TVS CNG Scooter : मुळात भारतीय आणि जगात प्रख्यात ऑटोमोबाईल कंपनी असलेल्या टीव्हीएस TVS कंपनीने जगातील पहिली सीएनजी स्कूटर बनविली असून टीव्हीएस ऑटोमोबाईल कडून या सीएनजी स्कूटरला बाजारात लवकरच लॉन्च करण्याची योजना तयार झाली आहे.
यापूर्वी बजाज कंपनीची फ्रीडम 125 बाईक सारखीच TVS च्या या CNG Scooter चालविण्यासाठी CNG आणि Petrol असे दोन पर्याय असेल. ही सीएनजी स्कूटर 226 किलोमीटर मायलेज देणार असून याची किंमत एकूण आणि डिझाईन पाहताच ग्राहक याला घेण्यासाठी आकर्षित होणार,अशा नवीन आकर्षक लुक मध्ये या वाहनाला बनविण्यात आले आहे.
टीव्हीएस ग्रुप TVS Indian Multinational Automobile Company ही एक भारतीय बहुराष्ट्रीय समूह आहे याचे हे भारतातील मदुराई येथे मुख्यालय आणि आंतरराष्ट्रीय मुख्यालय दक्षिण भारतात चेन्नई शहरात आहे. दुचाकी वाहन उत्पादक असलेली भारतीय TVS मोटर कंपनी आहे.
TVS सप्लाय चेन सोल्युशन्ससह भारताच्या या कंपनीची जगात 50 पेक्षा जास्त उपकंपन्या कार्यरत आहेत. भारताच्या या टीव्हीएस कंपनीने जगात पहिली अशी सीएनजी आणि सोबतच पेट्रोल ऑप्शन असणारी सीएनजी स्कूटर बनविली असून याचे नाव जुपिटर सीएनजी Jupiter CNG असे आहे.
नुकतेच भारतातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी असलेल्या टीव्हीएस TVS Automobiles ने आपली जगातील पहिली सीएनजी स्कूटर Auto Expo 2025 मध्ये प्रदर्शित केली.
याला मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यापूर्वी टीव्हीएस ऑटोमोबाईल कंपनी या स्कूटरमध्ये सीएनजी, सोलर पावर आणि इलेक्ट्रिक पॉवर या 3 ऑप्शन्सह नवीन असे हायड्रोजन गॅस इंधन आणि इतर अनेक इंधन ऑप्शन्सची पडताळणी करीत आहे.यानंतर लवकरच ही सीएनजी स्कूटर भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे.
Conceptual Model म्हणून ऑटो एक्सपो मध्ये सादर.
भारतीय बाजारपेठेत यापूर्वी बजाज ऑटोमोबाईल कंपनीने जगात पहिली TVS CNG Scooter सीएनजी बाईक भारताचे बाजारात दाखल झाल्यानंतर देशातील या दोन्ही आघाडीच्या आठ उत्पादक कंपन्यांमध्ये सीएनजी आधारित वाहने उत्पादन करण्यासाठी एका प्रकारे स्पर्धा दिसत आहे.कारण बजाजच्या सीएनजी बाईक नंतर लगेच टीव्हीएस ने देशातील सर्वात मोठे ऑटो एक्स्पो 2025 मध्ये आपली आकर्षक अशी सीएनजी स्कूटर प्रदर्शित केलेली आहे.
सध्या टीव्हीएस ऑटोमोबाईल जुपिटर सीएनजी हे स्कूटर फक्त संकल्पित मॉडेल (Conceptual Model) म्हणून या ऑटो एक्सपो मध्ये सादर केले आहे. पण टीव्हीएस TVS CNG Scooter कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार लवकरच ही सीएनजी ज्युपिटर ग्राहकांसाठी उत्पादित करून वाहन बाजारात याला लॉन्च करण्यात येणार आहे.पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही इंधन पर्यायांवर हा वाहन धावणार आहे.
125cc चे इंजिन,1 किलो CNG मध्ये देणार 84 किमी.मायलेज?
TVS कंपनीने ने Jupitar CNG या स्कूटरचे इंजिन 125cc चे बनविले आहे.आधीच्या जुपिटर सारखेच हे इंजिन असून यात 1.4 किलोग्रॅम सीएनजी साठी टाकी,आणि अतिरिक्त 2 लिटर ची पेट्रोल टाकी बसविण्यात आलेली आहे.टीव्हीएस ज्युपिटर सीएनजी फक्त एक किलो सीएनजी गॅसवर 84 किलोमीटर चा मायलेज देणार आहे.
असा दावा टीव्हीएस ऑटोमोबाईल कंपनीने याला प्रदर्शित करताना केलेला आहे. यातील सीएनजी टाकी एकदा भरली की,ही स्कूटर तब्बल 226 किलोमीटर मायलेज देणार आहे.या स्कूटरमध्ये ओबीडी 2 बी (OBD 2B) कंम्प्लायंट इंजन Complaint Engine बसविण्यात आलेला आहे,जो 5.3 bhp पॉवर आणि 9.4 टार्क जनरेट Torc Generation करते.
किमती संदर्भात फक्त अंदाजच व्यक्त होत आहेत.
यापूर्वीच्या टीव्हीएसच्या ज्युपिटर TVS JUPITOR पेट्रोल व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत 88 हजार 174 रुपये पासून 99 हजार 15 रुपयेदरम्यान आहे. त्यामुळे आता TVS CNG Scooter (सीएनजी स्कूटरची) एक्स शोरूम किंमत ही भविष्यात साधारण 90 हजार ते 99 हजार रुपये पर्यंत असू शकते,असा अंदाज सुरुवातीला वर्तविण्यात येत आहे.
मात्र सध्या या सीएनजी स्कूटर च्या किमती बद्दल विविध अंदाजच व्यक्त केले जात आहे,कारण कंपनीने या वाहनाच्या किंमत संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती सार्वजनिक केलेली नाही. त्यामुळे टीव्हीएस ऑटोमोबाईल कंपनीकडून ही स्कूटर भारतात लॉन्च करताना याची किंमत 1 लाखापेक्षा कमी राहणार का थोडी जास्त राहणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हे राहू शकतात TVS CNG Scooter चे नवीन फीचर्स.
टीव्हीएस ज्युपिटर सीएनजी स्कूटर मध्ये जो मॉडेल ऑटो एक्सपो मध्ये प्रदर्शित करण्यात आला.त्यात विविध आकर्षक फीचर लावण्यात आले होते.त्यामुळे या सीएनजी स्कूटरमध्ये विविध मॉडेल्स आणि यात आधुनिक,डिजिटल आणि स्मार्ट फीचर्स राहणार असल्याची शक्यता आहे.
यात फोन चार्जिंग साठी अतिरिक्त यूएसबी चार्जिंग पोर्ट,UCB,स्टॅन्ड कट,ऑफ सेफ्टी सिस्टम,ब्लूटूथ कनेक्ट सपोर्ट सिस्टम आदी फीचर्स राहू शकतात. मात्र टीव्हीएस CNG स्कूटर मध्ये पेट्रोलसह सीएनजी टाकी राहणार आहे.त्यामुळे बुट स्पेस थोडा कमी राहू शकते.