प्रा.डॉ. Ujvala Vasudev Vasekar आचार्य पदविने सन्मानित.
*चन्द्रपूर जिल्हा प्रतिनिधि प्रमोद खिरटकर*
मूळची चंद्रपूर येथील आणि श्री गुरुगोविंद सिंग महाविद्यालय चंदीगड (पंजाब)येथे सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेली प्रा. Ujvala Vasudev Vasekar ही ॲड.वासुदेव व आशा वासेकर यांची कन्या आणि डॉ. विजय नामदेव झाडे मूळचे मु. वणी जि. यवतमाळ आय ए एस वित्तीय सचिव चंदीगड यांच्या पत्नी असून त्यांना नुकतीच देश भगत विद्यापीठ पंजाब विद्यापीठाने आचार्य पदवी देऊन पद्धतीने सन्मानित केले आहे.
त्यांचा संशोधनाचा विषय ‘एन इमेज प्रोसेसिंग टेक्निक फोर डिटेक्शन अँड क्लासिफिकेशन ऑफ डायबिटीक रेतीनोपथी इन रेटीस्तनल फंडस इमेजेस ‘हा आहे .त्यांनी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर सात संशोध न पेपर सादर केले असून एम एस सी संगणक नागपूर विद्यापीठ नागपूर तर , एम सी ए एम डी यू रोहतक हरियाणा येथून पदवी प्राप्त केली आहे युजीसी नेट परीक्षा 2017 मध्ये उत्तीर्ण झालेली आहे.
प्रा.उज्वला झाडे या महिला विकास बालकांचे कल्याण यासाठी सामाजिक कार्य रेडक्रॉस सोसायटी फरिद कोट आणि मोगा (पंजाब ), वाटिका स्कूल चंदिगड यांच्या माध्यमातून सातत्याने काम करीत आहे. प्रा.उज्वला झाडे या महाराष्ट्र राज्याचे 2015 ते 2018 मध्ये बुलढाणा येथे जिल्हाअधिकारी म्हणून कार्यरत असलेले तसेच सहकार आयुक्त पुणे येथे राहलेले विजय नामदेव झाडे.
सध्या वित्तीय सचिव चंदीगड यांच्या त्या सहचारिणी असून चंद्रपुरातील प्रख्यात विधीतज्ञ ॲड वासुदेव वा सेकर आणि आशाताई वासेकर यांच्या सुकन्या आहे. त्यांना मिळालेल्या या आचार्य पदवीच्या यशाबद्दल पदवीचे मार्गदर्शक ,पती विजय झाडे आई वडील मुलगा वेदांत तसेच इतर सहकारी मित्रपरिवार नातेवाईक या सर्वांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.