UPI New Updates : आधुनिक डिजिटल आणि ऑनलाईन पेमेंट प्रणाली मध्ये युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थातच यूपीआय पेमेंट (UPI Payments) माध्यमातून आर्थिक व्यवहार करणे आजकाल सर्वसामान्य बाब झाली आहे.
भाजीपाला ते मोठमोठे मॉल्स,इतर सर्व दुकानात आर्थिक देवाण-घेवानीसाठी यूपीआय माध्यम सर्वांसाठी सुविधाजनक प्रक्रिया आहे. मात्र आता युपीआय माध्यमातून आर्थिक व्यवहार करण्याच्या नियमात एक फेब्रुवारी 2025 पासून बदल होणार आहे.
यूपीआय माध्यमातून आर्थिक व्यवहार करत असताना सर्वांसाठी महत्त्वाची बातमी आहे,कारण एनपीसीआय अर्थातच नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया कडून 1 फेब्रुवारीपासन यूपीआय प्रणाली वापरत असताना यात काही विशिष्ट प्रकारचे व्यवहार ब्लॉक करण्यात येणार आहे. National Payments Corporation Of India Change UPI ID System.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून नुकतेच या संबंधात एक परिपत्रक Circular सार्वजनिक करण्यात आला आहे.1 फेब्रुवारी पासून यूपीआय प्रणाली वापरत असताना यादरम्यान स्पेशल कॅरेक्टर्सने तयार केलेल्या यूपीआयडीसह आर्थिक व्यवहार स्वीकारले जाणार नाही.अशी माहिती या परिपत्रकात देण्यात आलेली आहे.
यूपीआय युजर्स UPI Users फक्त अल्फा न्यूमेरिक कॅरेक्टर्स द्वारे तयार यूपीआय आयडी द्वारेच आपले आर्थिक व्यवहार करू शकतील. यादरम्यान जे युजर्स एनपीसीआयचे टेक्निकल स्पेसिफिकेशन नियम फॉलो करणार नाहीत,अशा युजरची युपीआय आयडी ब्लॉक होईल असे या परिपत्रकात म्हटलेले आहे.
देशात यूपीआय माध्यमातून आर्थिक व्यवहार वाढविण्याचे टार्गेट.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने देशात यूपीआयच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार वाढविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवली आहे. देशात एनपीसीआयने अशावेळी हा निर्णय घेतला आहे,जेव्हा आर्थिक क्षेत्रात रिटेल पेमेंट ऑपरेटर्स आपल्या व्यवहारात यूपीआय पर्यायांचा वापर वाढविण्याचे लक्ष ठेवत आहे.
वर्ष 2016 मध्ये भारतात 1 हजार आणि 500 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आले होते.यानंतरच भारतात यूपीआय पेमेंट माध्यम आणि डिजिटल आर्थिक व्यवहारात तीव्र गतीने वाढ झालेली आहे.
स्पेशल कॅरेक्टर्स यूपीआय आयडीवर बंदी.
एनपीसीआयने यापूर्वी सर्वसामान्य नागरिकांना व्यवसायिकांना आणि इतर सर्व युपीआय आयडी घेऊन आर्थिक व्यवहार करणाऱ्या लोकांना स्पेशल कॅरेक्टर्स ऐवजी Alfa Numeric कॅरेक्टर आपल्या आर्थिक व्यवहारात वापरण्याचा सल्ला दिलेला होता.
या निर्देशाचे अनेक लोकांनी पालनही केले आणि त्यात बदलही केला, पण अद्यापही अनेक युजर्स या नियमांचे पालन करत नाही,हे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या लक्षात आलेले आहे,त्यामुळे याचे पालन व्हावे यासाठी कठोर पावले उचलण्याची सुरुवात केली आहे.
यामुळे यूपीआय ट्रांजेक्शन आयडी मध्ये आता कोणताही व्यक्ती स्पेशल कॅरेक्टर्स वापरू शकणार नाही हे नियम एक फेब्रुवारी 2025 पासून लागू होणार आहे.
देशात मागील काही वर्षांपासून यूपीआयच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार सहजपणे होत आहे.मोठ्या प्रमाणात या माध्यमाचा वापर वाढला आहे. डिसेंबर 2024 पर्यंत देशात यूपीआय आर्थिक व्यवहारांची संख्या ही 16.73 अब्जांवर पोचली आहे.
आता 1 फेब्रुवारीपासून युपी आयडी मध्ये स्पेशल कॅरेक्टर वापरणाऱ्या युजरचे व्यवहार NPCI ब्लॉक करणार आहे.हे नियम लागू होण्यापूर्वी यूपी यूजर्स कडून तात्काळ आपल्या आयडी मध्ये आवश्यक बदल करणे आवश्यक झालेले आहे.