*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर*
Ultratech Cement Limited, माणिकगढ समाजाच्या विकासा सोबतच कर्मचारी व ग्रामवासियांच्या सुरक्षा व स्वच्छताच्या च्या बाजूने विचार करीत असते. आजच्या या धावत्या युगामध्ये अपघाताचे प्रमाण वाढत आहेत हे लक्षात घेऊन माणिकगढ ने राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह चे आयोजन केलेत. याचे उदघाटन अल्ट्राटेक, माणिकगढ चे युनिट हेड अतुल कन्सल यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून रोड स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यानुसार वाहतुकीची रहादारी कमी असतानि दि 6 मार्च च्या रात्री 11 ते सकाळी 6 प्रयत्न माणिकगढ प्रशासन पथका द्वारे प्लांट मुख्य द्वार ते रामकृष्ण हॉटेल गडचांदूर चौक पर्यंत रोड च्या दोन्ही बाजूची स्वच्छता कर्मचारी वर्ग द्वारे तसेच माती गोटे यांछी सफाई आनी पाण्याचा छीडकावं करून करण्यात आली.
सोबतच सर्व रोड वर उभी अनधिकृत वाहन सुद्धा हटविण्यात आले त्यामुळे त्या रोडला एक वेगळे स्वरूप प्राप्त झाले व ग्रामवासियांचा त्रास कमी झाला. सोबतच या कार्यक्रमात सुरक्षा नुक्कड नाटक, कविता, सुरक्षा जण जागृती, महिलांकरिता रांगोळी स्पर्धा आनी रॅली शो करण्यात आला. या कार्यक्रमात बोलतांना युनिट हेड नि सर्व अधिकारी,कर्मचारी तसेच समाजातील लोकांनी सुरक्षा नियमांचे काटेकोर पणे पालन करावे असे सांगितले.
या सात दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन माणिकगढ च्या सुरक्षा व प्रशासन विभागाने केले व त्याला यशस्वी करण्याकरिता सर्व विभागाने सहभाग नोंदविला. जवळपास पाचसे कर्मचारी आनी इतर कर्मचारी यांनी या सप्ताहचा लाभ घेतला.