दा उपस्थित केला होता.