अल्पसंख्यांक आर्थिक विकासासाठी महत्वपूर्ण शासन निर्णय झाल्याने मो. तारिक लोखंडवाला कडून उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांचा सत्कार.
मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला 500 कोटींचा निधी रिलीज करू- उपमुख्यमंत्री Ajit Pawar
कच्ची समाजाला मिळणार आता जाती वैधता प्रमाणपत्र, लवकरच 5 टक्के शिक्षण आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेणार.
यवतमाळ: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या अथक प्रयत्नातून राज्यातील अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या व्यवसायिक विकासाकरिता 500 कोटींचा वाढीव निधी व आधी ओबीसी श्रेणीत असलेले मुस्लिम कच्ची समाजाला मागास प्रवर्गातील जाती वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत महत्वपूर्ण शासन निर्णय नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान घेण्यात आलेला आहे.
मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ ला वार्षिक 30 कोटींच्या जागी आता 470 कोटी वाढवून 500 कोटी रुपये निधी उपलब्ध करण्याचा निर्णय झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून सदर निर्णय झाल्याने या महत्वपूर्ण निर्णयावर आभार प्रकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष मो तारिक लोखंडवाला यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सोमवार 19 डिसेंबर रोजी नागपूर येथे अधिवेशन दरम्यान विजयगढ या निवासस्थानी कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
यावेळी यवतमाळ,पुसद,नेर,सह जिल्ह्यातील विविध तालुक्यातील नागरिक व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.यावेळी कार्याध्यक्ष मो तारिक लोखंडवाला व अन्य मान्यवरांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला,यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले, यावेळी ते म्हणाले की राज्यात मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाला सामाजिक,आर्थिक,राजकीय,उद्योग व शैक्षणिक व विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मी स्वतः सर्वोतोपरी प्रयत्न करीत राहील.
लवकरच महामंडळाला सदर निधी रिलीज करू, सोबतच राज्यात अल्पसंख्यांकांसाठी विकास आयुक्तालय, मुस्लिम अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी आयएएस आयपीएस एकेडमी बनविण्याची सूचना दिली असून शासनात असलेल्या घटक पक्षासोबत चर्चा करून लवकरच राज्यात मुस्लिमाना 5 टक्के शैक्षणिक आरक्षण लागू करू अशी ग्वाही दिली व मौलाना आजाद आर्थिक विकास महामंडळाला यंदा 30 कोटी वरून 500 कोटींचा निधी देण्याचा शासन निर्णय झाला.
यात वाढीव निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली,त्यातून अल्पसंख्यांक मुस्लिम युवकांना व नागरिकांना रोजगारासाठी महत्वपूर्ण मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष तारिक लोखंडवाला यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील व विकासासंबंधी समस्या व संगठन बांधणी बाबत महत्वपूर्ण चर्चा केली.याप्रसंगी जैनुल आबेदिन, जर्रार खान,अब्रार खान, इरफान अकबानी, रियासत अली पुसद,शहजाद शेख,शेख अतिक,करीम खान पठाण,अजय खंताडे,शुभम वानखेडे,नितीन धुळे,मो साबीर,जैद पटेल, सुहेल आमिर काजी,इरफान खान, सज्जाद अली यांच्यासह अनेक लोक हजर होते.
उल्लेखनीय म्हणजे राज्यातील इतर मागासवर्ग मधील अनुक्रमांक ८५ येथे “कची” जातीचा समावेश करण्यात आलेला आहे. शासनपत्र, दि.१८ ऑक्टोबर, २०१२ अन्वये इतर मागासवर्ग, अनुक्रमांक ८५ “कची” मध्ये “कची/ /कच्छी” अशी दुरुस्ती करण्यात आलेली आहे. अधिनियम-२००१ व नियम – २०१२ मधील विहीत केलेल्या तरतूदींनुसार इतर मागासवर्ग मधील अनुक्रमांक ८५ येथे नमूद केलेल्या “कची/ कच्ची / कच्छी” या मागासवर्गीय जातींना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र विहीत मुदतीत निर्गमित करण्याची कार्यवाही संबंधित सर्व सक्षम प्राधिकारी यांनी करावी.
अशा सूचना या परिपत्रकाद्वारे देण्यात येत आहेत.यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार,सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे व संबंधित विभागाकडून महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आल्यामुळे हा निर्णय लागू झाला त्यामुळे जिल्ह्यातील व राज्यातील समाजाला दिलासा मिळाला असल्याने याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष तारिक लोखंडवाला व उपस्थितांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याप्रती कृतज्ञता प्रकट केली.