येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात दोन्ही राजकीय आघाड्यांकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी व जागा वाटपाची चर्चा होत आहे.अश्यात महाविकास आघाडीमध्ये असलेल्या शिवसेनेची मुंबई उपनगरातील विधानसभा मतदारसंघाची 22 उमेदवारांची यादी आज माध्यमांमध्ये लीक झाल्याचा दावा माध्यमातून सूत्र करीत आहे. सूत्रांकडून समोर येत असलेल्या माहितीनुसार शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ज्या 14 विधानसभा मतदारसंघात जोरदार विजय मिळाला होता,त्या जागा मिळून एकूण 22 जागा शिवसेना युबीटी कडून करण्यात आली आहे. त्यामुळे येथून हा पक्ष नक्कीच आपले उमेदवार उतरविणार हे यामुळे निश्चित होताना दिसत आहे.मात्र बुधवार 5 सप्टेंबरच्या संध्याकाळपर्यंत शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून याला कोणता देण्यात आला नव्हता.
विरोधकांचा डाव तर नाही.
येत्या विधानसभा निवडणुकीसाठी एकीकडे महाविकास आघात आघाडीत जागा वाटपाची चर्चा,राजकीय समीकरणे आणि काँग्रेस राष्ट्रवादी आणि युबीटी शिवसेना मिळून 288 पैकी प्रत्येक घटक पक्षाला एकूण किती जागा मिळेल कोणता पक्ष कुणाला कुठून लढविणार याच्यावर राजकीय मंथन सुरू आहे. तर महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षातही जागावाटपाबाबत चर्चा आहे पण कुणीही संभाव्य उमेदवार आणि त्यांच्या यादी बाबत या आघाडीतील नेते अद्याप सार्वजनिक प्रतिक्रिया देण्यासाठी समोर आले नाहीये. पण ज्या इच्छुक किंवा संभाव्य उमेदवार आहेत,त्यांच्या एकमेका प्रती अविश्वास निर्माण करून किंवा नाराजी पसरवून पक्षांतरांसाठी राजकीय चाल तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये अविश्वास निर्माण करण्यासाठी विरोधकांचा हा डाव तर नाही ना? अशी चर्चा सुरू आहे.
एकूण 36 मतदारसंघ.
शिवसेना ठाकरे गटातून मुंबईत संभाव्य उमेदवार पक्षाकडूनच ठरवून त्याची यादी बनविण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.मुंबईत एकूण ३६ विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी ठाकरे गट २२ जागांवर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. यामुळेच युनिटी गटाकडून संभाव्य 22 उमेदवारांची यादी बनवून त्यावर पक्षस्तरावर चर्चा करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मुंबईतील संभाव्य उमदेवार :
1. विलास पोतनीस / सुदेश पाटेकर/ संजना घाडी : मागाठणे
2. विनोद घोसाळकर : दहिसर
3. सुनिल प्रभू : दिंडोशी
4. अमोल किर्तीकर/ बाळा नर/ शैलेश परब : जोगेश्वरी
5. ऋतुजा लटके : अंधेरी पश्चिम
6. राजू पेडणेकर/ राजूल पटेल : वर्सोवा
7. वरूण सरदेसाई : वांद्रे पूर्व
8. विशाखा राऊत/ महेश सावंत : दादर-माहिम
9. अजय चौधरी/ सुधीर साळवी : शिवडी
10. आदित्य ठाकरे : वरळी
11. किशोरी पेडणेकर/ जामसूतकर/ रमाकांत रहाटे : भायखळा
12. ईश्वर तायडे : चांदीवली
13. अनिल पाटणकर/ प्रकाश फार्तेपेकर : चेंबुर
14. रमेश कोरगांवकर : भांडुप
15. सुनिल राऊत : विक्रोळी
16. संजय पोतनीस : कलिना
17. विठ्ठल लोकरे / प्रमोद शिंदे : अणुशक्तीनगर
18. सुरेश पाटील : घाटकोपर
19. प्रविणा मोरजकर : कुर्ला
20. निरव बारोट : चारकोप
21. समीर देसाई : गोरेगाव
22. श्रद्धा जाधव : वडाळा
14 जागांवर मिळविला होता मागील निवडणुकीत विजय.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीत असलेल्या शिवसेनेकडून मुंबई शहर व उपनगरातून मोठ्या दिमाखात निवडणूक लढण्यात आली होती. शिवसेनेचा मुंबई पट्टा त्याचा बालेकिल्ला असून येथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून या पक्षाचा मोठा प्रभाव आहे.यात उद्धव ठाकरे यांचे पक्षाचे त्यावेळी 14 आमदार मुंबईतून निवडणूक जिंकले होते,त्यामुळे हा शिवसेनेसाठी मुंबई विभागात दणदणीत विजय होता.
या निवडणुकीची युपीटी गटाकडून मुंबई शहर व विभागात आपला बालेकिल्ला अजिंक्य राखायचा आहे त्यामुळे महाविकास आघाडीत चर्चा होत असताना सर्वात आधी शिवसेनेने उमेदवारांची निवड करताना संभाव्य यादी बनविली आहे ती आता समोर येत असल्याने या सर्व जागांवर शिवसेना युबीटी गटाचा पक्का दावा आहे हा मुद्दा येथे समोर येत आहे.
किल्ला पुन्हा अजिंक्य ठेवण्याच्या तयारीत शिवसेना युबीटी.
मुख्य शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाल्यानंतर एकनाथ शिंदे गटात उद्धव ठाकरे गटातील अनेक आमदार गेले होते. त्यात मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यातील काही आमदारांचा समावेश होता त्यामुळे युपी शिवसेना यंदा शिंदे गटात गेलेले आमदार जर पुन्हा निवडणूक लढत असतील तर त्यांच्या विरोधात तगडे उमेदवार देण्यासाठी यूबीटी.सज्ज दिसत आहेत.सूत्रांच्या माहितीनुसार या 22 जागांपैकी जेथून शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार विधानसभा लढतील तेथून त्यांना टक्कर देण्यासाठी युबीटी गटाने ताकदवर उमेदवार मैदानात उतरविण्याची तयारी केली आहे,जेणेकरून शिवसेनेचा हा बालेकिल्ला अबाधित राहावा.अशी चर्चा माध्यमातून लीक झालेल्या यादी नंतर होत आहे.दरम्यान शिवसेना यूबीटी पक्षाकडून माध्यमांना अद्याप पर्यंत या leak झालेल्या संभाव्य यादी बाबत दुजोरा देण्यात आला नाही हे येथे विशेष.