UltraTech Cement Limited, माणिकगड तर्फे बैलमपूर येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबीर.

UltraTech Cement Limited, माणिकगड तर्फे बैलमपूर येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबीर.

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर*

UltraTech Cement Limited, माणिकगढ आपल्या सामाजिक दायित्व द्वारे आजूबाजूच्या गावाचा आरोग्याकडे लक्ष देत आज बैलमपूर येथील अंगणवाडी क्रमांक 1 मध्ये मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिराचे आयोजन केलेत. या शिबिरात एकूण 107 वृद्ध महिला व पुरुष यांची तपासणी करून त्यांना औषपचार करण्यात आला तर एकूण 70 लोकांच्या डोळ्याचा नंबर काढून चष्मा बनविण्याकरिता पाठविण्यात आला.

पुढील 1 हफ्तायामध्ये सर्व 70 लोकांना चष्मा बनवून वाटप करण्यात येणार आहेत. या शिबिरात नेत्र चिकित्सक, चंद्रपूर ड्रॉ. पराग टेम्भूर्णे व त्याच्या पथकाची उपस्थिती होती. तसेच गांवतील अंगणवाडी शिक्षिका, मदतनीस आशा वर्कर व ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रतिष्टीत नागरिक यांची उपस्थिती होती. या शिबिराला यशस्वी करण्यास सी.एस. आर.टीम माणिकगड ने अथक प्रयत्न केलेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

15 − 2 =