Traveling Allowance for Employees : सरकारी कर्मचाऱ्यांना नुकतेच राज्य सरकारने 3 टक्के महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेत यावर अमल करणे सुरू केलेले आहे.आता राज्य सरकारने काही कर्मचाऱ्यांना या महिन्यात दुसरी अशी महत्त्वाची आर्थिक भेट दिलेली आहे.महागाई भत्ता लागू करून या पाठोपाठ राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आता एक नवा भत्ता सुद्धा मिळणार आहे.राज्यभरात हजारो कर्मचाऱ्यांना या नव्या भत्त्याचा लाभ मिळणार आहे.
राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नुकतेच 50 टक्के वरून 53% केलेला आहे.सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी ही भत्तेवाढ जुलै 2024 पासून लागू करण्यात आली असून,फेब्रुवारी महिन्यात वेतनासह कर्मचाऱ्यांना आपले थकित आणि वाढीव महागाई भत्ता देण्याची सुरुवात झालेली आहे.
यानंतर आता राज्यभरात काही कर्मचाऱ्यांना आणखी एक दुसरा मोठा असा भत्ता लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे.सोबतच निधी मंजूर करून वाटपास मान्यताही दिली आहे. कोणत्या कर्मचाऱ्यांना हा नवीन भत्ता मिळणार आहे ते आपण या माध्यमातून जाणून घेऊया…….
Traveling Allowance for Employees : काही कर्मचाऱ्यांना आता सरकारने वाहतूक भत्ता सुद्धा लागू.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता महाराष्ट्र सरकारने नुकतेच वाढविला असून महागाई भत्त्यात सुधारित वाढ करण्याचा शासकीय निर्णय सुद्धा लागू झालेला आहे.आता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्य कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता देण्याची सुरुवात केलेली आहे.
जुलै 2024 पासून याला लागू करण्यात आला,असून सातव्या वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना यामुळे मोठा फायदा मिळालेला आहे.उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी महाराष्ट्रात राज्य कर्मचाऱ्यांना फक्त 50 टक्के दराने महागाई भत्ता देण्यात येत होता.
आता सरकारने या 3 टक्क्याची वाढ केलेली आहे.त्यामुळे आता Dearness Allowance {DA} 53 टक्के झालेला आहे.महागाई भत्तेवाढीच्या या निर्णयानंतर आता राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून,राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या अनेक विभागांच्या काही कर्मचाऱ्यांना आता सरकारने वाहतूक भत्ता सुद्धा लागू केलेला आहे.
विशेष श्रेणीतील शिक्षकांसाठी सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय.
यासंदर्भात नुकतेच समोर आलेल्या माहितीनुसार,महाराष्ट्र सरकारने अशा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हा प्रवास भत्ता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे,जे दिव्यांग शाळेतील शासकीय कर्मचारी आहेत.
अपंग समावेशित शिक्षण योजना प्राथमिक स्तर अंतर्गत राज्यात कॉन्टॅक्ट बेसवर कार्यरत असलेले दिव्यांग विशेष श्रेणीतील शिक्षकांसाठी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार आता अशा दिव्यांग शिक्षक कर्मचाऱ्यांना सरकारने वाहतूक भत्ता देण्याचा निर्णय लागू केला आहे.
27 फेब्रुवारी 2025 शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने जारी केलेला.
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय नुकतेच घेतला असून 27 फेब्रुवारी 2025 या दिनांकला शासन निर्णय राज्य शासनाचे शालेय शिक्षण विभागाने जारी केलेला आहे.यापूर्वी सरकारने या निर्णयाला मान्यता दिली आहे.
आता या शासन निर्णयात हे नमूद करण्यात आलेले आहे की,राज्यात समग्र शिक्षा अभियान योजना अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय स्तरावर वाहतूक भत्ता देण्यात येईल.
यात महत्त्वाचे म्हणजे राज्य सरकारने अशा दिव्यांग शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी प्रवास भत्ता मिळावा,यासाठी निधी सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे.
राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे राज्यभरात 6 जिल्हा समन्वयक,52 विशेष शिक्षण समावेशित शिक्षक,आणि 158 विशेष शिक्षक असे एकूण 216 कर्मचाऱ्यांना या प्रवास भत्त्याचा फायदा मिळणार आहे.
20 एप्रिल 2022 रोजी राज्य शासनाच्या वित्त विभागाने हा निर्णय लागू केला होता.
उल्लेखनीय म्हणजे 20 एप्रिल 2022 रोजी राज्य शासनाच्या वित्त विभागाने हा निर्णय लागू केला होता.राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून जारी करण्यात आलेल्या या जीआर नुसार आता संबंधित कर्मचाऱ्यांना प्रवास भत्ता लागू करण्यासाठी 27 फेब्रुवारी 2025 रोजीच्या शासन निर्णय अंतर्गत मंजुरी देण्यात आलेली आहे.
त्यामुळे आता ऑगस्ट २०२४ ते फेब्रुवारी 2025 या कालावधी दरम्यान अशा कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे.यासाठी 44 कोटी तीन लाख रुपये इतका निधी वाटप निश्चित करण्यास शिक्षण मंत्रालयाने मान्यता दिली असून,यामुळे अशा दिव्यांग शिक्षक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.