TRAI Warning : ‘कोणते ते नंबर्सचे कॉल्स’ ज्यामुळे याल अडचणीत ? सरकारने,120 कोटी मोबाईल धारकांना काय दिला इशारा ?
देशात अलीकडे मोठ्या प्रमाणात सायबर गुन्ह्यांमध्ये ( Cyber Crime) वाढ झाली आहे.देशातील विविध भागात मोबाईलच्या माध्यमातून नागरिकांना लाखो रुपयांना लुटल्या जात असल्याच्या तक्रारी सायबर पोलिसांना प्राप्त होत आहेत. त्यामुळे आता सरकारने देशातील एक कोटींपेक्षा जास्त मोबाईल धारकांना टेलिकॉम रेगुलरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून मोठा इशारा दिला आहे.”TRAI”ने देशभरात स्मार्टफोन मोबाईल वापरणारे 120 कोटी भारतीयांना फ्रॉड कॉल पासून वाचविण्यासाठी मोठा इशारा दिला आहे. नागरिकांना सायबर क्राईम पासून वाचविण्यासाठी कोणत्या नंबरवर फ्राड कॉल येतात याबाबत जनजागरण सुरू करण्यात आले आहे.
आधुनिक युगात भारतात मोठ्या प्रमाणात मोबाईल यूजरची संख्या वाढली आहे.शहरी ते ग्रामीण भागात प्रत्येक नागरिकाच्या हातात स्मार्टफोन किंवा इतर फोन राहतात. या व्यतिरिक्त आधुनिक जगात मोबाईलच्या माध्यमातून इंटरनेट वापरून इमेल्स, बँकिंग व्यवहार आणि इतर खूप सारे ऑनलाइन पेमेंटचे व्यवहार होतात. यासाठी सर्वांना मोबाईल फोनची गरज राहते.मात्र या युगात आधुनिक पद्धतीनेच मोबाईल वरून सायबर क्राईम आणि फ्रॉड कॉलिंग ने आर्थिक लूट होत आहे.
अनेक समाजकंटक आधुनिक तंत्रज्ञानाचा यासाठी फायदा उचलत आहे. देशभरात सायबर क्राइमची वाढती संख्या पाहता सरकारने यासाठी ट्रायच्या माध्यमातून महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. टेलिकॉम ऑथॉरिटी ऑफ इंडिया ने असे लाखो फोन नंबर चिन्हीत केली आहे,ज्यामुळे नागरिक फ्रॉड कॉल पासून वाचणार आहे
सरकार आणि नागरिकांसमोर समोर,आव्हान TRAI ने केले समाधान.
देशभरात हजारो प्रकरणी दररोज अशी होतात ज्यात frod कॉल करून ऑनलाइन पद्धतीने आर्थिक लूट होत आहे.याचा सर्वसामान्य नागरिक शिकार होतो.आर्थिक लूट झाल्यानंतर ज्याने लूट केली त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ट्रायच्या सूचना, गाईडलाइन आणि सायबर क्राईम पोलीस द्वारे आधुनिक पद्धतीचा वापर करण्यात येते,तरीही खूप प्रकरण अशी असतात ज्यात लुटणाऱ्यांपर्यंत पोहोचणे कठीण असते. यात मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय फ्रॉड कॉल्सचे समावेश असते.त्यामुळे नागरिकांनी सावधान रहावे या उद्देशाने आणि ऑनलाईन आर्थिक लुट टाळण्यासाठी सरकारने देशभरातील मोबाईल युजर्सना आता महत्त्वाचा इशारा जारी केला आहे.
काय आहे इशारा.
केंद्र सरकारने नागरिकांना आंतरराष्ट्रीय नंबर वरून येणाऱ्या मोबाईल कॉल्स बाबत एक इशारा जारी केला आहे. सरकारने टेलिकाम अथॉरिटी ऑफ इंडियाद्वारे विशेष सूचना जारी केली आहे.सोबतच देशभरात कार्यरत दूरसंचार विभागाद्वारे मोबाईल धारकांना विशिष्ट क्रमांकावरून येणाऱ्या कॉल्सला प्रतिसाद किंवा असे कॉल्स अटेंड न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हे आहेत ते Numbers : +77, +89, +85, +86, +84
🚨 ALERT: Beware of International Fraud Calls!
Ruko aur Socho:
👉 Be cautious of numbers like +77, +89, +85, +86, +84, etc.
👉 DoT/TRAI NEVER makes such calls.
Action Lo:
✅ Report suspicious calls on https://t.co/6oGJ6NSQal via Chakshu.
✅ Help DoT block these… pic.twitter.com/6No8DHss3o
— DoT India (@DoT_India) December 2, 2024
नागरिकांना असे कॉल येत असल्यास त्याला अटेंड न करता दूर संचार विभागाच्या “चक्षु”या विशेष पोर्टलवर याची तक्रार दाखल करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. याव्यतिरिक टेलीकॉम रेकॉर्ड रेगुलरिटी ऑफ इंडिया द्वारे वेळोवेळी नागरिकांना एसएमएस किंवा कॉल च्या माध्यमातून याबाबत सूचना देण्यात येतात.
मोबाईल धारकांनी सुद्धा सावधानी बाळगणे गरजेचे.
विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा ट्रायच्या गाईडलाईनुसार मोबाईल धारकांना आपल्या कॉन्टॅक्ट नंबर शिवाय येणारे विविध कंपन्यांचे कॉल, spam कॉल्स fraud कॉल्स लिहून येते. तर दुसरीकडे ट्रू कॉलरच्या माध्यमातून कुणीही असे कॉल्स कोण करीत आहेत, ते आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये आहे किंवा नाही, कोणत्याही मित्राने आप्तस्वकीय किंवा व्यक्तिगत व्यावहारिक व्यक्तीने कॉल केले का याची शहानिशा करता येते.एकूणच आर्थिक रित्या फसविणारे कॉल्स पासून वाचण्यासाठी नागरिकांनी सुद्धा सावधानता बाळगणे गरजेचे आहे.