Traffic New Rule : आपल्या मुलांना आपण बाईक, कारची चावी देतात का ? तर आता गाडी जप्त होणार !
..
मुंबई पोलीस आणि राज्य पोलीस विभागाने वाहन चालकांसाठी खूपच महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अनेक पालक आपल्या मुलांना लाडीगोडीने कार किंवा बाईक चालविण्यासाठी देतात,किंवा त्यांना नवीन कार-बाइक खरेदी करून देतात,मात्र आता या सर्व गोष्टींवर पालकांना फेरविचार करावा लागणार आहेत.मुलांना कार बाईक चालविण्यासाठी देताना,ती पोलिसांकडून आता जप्त करण्यात येणार आहे. का जप्त होणार आहे, तर ते आता आपण जाणून घेऊ या…..
राज्य पोलिसांनी वाहन चालकांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने आता अल्पवयीन किंवा लहान वयाच्या मुलांना वाहन चालविण्यासाठी देताना किंवा खरेदी करण्यापूर्वी पालकांनी पोलिसांचे नियम आणि कारवाई लक्षात घ्यायला हवी. या आदेशानुसार, आता अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांकडे वाहन असेल किंवा तो चालवत असेल,तर त्यांची वाहने जागेवरच पोलीस जप्त करणार आहे. राज्य पोलिसांचा हा सर्वात मोठा निर्णय आणि या संबंधात होणारी कारवाई ही महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
यासोबतच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर या वयाच्या चालका संदर्भातही पोलिसांनी निर्णय घेतला आहे.जर मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकाचा वय 20, वर्षांपेक्षा कमी असेल तर,अशा चालकांवर नियमानुसार कठोर कारवाई होणार आहे. यासाठी पोलीस विभागाकडून राज्यात ई चलान साठी मॉडल ऑपरेटिंग सिस्टम कार्यरत राहणार आहे.
मुलांसोबत पालकांवर ही होणार कारवाई.
या संदर्भात महाराष्ट्राची अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. सुरेश कुमार मेखला यांनी अल्पवयीन मुलांकडून वाहने चालविताना होणाऱ्या अपघात आणि शक्यता पाहता,राज्यात पोलीस विभागाकडून आता नवे नियम जाहीर केले आहे. या चलान प्रक्रियेत अल्पवयीन मुले वाहन चालवत असेल तर ई चलान देऊन दंड वसुली आणि अल्पवयीन मुलांचे वाहन जप्त करण्यासंबंधात हा मोठा निर्णय आहे. वाहन चालविणाऱ्या चालकाचा वय 18 पेक्षा कमी असेल तर पोलीस अशा प्रकरणात तात्काळ कारवाई करणार आहेत.
पालकांना नोटीस आणि चार्जशीट सुद्धा दाखल होणार.
या दरम्यान अल्पवयीन चालक असेल तर त्याच्या पालक आई-वडिलांना पोलीस समन्स बजावून त्यांना बोलावणार आहे,आणि पुढे पालकांवर ही नियमानुसार कारवाई होईल.पोलिसांच्या नव्या नियमानुसार आता अल्पवयीन वाहन चालकाची गाडी जप्त करण्यासोबतच अशा प्रकरणात न्यायालयात चार्जशीटही दाखल होणार आहे.
हे आहेत वाहन जप्ती आणि ई चलान नियम.
राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडून या संदर्भात जे नियम बनविण्यात आले आहे त्यानुसार ई चलान बाबत माहिती देण्यात आली आहे.अशा प्रसंगात कारवाई करताना आता ई चलानच्या दोन पद्धती आहेत.त्याच्यात कॉम्प्रोमाइज आणि नॉन कॉम्प्रमाईज प्रकरण हे मामले राहणार आहेत.
यात कारवाई दरम्यान करार करताना ई चलानबाबत दोषीने जर स्वैच्छिक दंडाची रक्कम भरण्याची इच्छा व्यक्त केली तर सक्षम पोलीस अधिकारी हा दंड नियमानुसार स्वीकारतो, आणि यात चलानची रक्कम आणि इतर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते. जर दंड भरण्यास तयारी नसेल तर, अशा प्रसंगात पोलीस त्यांच्या विरोधात न्यायालयात चार्जशीट फाईल करू शकतात.
तडजोड न झालेल्या प्रकरणात दाखल होणार आरोप पत्र.
नव्या नियमानुसार वाहन चालविण्यासंदर्भात कारवाई होताना ई चलान संदर्भात दंडाची तडजोड झाली नाही तर अशा प्रकरणात न्यायालयात चार्जशीट दाखल करण्याचे आदेश नव्या परिपत्रकात देण्यात आले आहेत. जर यानंतरही संबंधित व्यक्ती न्यायालयात हजर राहत नसल्यास त्याचे वाहन जप्त करण्यात येऊ शकते.
पण यासाठी न्यायालयाची रीतसर परवानगी घेऊनच वाहन जप्त करण्यात येईल.मात्र न्यायालयाचे अनुमती न घेता पोलिसांकडूनही सक्तीने वाहन जप्त केल्यास, नव्या परिपत्रकात नमूद आदेशानुसार याचा उल्लंघन करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करण्यात येणार आहे.